मर्सिडिज बेन्झची जीएलई३५०डी ही कंपनीच्या ताफ्यातील सवरेत्कृष्ट विक्री होणारी एसयूव्ही गटातील आरामदायी कार आहे. या कारमध्ये केवळ कम्फर्टच नाही तर तीत अनेक फीचर अधिक आकर्षक स्वरूपात देण्यात आल्या आहेत. कंपनीने ही कार काही महिन्यांपूर्वीच भारतीय बाजारपेठेत उतरवली. आतापर्यंत ६,१०० कार विकल्या गेल्या आहेत. या कारचं मूळ व्हर्जन ६० लाख रुपयांना आहे. एमएल३५० या नावानं ही कार खरी तर ओळखली जायची. पण त्यात करण्यात आलेल्या बदलानंतर ती आता जीएलई३५०डी म्हणून सादर करण्यात आली आहे. अर्थातच ती डिझेल इंधनावरील आहे. तिची एक्स शोरुम किंमत (नवी दिल्ली) ७० लाख रुपये आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
नवीन काय?
कारमध्ये बाह्य़ तसेच अंतरंगात काही बदल करण्यात आले आहेत. तांत्रिकबाबतही ते आहेतच. नव्या दमातील एसयूव्ही वाटावी यासाठी तिचे हेडलॅम्प अधिक आकर्षित करण्यात आले आहेत. ग्रिलमध्येही बदल करण्यात आला आहे. समोर आणि मागील बम्परची रचना किरकोळ बदलण्यात आली आहे. ती अधिक निमुळती आणि नरम आहे. केबिनमधील रचना अधिक सुटसुटीत करण्यात आली आहे.
लॅपटॉपसारखे गॅझेट येथे ठेवण्याच्या दृष्टीने अधिक सोय करण्यात आली आहे. स्क्रिन रिझॉल्युशन क्रिप्स ग्राफिक्स तर एखाद्या नवख्याला अवघ्या काही मिनिटांत हाताळता येतील असे आहेत. नेव्हिगेशन सिस्टीम ही तुमच्या मोबाइलमधील ब्ल्यूटूथनेही चालविता येते. यातील कॅमेरा मला अधिक वैशिष्टय़पूर्ण वाटला. ३६० अंशातून फिरणाऱ्या कॅमेऱ्याची कार पार्क करताना खरी मदत होते. तुम्हाला तो एरिअल व्ह्य़ूही देतो. अमुक जागेत ही कार बसेल की नाही, हेही याद्वारे सूचित केले जाते. मार्गदर्शनही करतो. कारच्या आतील तीन रंग तुम्हाला निवडीला पर्याय देतात. यातील एअर सस्पेन्शनमुळे वाहनाच्या अपेक्षित उंचीनुसार बदल करता येणेही शक्य आहे. कारमधील अनेक फीचर हे अवघ्या काही बटनांद्वारे नियंत्रित करण्यासारखे आहेत. विण्डो पॅनलवर असणारी आसनांची उंची निश्चित करणारी सुविधा खरोखर आवश्यकतेनुसार गरजेची अशीच आहे. अर्थातच ती इलेक्ट्रॉनिक इशाऱ्यावर चालते.
इंजिन
मर्सिडिज बेन्झच्या जीएलई ३५० डी मध्ये ४मॅटिक ३.० लिटर व्ही६ इंजिन आहे. हे वाहनाला २५४ बीएचपी आणि ६२०एनएम क्षमता देते. कारचं वजन २,१५० किलो आहे आणि ० ते १०० किलोमीटर प्रति तास वेग घेण्यास ती ७.६ सेकंद वेळ घेते. ४ मॅटिक इंजिन म्हणजे तिची सारी क्षमता कारच्या चारही समान भागांत विस्तारली जाते. जुन्या कारमधील इंजिन हेच असले तरी या कारमध्ये ९जी-ट्रॉनिक गिअरबॉक्स मात्र नवा आहे. कारला अधिक सक्षम आणि वेगातही कमी आरपीएमवर इंजिन ठेवण्यास ते साहाय्यभूत ठरते. गर्दीतील वाहतूक आणि मोकळ्या महामार्गावर ही कार १० किलोमीटर प्रति लिटरच्या क्षमतेला उतरते.
अनुभव
नाशिक शहरात ही कार मी कम्फर्ट मोडवर चालविली तेव्हा स्टिअरिंग खूपच लाइट जाणवले. इंजिनही अनेक वेळा २००० आरएमपीच्याच खाली होते. त्याचा फारसा आवाजही होत नव्हता. छोटे खड्डे यातील सस्पेन्शनमुळे जाणवले नाहीत. अगदीच मोठय़ा खड्डय़ांचे मात्र अस्तित्व जाणवते. स्पोर्ट्स मोडमध्ये इंजिन १८०० ते ४१०० आरएमपी दरम्यान राहिले. अधिक वेगातही स्टिअरिंगने या वेळी चांगला प्रतिसाद दिला. १५० किलोमीटर प्रति तासाहूनही अधिक वेगात कार स्थिर वाटते. उत्तम रस्ता असेल तर ती २०० किलोमीटर प्रति तासप्रमाणे सहज धावू शकेल. रस्त्यावरून धावताना आणि वाऱ्याचा आवाज हा अधिक वेगात असला तरी आतमध्ये जाणवत नाही. याचं श्रेय केबिनमध्ये वापरलेल्या इन्सुलेशनला द्यावं लागेल.
अन्य वैशिष्टय़े
* मर्सिडिज बेन्झची जीएलई३५०डीमध्ये पाच विविध प्रकारांत वाहन चालविण्याची सोय आहे.
* स्पोर्ट, कम्फर्ट, इण्डिव्युजल, स्लिपरी आणि ऑफ रोड असं तुम्हाला पाहिजे त्या वाहन चालविण्याच्या स्वभावानुसार ती अॅडजेस्ट करता येते. त्यासाठीची ड्रायव्हरच्या बाजूला असलेली कमाण्ड पद्धती टच पॅडद्वारे चलित होऊ शकते.
* कारमधील वातावरण तीन वेगळ्या वेगळ्या भागांत व तिन्ही बाजूने हवे तसे राखता येते. म्हणजे ड्रायव्हर, त्याच्या बाजूचे व मागील आसनाकरिता. अन्यथा अधिकतर वाहनांमध्ये ही पद्धती केवळ एकाच बाजूला असलेल्या सुविधेद्वारे ही कसरत करावी लागते.
* सुरक्षेच्या दृष्टीने या कारमध्ये सहा एअरबॅग देण्यात आल्या आहेत.
* तुम्हाला ठरावीक वेगात वाहन चालवायचे आहे तर तशी सोयही आहे. म्हणजे तुम्ही निश्चित स्पीड सेट केलात की कार आपोआपच त्या वेगाने धावू शकेल; तुम्ही फक्त स्टिअरिंग सांभाळायचे! वेग कमी-अधिक करण्याचीही यात सोय आहे.
* केवळ एका बटनाद्वारे मागील दरवाजा बंद होतो.
* मर्सिडिजच्या स्पर्धक वाहनांच्या तुलनेत यातील बूट स्पेसही अधिक आहे.
* स्टोरेज म्हणून उपयोग करण्यासाठी वाहनातील मधल्या रांगेतील आसनांची पूर्णत: घडी होते.
* कारला दुहेरी पॅनोरॅमिक सनरुफ आहे. याद्वारे तुम्हाला बाहेरचा मोठा व्ह्य़ू दिसतो. शिवाय छत खिडकी उघडली की उजेडही बऱ्यापैकी येतो.
मर्सिडिज बेन्झचा जीएलई ३५० डी हा सध्याचा अवतार एसयूव्ही म्हणून पूरेपूर क्षमतेला उतरतो. मग तुम्ही ऑन रोड असा वा ऑफ रोड. लांब पल्ल्यांच्या प्रवासातही पाच जण सहज कम्फर्ट अनुभवू शकतात. केवळ बटनांवर होणाऱ्या अनेक कृती या चालकाला सुलभता प्रदान करतात. या कारचा तुम्हाला शहरातच अनुभव घ्यायचा असेल तर याच कारमधील २.२ लिटर डिझेल इंजिन जे की जीएलई२५०डीने ओळखले जाते अशी कार योग्य ठरेल.
प्रणव सोनोने – ls.driveit@gmail.com