टाटा मोटर्सची नवी टिआगो छोटय़ा हॅचबॅक श्रेणीत अस्वस्थता निर्माण करणारी ठरली आहे. कमी किंमत, आकर्षक रूप आणि जोडीला अत्याधुनिक तंत्रज्ञान या जोरावर वाहनप्रेमींच्या नव्या वाहनाबाबतच्या अपेक्षा काही प्रमाणात पूर्ण होण्याची शक्यता आहे. टिआगोद्वारे स्पर्धकांसमोर नवे आव्हान उभे करताना टाटा मोटर्सने तिचे पारंपरिक इंडिका रूप यंदा सोडले, हे एक यानिमित्ताने बरेच झाले. बाकी, छोटय़ा गटात थोडे अधिक देणारी कार म्हणून टिआगोवर टिक मारायला हरकत नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

फेब्रुवारीत ग्रेटर नोएडा येथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय वाहन प्रदर्शनात टाटा मोटर्सने बहुप्रतीक्षित झिका सादर केली. सब चार मीटर आकारातील ही हॅचबॅक श्रेणीतील छोटेखानी प्रवासी कार; पण प्रत्यक्षात बाजारात येण्यापूर्वीच ती अधिक प्रसिद्ध झाली, अर्थात काहीशा नकारात्मकतेने. म्हणजे कारमध्ये काही दोष नव्हता. नॅनोइतकी तिची बदनामीही नव्हती; पण अमेरिकेत याच नावाच्या विषाणूने थैमान घातले आणि कंपनीला नाव बदलावे लागले. अखेर टाटा झिकाची टाटा टिआगो झाली. कंपनीने वाहनाच्या प्रसार-प्रचार मोहिमेकरिता प्रसिद्ध फुटबॉलपटू मेसी याला करारबद्धही केले.

एप्रिलपासून ही कार प्रत्यक्ष भारतीय वाहन बाजारपेठेत उपलब्धही झाली. विक्रीच्या आकडय़ाबाबतचा अद्याप तिचा कल स्पष्ट व्हायचा आहे; पण किंमत, तिचे इंटीरिअर आणि काही बाबतीतील वैशिष्टय़ यासाठी तरी टिआगोला पसंती द्यायला हवी. अर्थात वाहनाला अधिक स्मार्ट लुक देताना तिच्यातील अंतर्गत रचना, मग ते इंटीरिअर असो अथवा टेक्नॉलॉजिकली असो याला झुकते माप देण्यात आले आहे, हे मान्यच करावे लागेल. शिवाय सुरक्षिततेच्या दृष्टीने ही कार तयार करताना अधिक भर दिला गेला आहे, हेही जाणवते.

एरवी कारचा एखादा दरवाजा लागला नाही तर त्याची सूचना संबंधित वाहनांमध्ये असते. टिआगोमध्ये चालकाने सीट बेल्ट लावला नाही तर त्याचाही इशारा दिला जातो. समोरच्या सीट मागे-पुढे घेण्याबरोबरच त्या खाली-वर करण्याची सुविधाही यात आहे. समोरच्या दोन्ही प्रवाशांकरिता एअरबॅग देण्यात आल्या आहेत. डॅशबोर्ड अधिक आकर्षक करण्यात आला आहे. तसेच दरवाज्यावरील आतील बाजूचे वेष्टनही डिझाइनबाबत वेगळ्या धाटणीचे आहे.

तंत्रज्ञानाच्या बाबत टर्न-बाय-टर्न नेव्ही अ‍ॅप, ज्युक-कार अ‍ॅप (ब्ल्युटुथने स्मार्टफोनला कनेक्ट होणारे) आहेत. ज्याद्वारे माहिती आणि मनोरंजन असा दुहेरी मेळ साधता येतो. रीअर पार्किंग सेंसर कारमधील इंफोटेन्मेंट स्क्रीनवर कार्यरत होतात. कारमधील इंफोटेन्मेंट सिस्टम/डिझाइन हे ‘हरमन’चे फलित आहे.

चारही दरवाज्यांमध्ये स्पीकर देण्यात आले आहेत. तसेच या भागातील पाण्याची बाटली वगैरे साठवणुकीची जागाही बऱ्यापैकी मोठी आहे. अशा विविध २२ जागा देण्यात आल्या आहेत. छोटेखानी व तळातील गटाची हे वाहन असल्याने अंतर्गत उंचीला फारसा वाव देण्यात आलेला नाही. तसेच मागच्या आसनाकडील लेग स्पेस कमी वाटते. तब्बल २४२ लिटरची लगेज स्पेस दिल्यामुळे हे जाणवते. ती कमी करता येऊन उलट रीअर लेग स्पेस वाढवता आली असती.

टाटा मोटर्सने विकसित केलेले रेव्होट्रॉन इंजिन यात आहे. टेस्ट ड्राइव्ह घेतलेल्या एक्सझेड या हाय एंड व्हर्जनमध्ये १.२ लिटर, १,१९९ सीसीचे व ३ सिलिंडर सुसज्ज इंजिन आहे. कारचा टर्क (११४ एनएम) व ग्राऊंड क्लिअरन्स (१६५ ते १७० एमएम) हा उल्लेखनीय म्हणावा लागेल. ३५ लिटरची इंधन टाकी असलेल्या या गटातील टिआगोची इंधन क्षमता २४ किलो मीटर प्रति लिटपर्यंत आहे. इको आणि सिटी अशा दोन्ही ड्राइव्ह मोडवर ही कार चालविता येते. सुरळीत रस्ता सोडला तर अन्यत्र शॉकअपचा तेवढा परिणाम जाणवत नाही.

सहा रंगांत आणि पाच श्रेणींत टिआगो उपलब्ध आहे. काही स्पेशल फीचर हे निवडक श्रेणीतील टिआगोमध्येच देण्यात आले आहेत. प्रत्यक्षात कार बाजारात दाखल होण्यापूर्वी १७ दिवसांत ५० हजार किलोमीटरचा प्रवास नोंदवून टिआगोने सुरक्षितता व इंजिन, इंधन क्षमतेचे टप्पे पूर्ण केले आहेत. दोन वर्षे किंवा ७५ हजार किलोमीटर अशी हमी (वॉरंटी) टाटा टिआगो देते. डिझाइनसाठी कंपनीने तिची पुणे, इटली आणि ब्रिटनमधील यंत्रणा कामाला लावल्याचे फळ टाटा मोटर्सला चाखायला मिळेल, अशी आशा आहे, कारण टिआगोच्या माध्यमातून छोटय़ा हॅचबॅक वाहनाला मिळालेला अनोखा लुक कंपनीला पारंपरिक इंडिकाच्या मार्गापासून दूर नेणारा आहे. इंडिका रूप बदलायला हवे हे कंपनीच्या संशोधन व विकास, आरेखन (डिझाइन) विभागाला तिच्या बोल्ट, झेस्ट आदी वाहनांच्या प्रतिसादावरून उशिरा कळले, हे यानिमित्ताने बरेच झाले.

सेकंड ओपिनियन

३.२० लाख रुपयांपासूनची किंमत जाहीर करत टाटा मोटर्सने नव्या टिआगोबद्दल एकूणच छोटय़ा हॅचबॅक प्रवासी कार बाजारपेठेत चर्चेचा धुरळा उडवून दिला. प्रत्यक्षात टिआगो ५.३० लाख रुपयांपर्यंत (हाय एन्ड व्हर्जन) असल्याने तिच्या या बेस प्राइसचे आकर्षणही संपुष्टात आले आहे. बरं, तिची किमतीबाबत सांगितली जात असलेली मारुती सुझुकीच्या सिलेरिओ वगैरेशी तुलना काही प्रमाणात मान्य केली तरी टिआगो अन्य काही बाबतीत नक्कीच उजवी ठरते. जसा तिचा लुक, स्पेस, तिच्यातील तंत्रज्ञान वगैरे वगैरे. टाटाची छोटी कार म्हटले की नॅनोच डोळ्यासमोर येते; पण स्टाइलबाबत नवी टिआगो ही रेनो (क्विड), हय़ुंदाई (आय१०) वगैरे विदेशी कंपन्यांच्या या गटातील वाहनांना लाजवणारी नक्कीच आहे. तिच्या बाहेरील लुकबरोबरच तिच्यातील अंतर्गत रचनाही उल्लेखनीय आहे. आतील जागा आणि बाहेरून उंची याबाबत टिआगो उजवी नक्कीच आहे.

अनिल गरगडे,  सॉफ्टवेअर अभियंता (कल्याण पूर्व)

veerendra.talegaonkar@expressindia.com