* मला सेकंड हँड गाडी विकत घ्यायची आहे. माझे बजेट दोन ते पावणेतीन लाख रुपये आहे. अल्टो किंवा वॅगन आर सीएनजी घ्यावी, असे वाटते. आपण काय सुचवाल.
विजय भागवत
* पावणेतीन लाखांत तुम्हाला रिट्झ ही गाडी मिळू शकते. चार-सहा वर्षे वापरलेली गाडी तुम्ही घेऊ शकता. शक्यतो सेकंड हँड गाडी सीएनजी घेऊ नये. तसेच शेवरोले बीट किंवा आय१० याही उत्तम पर्याय आहेत.
* माझे बजेट पाच लाख रुपये आहे. मला पेट्रोल कार घ्यायची आहे. रेनॉ क्विड ही कार कशी आहे. या बजेटमध्ये मला दुसरी एखादी कार घेता येऊ शकेल का.
– ओम पाटील, पुणे
* पाच लाखांच्या बजेटात तुम्ही फोर्ड फिगो बेसिक मॉडेल घेऊ शकाल. हिचे डिझेल इंजिन खूप चांगले आहे. क्विडचे इंजिन ८०० सीसीचे आहे. फिगोचे १.२ लिटरचे.
* माझे वय ४५ वर्षे असून माझे मणक्याचे ऑपरेशन झाले आहे. मला कार घ्यायची असून माझे बजेट तीन ते चार लाख रुपये आहे. माझे मासिक ड्रायव्हिंग ३०० ते ४०० किमीचे आहे. कोणती गाडी घेऊ.
– गोवर्धन हृषिकेश
* तुम्हाला कमी उंचीची कार योग्य ठरणार नाही आणि ऑटोगीअर गाडी असली तरच बरे होईल. तुम्ही ह्य़ुंडाई आय१० अ‍ॅटोमॅटिक ही गाडी घ्यावी. ही गाडी सेकंड हँडमध्ये तीन लाखांपर्यंत मिळू शकेल.
* माझे बजेट चार-पाच लाख रुपये आहे. वॅगन आर किंवा सेलेरिओ यांपैकी एक गाडी घेण्याचा माझा मानस आहे. कृपया मी कोणती गाडी घ्यावी, हे सांगा. क्विडबद्दलही थोडे मार्गदर्शन करा.
– सुरेंद्र बाबू, नाशिक
* वॅगन आर आणि सेलेरिओ या गाडय़ा क्विडपेक्षा थोडय़ा महाग आहेत. तुम्हाला ऑटोगीअरची कॉम्पॅक्ट कार हवी असेल तर व्ॉगन आर एएमटी किंवा अल्टो के१० एएमटी यांचा पर्याय निवडा.
* मला क्विड गाडी घ्यायची आहे. मार्गदर्शन करा.
– सुनील संदाणे, सटाणा
* तुम्हाला क्विड गाडी घ्यायची आहे, ठीक आहे. मात्र, तुमचे बजेट किती आहे हे माहीत नाही. क्विड गाडी शहरात फिरवण्यासाठी चांगली आहे. तसेच तिचा लूकही चांगला आहे. महामार्गावर मात्र ती तितकीशी प्रभावी ठरत नाही. इंजिनाची पॉवर कमी आहे.
* मारुतीची व्हिटारा ब्रेझा कशी आहे. मला ही गाडी घेण्याची खूप इच्छा आहे.
– अजय वाघ
* व्हिटारा ब्रिझा ही उत्तम कार आहे. सध्या ती डिझेल व्हर्जनमध्येच उपलब्ध आहे. कदाचित या वर्षअखेरीस ती पेट्रोल व्हर्जनमध्येही उपलब्ध असेल. मारुतीची गाडी असल्याने घ्यायला हरकत नाही. तसेच या गाडीसाठी वेटिंग खूप असल्याचे समजते.
* मला माझ्या ऑफिसच्या कामाव्यतिरिक्त इतर कामांसाठी खूप वेळ द्यावा लागतो. मला एखादी कम्फर्ट गाडी सूचवा की जिच्यात मला प्रवासादरम्यान आराम करता येऊ शकेल. पशांची चिंता नाही.
– कल्पेश ढेरे
* इनोव्हा हा सर्वोत्तम पर्याय आहे. गाडीत तुम्हाला प्रवासादरम्यान आरामही करता येऊ शकेल आणि तुम्हाला तुमचे कामही करता येऊ शकेल, एवढी या गाडीमध्ये स्पेस असते.
* माझे मासिक रिनग दीड ते दोन हजार किमीचे आहे. मला सिआझ ही कार आवडली आहे. मी सिआझचे पेट्रोलचे टॉप मॉडेल घेऊ की डिझेलचे?
– मयुरेश धाक्रस
* ड्रायिव्हग फक्त शहरापुरताच मर्यादित असेल, तर पेट्रोल कार खूप महाग पडेल. तुम्ही डिझेल गाडी घ्यावी. पिकअप थोडा कमी असेल, परंतु स्पीड खूप असेल आणि गाडी व्हायब्रेट होत नाही. तुम्ही एसएचव्हीएस डिझेल सिआझ हे मॉडेल घ्यावे.
या सदरासाठी प्रश्न पाठवा : ls.driveit@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा