’ मला माझ्या चौकोनी कुटुंबासाठी एक हौस म्हणून दीड-दोन लाखांपर्यंत सेकंडहँड कार घ्यायची इच्छा आहे. या बजेटमध्ये २००२ सालची स्कोडा ओक्टाव्हिया ही डिझेल कार मिळत आहे. ही कार चांगल्या कंडिशनमध्ये असून मेंटेनन्स व किमतीच्या दृष्टीने घेणे कितपत योग्य ठरेल?
– अमोल ताठे
’ २००२ ची कार म्हणजे तुम्हाला पुढच्या वर्षी नवे रजिस्ट्रेशन करावे लागेल. जर वापर कमी असेल तर डिझेल गाडी नका घेऊ. तिच्या इंजिनाचे काम निघाले तर तुम्हाला दीड लाखांचा भरुदड पडेल. त्यापेक्षा पाच ते आठ वष्रे वापरलेली जुनी स्विफ्ट किंवा वॅगन आर तुम्हाला परवडेल.
’ आम्हाला रिसेलमध्ये सेडान कार घ्यायची आहे. नंतर तिला एलपीजीमध्ये रूपांतरित करायचे आहे. फिरण्याचे उद्दिष्ट आहे. कृपया मार्गदर्शन करा.
– श्रीकांत, जळगाव
’ तुम्ही पाच वष्रे वापरलेली जुनी इटिऑस गाडी घ्यावी. ती तुम्हाला तीन लाखांत मिळू शकेल किंवा एसएक्स ४ ही गाडीही तुम्हाला याच किमतीत प्राप्त होऊ शकेल. दोन्ही गाडय़ा एलपीजीसाठी योग्य आहेत. सीएनजी उपलब्ध असेल तर मी तुम्हाला सीएनजीचा पर्याय सुचवेन, कारण मायलेज चांगला मिळतो. एसएक्स४ पेक्षा इटिऑसचा मायलेज चांगला आहे.
’ मला मिहद्राची केयूव्ही १०० ही एसयूव्ही घेण्याची खूप इच्छा आहे. मी महिन्यातून दोनदा लाँग ड्राइव्हसाठी कार वापरणार आहे. माझे बजेट पाच लाख रुपये आहे. मी कोणते व्हर्जन घेऊ, पेट्रोल की डिझेल. कृपया सांगा.
– विनय धृपटे
’ मी तुम्हाला केयूव्ही१०० ही डिझेल व्हर्जनमधील गाडी घेण्यास सुचवेन. कारण मिहद्राची ओळख चांगल्या डिझेल इंजिनाच्या गाडय़ा बनवणारे, अशीच आहे. मात्र, तुम्हाला पेट्रोलवर चालणारी कार हवी असेल तर मारुती बलेनो हा उत्तम पर्याय आहे.
’ कृपया मला होंडा अमेझ आणि फोक्सवॅगन पोलो यांच्यापकी कोणती गाडी चांगली आहे, हे सांगा. माझे मासिक ड्रायिव्हग ४०० किमीचे आहे.
– संदेश सप्रे
’ मी तुम्हाला फोक्सवॅगन पोलो ही गाडी सुचवेन. कारण ही एक स्टेबल कार आहे आणि पेट्रोल व्हर्जनमधील हिची पॉवर खूपच चांगली आहे. मात्र, होंडा अमेझच्या तुलनेत पोलोचा मेन्टेनन्स जास्त आहे. अमेझऐवजी होंडाची जॅझ ही गाडी खूप छान आहे. तिचा विचार करा.
’ आम्हाला एक कम्प्लीट फॅमिली कार घ्यायची आहे, ज्यात सहाजण बसू शकतील. सध्या आमच्याकडे स्विफ्ट डिझायर ही गाडी आहे. मात्र, ती आम्हाला विकायची आहे. मुंबई,पुणे व कोकण या ठिकाणी फिरण्यासाठी आम्हाला गाडी हवी आहे. इनोवाकडे आमचा कल आहे. परंतु तुम्ही त्याव्यतिरिक्त एखादी चांगली कार सुचवा.
-रेश्मा अरोंडेकर, दादर
’ इनोवा ही गाडी जरा जास्त महाग आहे. १५ लाख रुपये तुम्हाला मोजावे लागतात. परंतु तुम्हाला ती दीर्घकाळापर्यंत आणि जास्तीतजास्त वापरायची असेल तर इनोवा ही सर्वोत्तम गाडी आहे. परंतु लो बजेट आणि चांगली कार हवी असेल तर मिहद्राची टीयूव्ही३०० ही एक चांगली गाडी आहे. सहाजण आरामात बसू शकतील आणि हिचा मायलेजही खूप छान आहे.
’ आम्हाला मारुती अल्टो के१०चे जुने मॉडेल घ्यायचे आहे. २०१२चे मॉडेल आहे. कंपनी फिटेड सीएनजी किट आहे. किंमत एक लाख ८३ हजार आहे. गाडी घेऊ का.
– सुचिता भालेराव
’ कृपया गाडीची क्लच प्लेट पाहा आणि इंजिन कंडिशनही तपासून पाहा. कारण गाडीचे रिनग खूप झाले असेल तर या दोन्हीमध्ये अडचणी असू शकतात. सर्व काही सुस्थितीत असेल तर गाडी घेण्यास काहीही हरकत नाही.
’ सर मी स्विफ्ट एलएक्सआय ही जुनी पाहिली आहे. ती २००७ नोव्हें.ची आहे आणि तिचे रिनग ६७००० किमी झाले आहे. गाडीचे मशीन चांगले आहे .गाडीची किंमत २८०००० सांगतात. गाडी घ्यावी की नाही कृपया मार्गदर्शन करा.
– माऊली मुंडे
’ त्या गाडीची किंमत नक्कीच एक लाख ६० हजार रुपयांच्या वर नाही. अन्यथा ती गाडी घेऊ नये हाच सल्ला मी देईन.
’ सर मी शिक्षक आहे. मला एक फॅमिली कार घ्यायची आहे. कमी बजेटची पेट्रोल कार कोणती घेऊ ?
– सत्यप्रेम लगड, बीड
’ कमी बजेटात तुम्हाला हुंदाई ईऑन उत्तम ठरेल. ती छोटी असून तिचा स्टेबलनेस खूप छान आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा