* ग्रँड आय१० आणि स्विफ्ट व्हीएक्सआय यांच्यापैकी कोणाची निवड करावी याबाबत माझा गोंधळ होत आहे. वस्तुत माझा रोजचा प्रवास दहा ते १२ किमीचा आहे. तर वर्षांतून तीन-चारदा माझे लाँग ड्राइव्हला जाणे होते. मी कोणती कार घ्यावी. कृपया सुचवा.
– राज जाधवे
* तुमचे रोजचे रनिंग खूपच कमी असल्याने मी तुम्हाला मारुतीची बलेनो ही गाडी सुचवेन किंवा मग स्विफ्टची शिफारस करीन. बलेनोच्या बेसिक मॉडेलात एअरबॅग्ज आणि एबीएस आहेत. त्यामुळे बलेनोला प्राधान्य द्या.
* मला सेकंड हँड कार घ्यायची आहे. माझे बजेट दोन लाख रुपये एवढेच आहे. मला कार लाँग ड्राइव्हसाठी वापरायची आहे. साधारणपणे चार ते पाच वेळा मी जात असतो लाँग ड्राइव्हला. तसेच रोजच्या वापरासाठीही गाडी हवी आहे. सहा आसनी कारला प्राधान्य द्यायचे आहे. कृपया मला सांगा एवढय़ा बजेटात मिळेल का, मला हवी तशी कार.
– दिलीप जाधव
* रोजचा वापर आणि चार-पाच वेळा लाँग ड्राइव्ह अशासाठी तुम्हाला गाडी घ्यायची असेल तर तुम्ही सेकंड हँड गाडी घेऊ नये. आणि दोन लाखांत सहा आसनी गाडी तुम्हाला मारुती ईकोच मिळू शकेल. परंतु तुम्ही ही गाडी घेऊ नये. बजेट थोडे वाढवा आणि पाच-सहा लाखांची केयूव्ही१०० ही गाडी घ्या.
* मी सध्या अल्टो एलएक्सआय एलपीजी ही गाडी वापरतो आहे. माझे मासिक रनिंग किमान दीड हजार किमी आहे. मला डिझेल व्हर्जनमधील नवीन कार घ्यायची इच्छा आहे. केयूव्ही१०० के८ आणि व्हिटाला ब्रेझा यांच्यापैकी कोणती गाडी घ्यावी, याबदद्ल माझ्या मनात गोंधळ आहे. मला किमान २४ किमी पेक्षा मायलेज देणारी गाडी हवी आहे. मार्गदर्शन करा.
– दीपक गावंडे
* तुमचे रनिंग जास्त असल्याने मी तुम्हाला फोर्ड फिगो टीडीसीआय ही गाडी घेण्याचा सल्ला देईन. ही गाडी दणकट आणि मजबूत आहे. हिचा मायलेज २६ किमी प्रतिलिटर एवढा आहे. परंतु तुम्हाला कम्फर्ट देणारी एसयूव्ही हवी असेल तर इकोस्पोर्ट ही गाडी चांगली आहे. तसेच दीर्घकालीन वापरासाठी गाडी हवी असेल तर पोलो टीडीआय ही गाडी उत्तम आहे.
* मला मारुती डिझायर, टाटा झेस्ट, ह्य़ुंडाई व्हेर्ना, होंडा सिटी, टोयोटा इटिऑस, मारुती सिआझ, बलेनो, या गाडय़ांबद्दल माहिती द्या. यापैकी कोणती गाडी दीर्घ कालावधीसाठी चांगली आहे.
– रौनक लोढा
* दीर्घकालीन वापरासाठी कोणतीही पेट्रोल गाडी चांगली असते. सर्वात प्रथम पेट्रोल कार म्हणजे होंडा सिटी, ही सर्वोत्तम कार आहे. त्यानंतर फोक्सवॅगन पोलो व व्हेंटो या गाडय़ाचा नंबर लागतो. आणि त्यानंतर मग मारुतीच्या गाडय़ांचा क्रमांक आहे.
* मला डिझेल गाडी घ्यायची आहे. माझे बजेट आठ ते साडेआठ लाख रुपये आहे. मारुती स्विफ्ट डिझायर व्हीडीआय किंवा मारुती सुझुकी व्हिटारा ब्रेझा यांपैकी एक गाडी घ्यायचा विचार आहे. मला चांगली कम्फर्ट लेव्हलची गाडी हवी आहे. कृपया सांगा.
– ऋतुराज जगताप
* मारुतीची ब्रेझा डिझायरपेक्षा नक्कीच महाग असेल. तरी तुम्हाला लगेचच गाडी घ्यायची असेल तर बलेनो ही गाडी घ्या. ही गाडी स्टायलिशही आहे. अन्यथा टाटा झेस्टचा विचार करा. तिला पॉवर जास्त आणि कम्फर्टही आहे. तसेच टाटांच्या डिझेल गाडय़ा नेहमीच सर्वोत्तम असतात.
कोणती कार घेऊ?
ग्रँड आय१० आणि स्विफ्ट व्हीएक्सआय यांच्यापैकी कोणाची निवड करावी याबाबत माझा गोंधळ होत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 18-03-2016 at 01:08 IST
Web Title: Tips to buying car