फोक्सवॅगन म्हणजे शब्दश: लोकांची गाडी, असे नाव असलेल्या जर्मन कंपनीने आपल्या गाडय़ांच्या माध्यमातून भारतीय ऑटोमोबाइल क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली आहे. याच कंपनीची नवीन कॉम्पॅक्ट सेडान गाडी अ‍ॅमियो बाजारात आली आहे. स्विफ्ट डिझायर, होंडा अमेझ, टाटा झेस्ट, ह्य़ुंदाई एक्सेंट आणि फोर्ड फिगो अस्पायर या गाडय़ांच्या स्पध्रेत फोक्सवॅगननेही पाऊल टाकले आहे..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फोक्सवॅगन या जर्मन कंपनीने त्यांच्या भारतातील कारखान्यातील पोलो या गाडीच्या प्लॅटफॉर्मवर तयार होईल अशा नव्या कॉम्पॅक्ट सेडान गाडीच्या निर्मितीसाठी ७०० कोटींहून अधिक गुंतवणूक केली आहे. चार मीटरच्या आत लांबी असलेल्या या श्रेणीतील फोक्सवॅगनची ही पहिलीच गाडी आहे. या वर्षी बाजारात आलेल्या अ‍ॅमियो या फोक्सवॅगनच्या कॉम्पॅक्ट सेडानसमोर याआधीच बाजारात स्थिरावलेल्या अनेक कंपन्यांच्या या श्रेणीतील गाडय़ांचे आव्हान आहे.

भारतातील जवळपास सर्वच ऑटोमोबाइल कंपन्यांनी कॉम्पॅक्ट सेडान श्रेणीत आपल्या गाडय़ा आणल्या असून या सर्वच गाडय़ांना मिळणारा प्रतिसाद उत्तम आहे. त्यामुळे आता फोक्सवॅगनची अ‍ॅमियोदेखील या स्पध्रेत दाखल झाल्यानंतर एक महत्त्वाचा प्रश्न आहे, तो म्हणजे ही गाडी भारतीय रस्त्यांसाठी या श्रेणीतील सर्वोत्तम गाडी ठरते का? पाहू या..

गाडीची माहिती

गाडीची लांबी ३९९५ मिमी एवढी असून रुंदी १६८२ मिमी एवढी आहे. गाडी १४८३ मिमी उंच असून पाच जणांसाठी योग्य आहे. गाडीच्या इंजिनची क्षमता ११९८ सीसी असून गाडी पेट्रोल आणि डिझेल अशा दोन्ही श्रेणींमध्ये उपलब्ध आहे. गाडी फ्रंट व्हील ड्राइव्ह असून गाडीत ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, पुढे आणि मागे अशा दोन्ही बाजूंना पॉवर िवडोज, सेंट्रल लॉकिंग, चालक आणि त्याच्या बाजूच्या प्रवाशासाठी एअरबॅग्ज या गोष्टी आहेत. त्याशिवाय अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम देण्यात आली आहे. गाडीने वेग पकडल्याने दरवाजे आपोआप बंद होणे, चाइल्ड सेफ्टी लॉक अशीही सुरक्षा फीचर्स देण्यात आली आहेत.

  • इंजिन – एमपीआय, ३ सििलडर, ११९८ सीसी
  • पॉवर – ७५ बीएचबी@५४००आरपीएम
  • टॉर्क – ११० एनएम@३७५० आरपीएम
  • ट्रान्समिशन – ५-स्पीड मॅन्युअल
  • एअरबॅग्ज – दोन
  • बूट कपॅसिटी – ३३० लिटर
  • मायलेज – १७.८३ किमी प्रति लिटर
  • किंमत – ५.२४ लाखांपासून पुढे

वैशिष्टय़े

गाडीत ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल आहे. त्याचबरोबर क्रुझ कंट्रोल फीचर देण्यात आले असून या श्रेणीत हे फीचर देणारी फोक्सवॅगन ही सध्या एकमेव कंपनी आहे. त्याशिवाय पाìकग करताना मागच्या बाजूला कॅमेरा, अँटी ग्लेअर मिर्स, हीटर, बॉडी कलर बम्पर्स, ट्रीप मीटर, इंटीग्रेटेड म्युझिक सिस्टम, टच स्क्रीन डिस्प्ले, यूएसबी कम्पॅटिबिलिटी, ऑक्झिलरी, ब्लुटूथ कनेक्टिव्हिटी, एमपी-३ प्लेबॅक, सीडी प्लेअर, आयपॉड कम्पॅटिबिलिटी, गाडीच्या स्टीअिरगवर या सर्वाचे कंट्रोल, व्हॉइस कमाण्ड अशा वैशिष्टय़ांनी गाडी नटली आहे.

मेक इन इंडियाचा भाग असलेली फोक्सवॅगन अ‍ॅमियो ही गाडी फोक्सवॅगनच्याच पोलोसारखी दिसते. वाढवलेली बूट स्पेस ही पोलोलाच जोडलेली वाटते; पण ती कुठेही उगाच जोडलेली वाटत नाही, हे विशेष. गाडीकडे बघितल्यावर ही गाडी रस्त्यावर व्यवस्थित समतोल साधणारी वाटतेच, पण त्याचबरोबर पुढील बम्परमध्ये केलेल्या बदलांमुळे गाडीला अधिक दमदार लुक आला आहे.

फोक्सवॅगन पोलोमध्ये असलेले १.२ लिटर ३ सििलडर पेट्रोल इंजिनच या गाडीतही आहे. गाडी ५-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनवर धावते. अ‍ॅमियोचे इंजिन ७५ बीएचपी एवढी शक्ती देत असून टॉर्कही ११० एनएम एवढा आहे. हा टॉर्क शहरात आणि महामार्गावरही पुरेसा आहे. त्याबरोबर साधारण १८ किमी प्रति लिटर एवढा मायलेज देणारी गाडी, हीदेखील अ‍ॅमियोच्या बाबतीतील जमेची बाजू आहे. गाडी चालवताना जाणवलेली एक बाब म्हणजे गाडी उड्डाणपूल किंवा चढणीचा रस्ता चढताना थोडासा त्रास देते. चढणीवर गाडी वेगात असली, तरी गिअर खाली उतरवून गाडीला अतिरिक्त शक्ती द्यावी लागते. अधिक मायलेज देण्यासाठी आवश्यक असलेल्या इंजिनांमुळेही हे घडत असावे. डिझेल श्रेणीतील इंजिनामध्ये फोक्सवॅगन ही गोष्ट नक्की टाळेल, याची खात्री आहे.

कॉम्पॅक्ट सेडान या श्रेणीत क्रुझ कंट्रोल, रेन सेिन्सग वायपर्स, सेंटर आर्म रेस्ट आदी वैशिष्टय़े देणारी अ‍ॅमियो ही पहिलीच गाडी आहे. गाडीचे थोडेसे वरचे मॉडेल घेतल्यास रिव्हर्स पाìकग कॅमेरा आणि पाìकग सेन्सर या गोष्टीही त्यात अंतर्भूत आहेत. गाडीची अंतर्गत रचना पोलो किंवा व्हेंटो या गाडय़ांसारखीच आहे. डॅशबोर्ड अत्यंत साधा असला, तरी टच स्क्रीन डिस्प्ले ही गोष्ट पोलो किंवा व्हेंटो या गाडय़ांपेक्षा वेगळी आहे. गाडीची बूट स्पेस ३३० लिटर एवढी असून ती सामानासाठी खूपच जास्त आहे.

अ‍ॅमियो घेण्याचे फायदे

  • जर्मनीसारख्या युरोपीय कंपनीने बनवलेली कॉम्पॅक्ट सेडान तुमच्या पदरात पडते.
  • या गाडीची किंमत फीचर्सच्या तुलनेत कमी असल्याने त्याचाही फायदा आहे.
  • क्रुझ कंट्रोल, ऑटो वायपर्स, रिव्हर्स कॅमेरा, टचस्क्रीन डिस्प्ले अशी फीचर्स देण्यात आली आहेत.
  • अंतर्गत रचना ही या श्रेणीतील इतर गाडय़ांपेक्षा चांगली आहे.
  • गाडी वेगात असताना या श्रेणीतील इतर गाडय़ांच्या तुलनेत गाडीचा समतोल अधिक चांगला आहे.

तोटे

  • ३-सििलडर पेट्रोल इंजिन हे काही प्रमाणात कमकुवत आणि आवाज करणारे आहे. त्यामुळे गाडी अधिक वेगात थरथरते.
  • मागच्या आसनांवर बसणाऱ्या प्रवाशांना पाय ठेवण्यासाठी कमी जागा आहे. या गाडीच्या तुलनेत होंडा अमेझ अधिक ऐसपस आहे.
  • ३३० लिटर बूट स्पेस ही या श्रेणीतील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात कमी बूट स्पेस आहे.

ls.driveit@gmail.com