मला माझी जुनी कार मारुती अल्टो २००६ (६७००० किमी )चे मॉडेल विकून नवीन कार घ्यायची आहे. माझे दोन प्रश्न आहेत. १. शोरूममध्ये जुन्या कारची रिसेल प्राइस ७०००० सांगितली तर बाहेर विकावी का शोरूमला विकावी? २. मारुती बलेनो अल्फा मॉडेल घ्यायचं आहे, तर ते मॉडेल कसं आहे? ९ लाखांपर्यंत इतर ऑपशन सांगा.
–आदित्य झांटय़े, ठाणे
शोरूममध्ये तुम्हाला एक्स्चेंज बोनस मिळत असेल तर दहा-१५हजार जास्त मिळतील. पण या गाडीला ७० हजार ठीक आहेत. बलेनोचे कुठलेही मॉडेल घेतले तरी त्यात एबीएस आणि एअरबॅग्ज आहेतच. पण जसे जास्त किमतीचे मॉडेल घ्याल तशा फीचर्स, जीपीएससारख्या, सुविधा तुम्हाला मिळतात. आपल्या वापरण्यानुसार मॉडेल ठरवावे.
मी नुकताच गाडी शिकलो आहे. माझे महिन्याचे ड्राइिव्हग साधारण ४०० किमी होईल. मी सेकंड हॅण्ड गाडी घेऊ इच्छितो. कमी बजेट वाली कार सुचवा व किती वष्रे वापरलेली गाडी घेणे योग्य राहील?
– संतोष फटांगरे
तुम्ही चार-पाच वष्रे वापरलेली सेलेरिओ किंवा वॅगन आर किंवा आय१० घ्यावी. या गाडय़ा सेकंड हॅडला काहीही प्रॉब्लेम देत नाहीत. आणि या गाडय़ांचे सुटे भागही मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. सहसा या गाडय़ा दहा वर्षांपर्यंत चालू शकतात. अशा गाडय़ा दोन-तीन लाखांत मिळतील.
मी पहिल्यांदाच कार घेणार आहे. माझे ड्रायिवग साधारणपणे ५०० ते १००० प्रति महिना असेल. माझे बजेट ५ ते ५.५ लाख आहे आणि मी क्विड १.० आरएक्सटी किंवा सेलेरिओ झेडएक्सआय मॅन्युअलचा विचार करत आहे. कोणती कर घेणं जास्त फायदेशीर राहील?
– निखिल भंडारी, बंगळूरु
तुम्ही अर्थातच सेलेरिओचे टॉप मॉडेल घ्यावे, ते जास्त योग्य ठरेल. क्विडपेक्षा सेलेरिओ नक्कीच जास्त रिफाइन्ड आणि स्टेबल गाडी आहे. तिचा मेन्टेनन्सही कमी आहे आणि सेफ्टी फीचर्सच उत्तम असल्याने ती सुरक्षितही आहे. पण एकदा टाटा टियागो पेट्रोल बघा ती त्या दोघांपेक्षाही नक्कीच दणकट आणि सॉफ्ट सस्पेन्शनची गाडी आहे.
या सदरासाठी प्रश्न पाठवा : ls.driveit@gmail.com