* सर, कृपया मला हॅचबॅक कारविषयी सुचवा जी सात ते आठ लाख रुपयांपर्यंत मिळू शकेल. तसेच मी कोणते व्हर्जन घेऊ? पेट्रोल की डिझेल? मी आठवडय़ातून एक-दोनदाच कार चालवणार आहे.
– आतिश वासनिक
* तुमचे ड्रायिव्हग कमी असेल तर तुम्ही नक्कीच आय२० एलिट स्पोर्ट्स हे मॉडेल घ्यावे. ह्य़ुंदाईची ही गाडी स्टर्डी आणि भारतातील सर्वात उत्तम अशी हॅचबॅक आहे.
* मी बहुतेकदा शहरातच गाडी चालवतो. क्वचित एखाद्या वेळी शहराबाहेर गावी वगरे गाडी नेतो. मला सुझुकी बालेनो, केयूव्ही१०० आणि आय१० यापकी कोणती गाडी घ्यावी याविषयी संभ्रम आहे. अतिरिक्त फीचर्सविषयी काय? सुरक्षा, सस्पेन्शन, मेन्टेनन्स, कम्फर्ट यांविषयी काय हे सांगावे. तुमच्या मते या तीनही गाडय़ांपकी कोणती चांगली आहे, तिच्या गुणदोषांसह?
– निखिल पाटील.
* तुम्हाला सर्वोत्तम कार कमी बजेटात आणि चांगल्या सुरक्षा फीचर्ससह पाहिजे असेल तर मी तुम्हाला मारुती बालेनो ही गाडी घेण्याचा सल्ला देईन. तिचे फीचर्स खूप छान आहेत आणि तिचा मायलेजही चांगला आहे आणि पॉवर खूप असून बालेनो वजनानेही हलकी आहे.
* माझे बजेट १० लाख रुपये असून मला प्रीमिअम हँचबँक / सेडान गाडीची आवड आहे. मला गाडी लाँग टर्मसाठी घ्यायची आहे. कृपया विस्तृत मार्गदर्शन करावे.
– संतोष नखाते, केज. जिल्हा बीड
* दीर्घकाळासाठी तुम्ही होंडा जॅझ व्हीएक्स हे मॉडेल घ्यावे. ही तुम्हाला पेट्रोलमध्ये उत्तम ठरेल. या गाडीचे इंजिन खूप टिकाऊ आहे आणि ते दीर्घकाळ टिकते. तुम्हाला रिजिड गाडी घ्यायची असेल तर फोक्सवॅगन पोलो जीटी ही गाडी घ्यावी. ही गाडी दणकट असून हिचा अ‍ॅव्हरेज जरा कमी आहे आणि मेन्टेनन्स जरा जास्त असेल.
* सर मला नवीन कार घ्यायची आहे. मी मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर, मिहद्रा केयू व्ही १००, टाटा झिका, टाटा झेस्ट किवा मिहद्रा टीयूव्ही ३०० घेण्याचा विचार करत आहे. याबाबत कोणती कार घेऊ? माहिती सांगा.
– अंबादास भोकरे
* टीयूव्ही३०० आणि स्विफ्ट या दोन्ही वेगळ्या गाडय़ा आहेत. तुम्हाला जर स्मूद कार चालवायची इच्छा असेल तर स्विफ्ट उत्तम कार आहे; पण जर तुम्ही रफ रोडवर किंवा हायवेवर गाडीचा जास्त वापर करणार असाल तर टीयूव्ही३०० किंवा फोर्ड इकोस्पोर्ट या दोन्ही गाडय़ा उत्तम ठरतील. कमी किमतीतील कम्फर्टेबल आणि स्मूद एसयूव्ही असेल तर इकोस्पोर्ट छान आहे.
* आमच्या घरात आम्ही पाच जण आहोत. मी प्रथमच गाडी घेणार आहे. बजेट चार लाख रुपये आहे. काय करू? मार्गदर्शन करा.
– विशाल कोळी, रायगड
* तुम्हाला वॅगन आर ही गाडी उत्तम ठरेल. ही गाडी चालवायला सोपी आहे आणि तुमच्या बजेटात बसणारी आहे. तसेच तुम्ही पाच जण आरामात या गाडीतून प्रवास करू शकाल.
* मी शेतकरी आहे. मला दररोज शेताकडे जावे लागते तसेच शेतीची अवजारे व खते खरेदी करण्यासाठी शहरात जावे लागते. सध्या माझ्याकडे मिहद्राची एक्सयूव्ही गाडी आहे. मला आता आणखी एक गाडी घ्यायची आहे. तुम्ही कोणती गाडी सुचवाल?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

– महेंद्र थोटे, नांदगाव
* मिहद्राची पिकअप गाडी चांगली ठरेल तुमच्यासाठी. ही गाडी दणकट असून तुमच्या गरजा पुरेपूर पूर्ण करणारी आहे.

 

– महेंद्र थोटे, नांदगाव
* मिहद्राची पिकअप गाडी चांगली ठरेल तुमच्यासाठी. ही गाडी दणकट असून तुमच्या गरजा पुरेपूर पूर्ण करणारी आहे.