- माझे बजेट पाच लाख रुपयांपर्यंत आहे. मला रेनॉ क्विड, सेलेरिओ आणि ह्य़ुंदाई ईऑन यातील एखादी कार घ्यायची आहे. पेट्रोल व्हर्जनला माझे प्राधान्य आहे. माझे मासिक ड्रायव्हिंग किमान १५० ते २०० किमी आहे. मी कोणती कार घेऊ.
– संजय मोहिते
- तुम्ही टाटाची नवीन टियागो घ्या. पाच लाखांत तुम्हाला टियागोचे एअरबॅग्जवाले मॉडेल मिळू शकेल. आणि १.२ लिटरचे इंजिनही या गाडीत आहे.
- सर मला सेकंड हँड कार घ्यायची आहे. तर त्यासाठी काय पाहणे गरजेचे आहे. माझे बजेट दोन ते तीन लाखांपर्यंतच आहे.
– शशिकांत पाठक
- सेकंड हँड कार घेताना तिचे टायर, बॉडी कंडिशन आणि गंज वगैरे गोष्टी तपासून घ्याव्यात. तसेच इंजिन फायरिंग आणि बॅटरी, सव्र्हिसिंग रेकॉर्ड हेही पाहून घ्यावे. नुसते गाडीचे रनिंग बघून ती घेणे योग्य नव्हे. तुमच्या बजेटमध्ये जुनी पाच-सहा वर्षे वापरलेली आणि ४० ते ६० हजार किमी प्रवास केलेली स्विफ्ट ही गाडी योग्य ठरेल.
- मी सध्या कारच्या शोधात असून मी सेलेरिओ आणि टियागो या दोन गाडय़ांच्या प्रेमात आहे. माझे मासिक रनिंग ३०० ते ५०० किमी असेल. कमी मेन्टेनन्स, चांगला मायलेज आणि सुरक्षेच्या दृष्टीने दर्जेदार अशी गाडी सुचवा.
– ओमकार पाटील
- मी तुम्हाला टाटा टियागो घेण्याचा सल्ला देईन. या गाडीला १.२ लिटरचे इंजिन असून ते प्रचंड ताकदीचे आहे. परंतु तुम्हाला ऑटो गीअर गाडी घ्यायची असेल तर सेलेरिओ हाच एक पर्याय आहे.