मी गाडी घेऊ इच्छितो. माझे बजेट सव्वालाखांपर्यंत आहे. माझा महिन्याकाठी अंदाजे सहा हजार किमीचा प्रवास होतो. कृपया मार्गदर्शन करावे.

धनंजय उजनकर

तुम्ही डिझेलवर चालणारी जुनी स्विफ्ट कार घ्यावी. किंवा रेनॉ लोगान ही गाडीही उत्तम आहे. आठ-दहा र्वष चाललेल्या या गाडय़ा तुम्हाला बाजारात सहज उपलब्ध होऊ शकतात.

सध्या माझ्याकडे व्ॉगन आर ही गाडी आहे. पण माझी मुले मोठी होत असल्याने मला सहा आसनी गाडी घ्यायची आहे. माझे बजेट साधारणत सात ते दहा लाख रुपये आहे. मला अर्टिगा डिझेल गाडी बरी वाटते. अजून काही चांगला पर्याय आहे का. माझा किमान ५०० किमी प्रवास होतो दरमहा.

संतोष ठाकूर

तुमचे महिन्याकाठी ५०० किमी रनिंग असेल तर तुम्ही शक्यतो पेट्रोलवर चालणारी गाडीच घ्यावी. तुम्हाला पेट्रोल अर्टिगा किंवा मग टीयूव्ही ३०० यापैकी कोणतीही एखादी गाडी योग्य ठरेल.

माझ्याकडे फियाटची पालिओ ही गाडी आहे. मी ती १५ वर्षांपासून वापरली आहे. आता तिच्या बदल्यात मला नवीन गाडी घ्यायची आहे. मला फियाट चांगली एक्स्चेंज ऑफरही देऊ करते आहे. मी पुण्टो (पेट्रोल व्हर्जन) ही गाडी निवडली आहे. कृपया सल्ला द्या.

सुहास कुलकर्णी

मला वाटतं तुम्ही डिझेलवर चालणारी पुण्टो घ्यावी. कारण या गाडीचे १२५० सीसीचे डिझेल इंजिन सर्वोत्तम आहे. या गाडीची भारतातील कामगिरी चांगली असून मायलेजही चांगला मिळतो.

 

सर, नमस्कार मी प्रथमच गाडी घेणार आहे. माझे बजेट सात लाखांपर्यंत आहे. माझे मासिक ड्रायव्हिंग ३०० ते ४०० किमी आहे. माझी एलिट आय२०, स्विफ्ट डिझायर एलएक्सआय एबीएस किंवा फोर्ड फिगो यापैकी कोणतीही एक पेट्रोल व्हर्जन गाडी घेण्याची तयारी आहे. मायलेज, मेन्टेनन्स, सुरक्षितता या दृष्टीने कोणती गाडी चांगली ठरेल.

शशिकांत जाधव, सिंधुदुर्ग

कम्फर्ट, सुरक्षितता आणि सव्‍‌र्हिसच्या दृष्टीने तुम्हाला एलिट आय२० ही उत्तम पेट्रोल कार ठरेल. ही कार इतर गाडय़ांच्या तुलनेत उत्तम प्रीमियम हॅचबॅक आहे. आणि एखाद्या लक्झरी कारचा फील या गाडीत येतो.

 

माझी कार एकाच जागी आठदहा दिवस उभी असते. त्यामुळे गाडीत उंदीर वगैरे शिरून वायर वगैरे कुरतडतात. त्यासाठी काय उपाय करता येईल.

राहुल चव्हाण

कार नेहमीच्या जागीच परंतु फिरवून लावा. चाकांवर डिझेल शिंपडा आणि इंजिनवरही डिझेल शिंपडा. उंदीर अजिबात येणार नाहीत.

या सदरासाठी प्रश्न पाठवा :  ls.driveit@gmail.com