मारुती बलेनो आणि फोर्ड फिगो यांपैकी कोणती डिझेल कार घेणे योग्य ठरेल.
– व्ही. घुईकर
फोर्ड फिगोचे १.५ लिटर क्षमतेचे इंजिन आहे ते १०० पीएस पॉवर आणि अतिशय मायलेज देणारे आहे. आणि या इंजिनाची पॉवरही जास्त आहे. त्यांची सव्र्हिसही खूप चांगली आहे. तुम्ही फिगो किंवा टोयोटा लिवाची निवड करावी.
सध्या बाजारात अनेक शोरूममध्ये ‘प्री ओण्ड’ गाडय़ा विक्रीसाठी उपलब्ध असतात. कृपया याबाबत माहिती द्या.
– जयंत बुवा
प्री ओण्ड कार चांगल्या असतात परंतु त्यांच्या किमती जरा जास्त असतात. परंतु ते सव्र्हिस आणि एक वर्षांची वॉरण्टी देतात. तसेच शोरूममधील प्री ओण्ड गाडय़ा व्यवस्थित चेक केलेल्या असतात. त्यामुळे अशा गाडय़ा घ्यायला काही हरकत नाही. मालकी हक्क म्हणाल तर काही प्रश्न नाही. ते गाडी आपल्या नावावर करून देतात.
मी व्यवसायाने डॉक्टर आहे. सध्या माझ्याकडे व्ॉगन आर व्हीएक्सआय ही गाडी आहे. मला ती बदलायची आहे. मला दरमहा किमान एक हजार किमी प्रवास करावा लागतो. जास्त करून मी ग्रामीण भागात फिरतो. मला एन्ट्री लेव्हलची सेडान गाडी घ्यायची आहे. कृपया मला गाडी सुचवा.
– मंदार
मी तुम्हाला ह्य़ुंडाई एक्सेंट पेट्रोल कार सुचवीन. सध्याची ती सर्वोत्तम सेडान आहे. तिचे सस्पेन्शनही चांगले आहे. तुम्ही फोर्ड फिगो अस्पायरचाही विचार करू शकता. ते चांगला मेन्टेनन्स पॅकेज देतात. तसेच अस्पायर ही गाडी स्पेशियस आणि चांगली आहे.
माझ्याकडे ह्य़ुंडाई एक्सेंट ही गाडी आहे. ती मी एप्रिल, २०१५ मध्ये घेतली होती. आतापर्यंत १२ हजार किमी रनिंग झाले आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरपासून ही गाडी मी वापरलेलीच नाही. ती पुन्हा सुरू करण्यासाठी आता मी काय खबरदारी घ्यावी?
– मिलिंद थुल
तुम्ही बॅटरी एक तर रिप्लेस तरी करावी किंवा मग चार्ज तरी करावी. पेट्रोल भरा. ऑइलचे प्रमाण तपासा. एअर फिल्टरची तपासणी करा आणि या सगळ्याची खातरजमा झाल्यानंतर एकदा स्टार्टरचा वापर करा. आणि काही मिनिटांनंतर पुन्हा स्टार्टरचे बटन दाबा. असे केल्यानंतरही गाडी स्टार्ट होण्यात अडचणी आल्या तर गाडी सव्र्हिस सेंटरला घेऊन जा.
मला नवीन कार घ्यायची आहे. जास्त जागा असलेली, कमी मेन्टेनन्स असणारी, चांगला मायलेज देणारी अशी गाडी मला हवी आहे. माझे बजेट सात लाख रुपयांपर्यंत आहे. कृपया मार्गदर्शन करा.
– के. धनंजय
तुमचे रनिंग जास्त असेल तर तुम्ही मारुती बलेनो घ्यावी. हिचा मायलेज उत्तम आहे. रनिंग कमी असेल तर आय२० इलाइट ही गाडी घ्यावी. हिचा मायलेज जरा कमी आहे, परंतु गाडी कम्फर्टला चांगली आहे.
या सदरासाठी प्रश्न पाठवा : ls.driveit@gmail.com