मला दहा लाखांपर्यंत पेट्रोल कार घ्यायची आहे. फोर्ड इकोस्पोर्ट ऑटोमॅटिक किंवा ह्य़ुंडाई क्रेटा यांपैकी लाँग ड्राइव्हसाठी कोणती गाडी चांगली आहे? मी गाडी वीकेंडलाच वापरतो.

महेश ठाकूर

Prime Minister Narendra Modis announcement to give guaranteed price of 6 thousand for soybeans
सोयाबीनला सहा हजारांचा हमीभाव देणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Shani gochar 2025
पुढील १३४ दिवसांचा काळ कमावणार बक्कळ पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार प्रत्येक कामात यश
gold prices dropping post Diwali it will reach 70000 per 10 grams soon
सोन्याचे दर ७० हजारांपर्यंत येणार? आणखी मोठी घसरण…
India Meteorological Department has warned a rain alert for 15 districts of Maharashtra state
‘या’ १५ जिल्ह्यांना १५ नोव्हेंबरला सतर्कतेचा इशारा !
indian rupee falls to all time low against us dollar
अग्रलेख : काका… मला वाचवा!
Moringa or drumstick
Fact check : खरंच शेवग्यामध्ये दह्यापेक्षा नऊ पट जास्त प्रथिने असतात? तज्ज्ञांनी केला खुलासा

या दोन्ही गाडय़ांचे मायलेज कमी आहे. पेट्रोलवर चालणाऱ्या फोर्ड इकोस्पोर्ट ऑटोमॅटिक साडेबारा लाखांपर्यंत मिळते. आणि क्रेटा मॅन्युअल दहा लाखांपर्यंत मिळेल. ऑटोमॅटिक गाडी घ्यायची असेल तर तुम्ही अर्टिगा पेट्रोल घ्यावी व मॅन्युअलमध्ये क्रेटा घ्यावी.

 

कृपया मला रेनॉ क्विड एएमटीबद्दल सांगावे. ८०० सीसीच्या क्विडमध्ये असलेली व्हायब्रेशनची समस्या या नव्या मॉडेलमध्ये आहे का? आणि मॅन्युअल गीअर स्टिक न देता डायल एएमटी दिल्याने काही समस्या येऊ शकतात का?

विनय उपाध्ये

रेनॉ क्विड एक हजार सीसीची आहे. त्यामुळे त्यात व्हायब्रेशनची समस्या नाहीत. परंतु स्पेस सेलेरिओपेक्षा कमी आहे. आणि ही गाडी मॅन्युअल मोडमध्ये नाही. त्यापेक्षा तुम्ही व्ॉगन आर किंवा सेलेरिओला प्राधान्य द्या.

 

पाच लाखांपेक्षा कमी किमतीत कोणती गाडी चांगली मिळते?

महेश कांबळे, गोवा

मी तुम्हाला टाटा टियागो पेट्रोल एक्सई ही गाडी घेण्याचा सल्ला देईन. ही गाडी तुम्हाला पाच लाखांपर्यंत मिळू शकेल. तुमच्या बजेटमध्ये बसणारी आहे.

 

माझे महिन्याला किमान एक हजार किमीचे ड्रायव्हिंग होते. मला प्रतिलिटर २५ किमी मायलेज देणारी गाडी हवी आहे. गाडी कमीतकमी पाच वर्षे मेन्टेनन्स फ्री असावी. काय करू, मार्गदर्शन करा.

सुनील वाघ

प्रतिलिटर २५ किमी असा मायलेज कोणतीही पेट्रोल गाडी देत नाही. तुमचे एकंदर मासिक ड्रायव्हिंग पाहता तुम्ही मारुती सेलेरिओ किंवा व्ॉगन आर घ्यावी. या गाडय़ा तुम्हाला १८ ते २० किमी मायलेज देतील.

 

माझे बजेट साधारण चार लाखांचे आहे. मी प्रथमच गाडी घेणार आहे. मी नुकतेच ड्रायव्हिंग शिकले आहे. आम्ही कुटुंबात पाच जण आहोत. आमच्यासाठी कोणती गाडी घेणे योग्य ठरेल

प्राजक्ता छाछड, ठाणे

मी तुम्हाला ह्य़ुंडाई ईऑन बेसिक मॉडेल सुचवेन, परंतु ही गाडी पाच जणांसाठी योग्य नाही. ही गाडी दीर्घकाळ टिकणारी आहे. शिवाय कम्फर्टसाठी चांगली आहे. तुम्हाला यूज्ड कार घ्यायची असेल तर चार वर्षे वापरलेली स्विफ्ट ही गाडी चांगल्या कंडिशनमध्ये मिळू शकेल.

या सदरासाठी प्रश्न पाठवा :  ls.driveit@gmail.com