आमचे बजेट साधारण चार ते पाच लाख रुपये आहे. आमचा गाडीचा मासिक वापर साधारण १०० ते १५० किमीच आहे. वर्षांतून दोनदाच दूरचा प्रवास होतो आणि तोही साधारण ४०० वगरे किमी असतो. क्विड, टियागो, अल्टो, गो प्लस आणि वॅगन आर यांपकी लो मेन्टेनन्स असणारी गाडी सुचवा. तसेच सीएनजीचा पर्याय चांगला आहे का, हेही सांगा.

स्नेहल सूर्यवंशी

तुमचे रिनग कमी असल्याने तुम्ही मारुतीचीच गाडी घ्यावी. त्यातही तुम्ही वॅगन आर एलएक्स हे मॉडेल घ्यावे. स्वस्तात मिळेल.

 

मी सेकंड हॅण्ड फोक्सवॅगन व्हेन्टो घेण्याच्या विचारात आहे. मी दररोज कार वापरणाऱ्यांतला नाही. फक्त कुटुांीयांच्या हौसेखातर मी गाडी घेणार आहे. फार फार तर महिन्याला १०० किमीचे ड्रायिव्हग होईल.

भूषण पाटील

होय, फोक्सवॅगन व्हेन्टो पेट्रोल ही चांगली कार आहे. खरे तर आरामाच्या दृष्टीने, लाँग ड्राइव्हकरिता वगरे ही सर्वोत्तम कार आहे. मात्र, सेकंड हॅण्ड व्हेन्टो घेताना ती चांगली मेन्टेन केली आहे का याची खातरजमा करून घ्या.

 

मला गाडी घ्यायची आहे आम्ही दोन भाऊ पुण्यात राहतो तरी किमी बजेट वाली गाडी सुचवावी.

एकनाथ जाधव

तुम्ही पुण्यात राहत आहात. त्यामुळे तुम्हाला नक्कीच अल्टो के१० ही गाडी योग्य ठरेल. ही गाडी कमी खर्चात तुम्हाला मिळू शकते. रिनग कमी असेल तर पेट्रोलवर चालणारी ुंदाई ईऑन बेसिक या गाडीचाही तुम्ही विचार करू शकता.

 

माझा रोज १०० किलोमीटरचा प्रवास होतो माला एकटय़ाला आणि कधी कधी फॅमिलीसाठी अशी गाडी घेऊ इच्छितो तरी मी डिझेलमधली थोडी रुबाबदार अशी कुठली गाडी घेऊ मी स्विफ्ट व्हीडीआय आणि टाटा टियागो याचा विचार करतोय. 

मििलद टेकावडे

तुमचे रिनग जास्त हायवेवर असेल तर नक्कीच फोक्सवॅगन पोलो टीडीआय घ्यावी. सिटीला जास्त रिनग असेल तर टियागो घ्यावी नाही तर स्विफ्टही चांगला पर्याय आहे. बजेट थोडे जास्त असेल तर स्विफ्ट डिझायर ऑटोमॅटिक ही गाडीही चांगला पर्याय ठरू शकेल.

 

मी पहिल्यांदाच गाडी घेणार असून मला ड्रायिव्हगचा अनुभव नाही. माझे ड्रायिव्हग जास्त करून प्रासंगिक आणि वीकेंडला असेल. माझे बजेट साडेपाच लाखांपर्यंत आहे. अल्टो के१०, सेलेरिओ, आय१०, टियागो आणि क्विड यांपकी कुठली गाडी घेण्याचा सल्ला द्याल?

एकनाथ धाऊसकर

मी तुम्हाला मारुती सेलेरिओ घेण्याचा सल्ला देईन. ही गाडी मेन्टेनन्सला स्वस्त आहे आणि कमी चालवणार असाल तर या गाडय़ा सíव्हसलाही सोप्या जातात.

या सदरासाठी प्रश्न पाठवा :  ls.driveit@gmail.com