सर मी सेडान सेगमेंटमध्ये गाडी घेण्याचा विचार करीत आहे. बजेट दहा लाखांपर्यंत आहे. आतापर्यंत मी होंडा सिटी, ह्य़ुंदाई वर्ना, सुझुकी सीएस तसेच निस्सान सन्नी यांपैकी एक घेण्याचा विचार करीत आहेत. कोणती गाडी घ्यावी, याबाबत कृपया मार्गदर्शन करावे.
–अनिल पेंदोर
पेट्रोल घ्यायची असेल तर अगदी हमखास ह्य़ुंदाई वर्ना घ्यावी. ती अतिशय आलिशान आणि आरामदायक गाडी असून मेन्टेनन्सही कमी आहे. आणि बाकी सगळय़ा सेडानच्या तुलनेत या गाडीचे इंजिन उत्तम आहे.
सर मला आर्मी कॅन्टीनमधून नवीन इको स्पोर्ट्स घ्यायची आहे. काय करावे.
–योगेश खोपडे
फोर्ड इकोस्पोर्ट्स डिझेल ही एक कॉम्पॅक्ट एसयूव्ही असून स्टर्डी गाडी आहे. म्हणजे ब्रेझ्झापेक्षा उत्तम अशी ही भक्कम गाडी असून, तुम्ही ती घेणे योग्यच ठरेल.
मी होंडा जॅझ घेण्याचा विचार करीत आहे. ही गाडी कशी वाटते?, कृपया मार्गदर्शन करावे.
–पुष्कराज यवतकर
तुम्ही होंडा जॅझ घेत असाल तर ठीक आहे. मात्र तिचा ग्राऊंड क्लीअरन्स कमी असल्याने उंच स्पीड ब्रेकर किंवा खराब रस्त्याला खाली लागते. तुम्ही डिझेल घेत असाल तर नक्कीच नवी आलेली टाटा नेक्सॉन घ्या. ती अतिशय उत्तम आहे.
फियाट पिन्टो इओ (डिझेल) बद्दल आपले मत सांगा. ग्राउंड क्लीअरन्स, बूट स्पेस, बसण्याची ऐसपैस जागा चांगली वाटते. दूरवरील प्रवासासाठी ही गाडी कशी आहे.
– नरेंद्र धुमाळ
पीन्टो इओ ही पैसे वसूल करणारी गाडी आहे. तुमचे रनिंग जास्त असेल तरच ही गाडी घ्या. ५ वर्षांत ही गाडी भरपूर वापरून घ्यावी. कारण नंतर सव्र्हिसिंगची समस्या येते.
मला परमिटसाठी गाडी घ्यायची आहे. मी वॅगनार किंवा डिझायर पाहत आहे. कोणती गाडी चांगली आहे ते सांगा?
–लक्ष्मण पुजारी
डिझायर परमिटसाठी उत्तम गाडी ठरेल. ती तुम्हाला डिझेल घ्यावी लागेल. तुमच्या इकडे सीएनजी असेल तर वॅगनार आर घ्यावी.
या सदरासाठी प्रश्न पाठवा : ls.driveit@gmail.com