मला हॅचबॅक कार घ्यायची आहे. माझे मासिक ड्रायव्हिंग ३०० किमीच्या आसपास आहे. मी मारुती सेलेरिओ सीएनजी किंवा व्ॉगन आर सीएनजी घेण्याच्या विचारात आहे. कृपया मला कोणती गाडी घ्यायची ते सुचवा .
– स्वप्निल ठाकूर
तुमचा मासिक प्रवास कमी असेल तर तुम्ही पेट्रोल कार घ्यावी असा सल्ला मी तुम्हाला देईन. तुम्ही पेट्रोल इग्निस ही गाडी घेऊ शकता. या गाडीजे सेफ्टी फीचर्स आणि मायलेजही चांगले आहे.
मी प्रथमच गाडी घेणार आहे. टीयूव्ही ३०० मला खूप आवडते. या गाडीविषयी मला माहिती द्या.
– कोंडिबा भालेराव
टीयूव्ही३०० ही उत्तम आणि परवडणारी अशी एसयूव्ही आहे. तिची किंमत सर्वात कमी असून ती स्टर्डी गाडी आहे. त्यात तुम्ही एएमटी घेतली तर अतिउत्तम. ती तुम्हाला दहा लाखांत मिळेल. तिचे मायलेजही १५ किमी प्रतिलिटर एवढे आहे.
माझे बजेट सात ते आठ लाख या दरम्यान आहे. या किमतीमध्ये मला कोणती गाडी घेण्यास उत्तम ठरेल
– मनीष गोळे
तुम्ही हॅचबॅकमध्ये होंडा डब्ल्यूआरव्ही घेऊ शकता. ती तुम्हाला ८.५० लाखामध्ये मिळेल. सेडान हवी असेल तर मारुतीची नवीन डिझायर घ्यावी. तुमची काही वेळ थांबण्याची इच्छा असेल तर फोर्ड अॅस्पायरसुद्धा उत्तम आहे.
मला ग्रामीण भागात वापरण्यासाठी फॅमिली कार घ्यायची आहे. माझे बजेट १० ते १२ लाखापर्यंत आहे. मी ब्रेझा किंवा क्रेटा घेण्याचा विचार करतोय. पर्याय सुचवा
– शुभम सावंत
ब्रेझा तुम्हाला ८ ते ९ लाखांत मिळेल. पण जरा कन्फर्ट कमी आहे. आणि इंजिनचा आवाजदेखील येतो. तुम्ही क्रेटा किंवा टीयूव्ही ३०० ऑटोमॅटिक घ्या. तुम्हाला ती मेंटेनन्स करण्यासाठी चांगली उपयोगी ठरेल.
माझे चौकोनी कुटुंब आहे. बजेट सात ते आठ लाख या दरम्यान आहे. वर्षांला १० ते १२ हजार किमीचा प्रवास होतो. नियमित वापर होत नाही. कधी कधी एक-दीड महिना गाडी जागेवरच असते. मी बलेनो अल्फा पेट्रोल मॉडेल घेण्याचा विचार करतोय. कृपया मार्गदर्शन करा.
– प्रकाश लोखंडे
तुम्ही पेट्रोल गाडी घेतलेली उत्तमच. तुम्ही नक्कीच होंडा डब्ल्यूआरव्ही घ्यावी. बलेनोदेखील सरस आहे, मात्र हायवेवर प्रवास करताना ती जरा अस्थिर वाटते.
या सदरासाठी प्रश्न पाठवा : ls.driveit@gmail.com