माझे बजेट दोन लाख रुपये आहे. माझे रोजचे रनिंग ४० ते ४५ किमी आहे. माझ्यासाठी कोणती गाडी चांगली ठरेल. किंवा सेकंड हँड गाडी सुचवली तरी चालेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अन्वर मोमीन

तुमचे बजेट दोन लाख रुपये असेल तर तुम्ही त्या किमतीत सेकंड हँड शेवरोले बीट डिझेल ही गाडी घ्यावी. पाच-सहा र्वष वापरलेली गाडी घ्यावी. किंवा व्ॉगन आर सीएनजी गाडी घ्या.

मारुती सुझुकी ईको ही गाडी कुटुंबासाठी चांगली गाडी आहे का.

शशी जाधव

मारुती ईको ही गाडी पूर्णपणे कार्गो कार किंवा प्रवासी कार आहे. कुटुंबासाठी ही गाडी घेणे म्हणजे पैशांचा अपव्यय आहे. तसेच रिस्की कार आहे. तुम्ही हॅचबॅक गाडी घ्या किंवा मग महिंद्रा केयूव्ही१०० ही गाडी घ्या.

मला सेकंड हँड गाडी घ्यायची आहे. माझे बजेट दीड ते दोन लाख रुपये आहे. माझे मासिक ड्रायव्हिंग २०० किमीपर्यंत आहे. माझ्यासाठी कोणती गाडी सर्वोत्तम ठरेल. तसेच सेकंड हँड गाडी घेताना काय पथ्य पाळायला हवीत.

सुरेश शिंदे

तुम्ही स्विफ्ट पेट्रोल किंवा फोक्सव्ॉगन पोलो या गाडय़ा घेऊ शकतात. मात्र, त्या सेकंड हँड दोन लाखांत उपलब्ध असायला हव्यात. तुम्ही आठ-नऊ वर्षे वापरलेल्या गाडय़ा घेऊ शकता.

मला नवीन कार घ्यायची आहे. माझे बजेट १५ ते २० लाख रुपये आहे. मी सेडान घ्यावी की एसयूव्ही. माझे मासिक ड्रायव्हिंग एक हजार किमीपेक्षा कमी आहे.

सचिन कुलकर्णी

सेडान किंवा एसयूव्ही घ्यायची हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहे. तुमच्या नेहमीच्या मार्गावर गतिरोधक जास्त असतील आणि रस्ता खडकाळ असेल तर तुम्ही ह्य़ुंडाई क्रेटा घ्या. मात्र, तुमच्या मार्गात रस्ते चांगले असतील तर तुम्ही नवी आलेली ह्य़ुंडाई एलांत्रा किंवा स्कोडा ओक्टाव्हिया किंवा कोरोला अल्टीस या गाडय़ांपैकी एकीची निवड करू शकता.

या सदरासाठी प्रश्न पाठवा :  ls.driveit@gmail.com