मला नवीन कार खरेदी करायची आहे. डिझायर, एक्सेंट आणि फोर्ड अस्पायर यांच्यापैकी कोणती कार चांगली आहे. आणि सर्व सेकंड टॉप मॉडेलची किंमतही सांगा.
– प्रदीप जाधव
तुम्ही डिझायरचा पर्याय निवडावा. परंतु त्या गाडीला वेटिंग खूप आहे. त्यामुळे तुम्ही फोर्ड अस्पायरचा पर्याय निवडू शकता.
माझे बजेट पाच लाख रुपये आहे. इऑन, क्विड किंवा सेलेरिओ यांपैकी कोणती गाडी घेऊ.
– नातू येंगाडे
तुम्ही मारुतीची इग्निस घेणे जास्त योग्य ठरेल. त्या गाडीत पॉवर उत्तम आहे. तसेच बेसिक मॉडेलमध्येही एअरबॅग्ज आहेत.
मला पेट्रोलची केयूव्ही१००, फोर्ड फिगो, लिवा, स्विफ्ट यांपैकी कोणती गाडी घ्यावी हे सुचवा. मला लाँग ड्राइव्हला जायला आवडते. कमी मेन्टेनन्स व रिसेल व्हॅल्यू चांगली मिळेल, अशी गाडी सुचवा.
– आशुतोष नांदेडकर
रिेसेल व्हॅल्यू जास्त मिळेल, अशी एकच गाडी आहे आणि ती म्हणजे स्विफ्ट पेट्रोल. ती पॉवरफुल तर आहेच शिवाय स्पेस आणि कम्फर्टच्या बाबतीत उत्तम आहे आणि सव्र्हिस कॉस्टही कमी आहे.
मला सेकंड हँड कार घ्यायची आहे. बजेट जास्तीत जास्त पावणेदोन लाख रुपये एवढेच आहे. हॅचबॅक अथवा सेडान यांपैकी एखादी चांगली गाडी सुचवा. माझा रोजचा प्रवास २० ते ३० किमी आहे.
– सनील पाटणे
पाच-सात वर्षे वापरलेली कोणतीही गाडी तुम्ही घेऊ शकता. आय१० आणि व्ॉगन आर हे सर्वोत्तम पर्याय आहेत. परंतु सेकंड हँड गाडी विकत घेण्यापूर्वी त्या किती किमी फिरल्या आहेत, हे पाहावे. तसेच योग्य त्या सव्र्हिस सेंटरमधूनच त्यांचे सव्र्हिसिंग करून घ्यावे.
माझ्याकडे मारुती सुझुकी इको ही गाडी आहे. तिचा वापर मी टुरिस्ट गाडी म्हणून करतो. मात्र, ती मला आता परवडत नाही. म्हणून चार आसनी गाडी घेण्याचा विचार आहे. कृपया मार्गदर्शन करा.
– सचिन अरुडे
टुरिस्टसाठी जर सिटीमध्ये गाडी हवी असेल तर ह्य़ुंडाई एक्सेंट उत्तम आहे. तिचे इंजिन स्मूथ आहे आणि मायलेजही उत्तम आहे. तसेच चालवायलाही सोपी आहे. परंतु तुम्हाला रफ रोडवर गाडी चालवायची असेल तर टाटा झेस्ट घ्यावी.
या सदरासाठी प्रश्न पाठवा : ls.driveit@gmail.com