माझे बजेट सात लाख रुपये आहे. माझे मासिक ड्रायव्हिंग सुमारे एक हजार किमी आहे. सध्या माझ्याकडे ह्य़ुंडाई ईऑन ही गाडी आहे. मला दुसरी गाडी हवी आहे. कृपया मार्गदर्शन करा. मला फोर्ड फिगो आवडते.
– अमोल देशमुख
मी तुम्हाला फोक्सव्ॉगन अॅमियो पेट्रोल ही गाडी घेण्याचा सल्ला देईन. ही सर्वात कम्फर्टेबल गाडी आहे. सेडान प्रकारातील ही सर्वोत्तम गाडी आहे. नाहीतर फोर्ड अस्पायर या गाडीचाही पर्याय तुमच्यासाठी चांगला ठरेल. मेन्टेनन्स कमी आणि चांगली मायलेज असलेली ही गाडी आहे.
नवी मारुती ऑटोमॅटिक सेलेरिओ पेट्रोल गाडी कितीला मिळेल. रोज ५० किमीसाठी किती अॅव्हरेज ही गाडी देईल.
– पौर्णिमा शेंडे, चेंबूर
५० किमी जर हायवे रनिंग असेल तर नक्कीच २१ किमी प्रतिलिटर अॅव्हरेज मिळेल. शहरात वाहतूककोंडी असेल तर १५ किमी प्रतिलिटर अॅव्हरेज देईल.
मी अलीकडेच गाडी चालवायला शिकलो आहे. मी प्रथमच गाडी विकत घेणार आहे. चार माणसांसाठी कमीत कमी मेन्टेनन्स असलेली चांगली मायलेज देणारी गाडी कोणती. महिना ६०० किमीचा प्रवास आहे. तसेच वर्षांतून दोनदा बाहेरगावी जातो.
– जयंत ओक
बजेट सात लाखांपर्यंत असेल तर नवीन मारुती डिझायर पेट्रोल गाडी घेण्याचा मी तुम्हाला सल्ला देईन. दुसरा पर्याय म्हणजे फोक्सव्ॉगन अॅमियो. ही उत्तम गाडी आहे.
या सदरासाठी प्रश्न पाठवा : ls.driveit@gmail.com