भारतीय सैन्यातील ८० महिला अधिकाऱ्यांना कर्नल पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. या पदोन्नतीनंतर सैन्यातील विविध तुकड्यांचे नेतृत्व करण्याची संधी या महिला अधिकाऱ्यांना मिळणार आहे. विशेष म्हणजे आणखी २८ महिला अधिकाऱ्यांना कर्नल पदावर पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. भारतीय सैन्यातील विशेष निवड समितीने हा निर्णय घेतला आहे. महिला अधिकाऱ्यांना पुरुष अधिकाऱ्यांच्या बरोबरीने आणण्याचा भारतीय सैन्याचा प्रयत्न आहे.
हेही वाचा – ‘ती’ने मासिक पाळीलाच पत्र लिहिले! ( भाग २ )
इंडियन एक्सप्रेस दिलेल्या वृत्तानुसार, भारतीय सैन्यातील विविध विभागातील १०८ पदे रिक्त आहेत. या १०८ जागांसाठी १९९२ ते २००६ दरम्यान रुजू झालेल्या २४४ महिला अधिकाऱ्यांच्या नावाचा विचार सुरू आहे. यापैकी ८० महिला अधिकाऱ्यांना कर्नल पदावर बढती देण्यात आली आहे. रिक्त असलेल्या १०८ जागांमध्ये अभियंता, सिग्नल्स, आर्मी एअर डिफेन्स, इंटेलिजन्स युनिट, आर्मी ऑर्डीनन्स युनिट आणि इलेक्ट्रीशन विभागाचा समावेश आहे. यापैकी सर्वाधिक २८ जागा अभियंता विभागात रिक्त आहेत. यासाठी ६५ महिला अधिकाऱ्यांच्या नावाचा विचार सुरू आहे. तर आर्मी ऑर्डीनन्स युनिटमध्ये १९ जागा रिक्त आहेत, यासाठी ४७ महिला अधिकाऱ्यांच्या नावाचा विचार सुरू आहे.
हेही वाचा – जिनिलीया, चांगली बायको व्हायला आम्ही पण दारुड्या नवऱ्याचा त्रास सहन करायचा का?
याचबरोबर आर्मी एअर डिफेन्समधील तीन रिक्त जागांसाठी सात महिला अधिकाऱ्यांच्या नावाचा विचार सुरू आहे. तर इंटेलिजन्स युनिट विभागातही पाच जागा रिक्त आहेत, यासाठीसुद्धा सात महिला अधिकाऱ्यांच्या नावाचा विचार सुरू आहे. दरम्यान, यासंदर्भात बोलताना, महिला अधिकारी म्हणाल्या, ”या पदोन्नतीला थोडा उशीर झाला असला तरी आम्हाला आनंद झाला आहे. आमची मेहनत आणि चिकाटीमुळेच हे शक्य झालं आहे. या दिवसाची आम्ही आतूरतेने वाटत बघत होतो”