Marathi Kirtankar Bharti Tai Adsul : आजच्या इन्फ्लुअन्सरच्या जगात सोशल मीडियावर हजारो लोक व्हिडीओ करून व्यक्त होतात आणि तरुणाईंची संख्या यामध्ये सर्वात जास्त आहे. आज आपण अशाच एका तरुणीविषयी जाणून घेणार आहोत, जी इन्फ्लुअन्सर नाही तर किर्तनकार आहे. त्या समाजप्रबोधन करतात. अध्यात्मिक दृष्टीकोनातून लोकांना मानवी मुल्ये समजून सांगण्याचा प्रयत्न करतात. धाराशिव जिल्ह्यातील ह. भ. प. युवा किर्तनकार भारतीताई आडसूळ दिवाणे फक्त २४ वर्षांच्या आहेत. त्या गावोगावी जाऊन किर्तनाद्वारे समाजप्रबोधन करतात. इन्स्टाग्रामवर रिल टाकून त्या त्यांच्या भावना व्यक्त करू शकतात, समाजप्रबोधन करू शकतात पण त्यांनी किर्तनाचा मार्ग निवडला. लोकसत्ताशी बोलताना भारतीताई आडसूळ यांनी त्यांच्या अद्भूत प्रवासाविषयी सांगितले आहे.

भारतीताई आडसूळ कोण?

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
eknath shinde
Eknath Shinde: एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते? ‘दाल…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

भारतीताई आडसूळ सांगतात, “मी अत्यंत सर्वसामान्य घरात जन्मलेली मुलगी आहे. आम्ही घरात ४ माणसे, त्यात आई वडिल शेती करायचे. किर्तनाचा वारसा हा मला माझ्या आजोबांकडून मिळाला. माझे आजोबा किर्तन करायचे. मी जेव्हा इयत्ता नववीमध्ये शिकत होते तेव्हापासून किर्तन करते. २०१४ पासून मी किर्तनाला सुरूवात केली. मी एम. कॉम. बीएड केले आहे. मला शिक्षिका व्हायचे आहे, कारण मला समाजप्रबोधन करायला आवडते. समाजात मानवी मुल्यांचा प्रसार व्हावा, हाच माझा हेतू आहे. लहानपणापासून किर्तनाची आवड असल्याने पुढे मी किर्तन हेच माझे ध्येय ठरवले.”

देव न मानणाऱ्या तरुण मंडळीविषयी त्या काय सांगतात?

भारतीताई पुढे सांगतात, “आजच्या जगात देव न मानणारे अनेक तरुण मंडळी तुम्हाला दिसतील. पण देवाशिवाय गत्यंतर नाही कारण प्रत्येक ठिकाणी तो आहे. फक्त देव आपल्याला कुठे दिसतो, हे आपल्या दृष्टीकोनावर अवलंबून असते. मी किर्तनाचा मार्ग निवडला, कारण मला यातून आनंद मिळतो. मला चालू घडामोडींवर लोकांचे समाजप्रबोधन करायला आवडतं. काळानुसार मी किर्तनाची शैली बदलली आहे. कारण मला वाटतं मी एक तरुणी आहे आणि तरुणांचे समाज प्रबोधन करण्यासाठी त्यांना समजेल अशा भाषेचा प्रयोग मी करते.”

किर्तनाद्वारे ज्वलंत व सामाजिक समस्या त्या मांडतात…

त्या सांगतात “मी वारकरी संप्रदायाचा एक भाग आहे, याचा मला अभिमान आहे. माझ्याकडून लोकांचे समाजप्रबोधन होते, याचे समाधान आहे. माझ्या किर्तनातून मी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी सांगते, छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास सांगते, आईवडिलांविषयी बोलते, स्त्रीभ्रूण-हत्या अशा ज्वलंत व सामाजिक समस्यांवर भाष्य करते. मी प्रत्येक विषयावर समाज प्रबोधन करण्याचा प्रयत्न करते. समाजाला चांगले मार्गदर्शन मिळावे, असा माझा नेहमी प्रयत्न असतो.”

हेही वाचा : World Cancer Day 2024 : ऑपरेशन, केमोथेरपी, न संपणाऱ्या वेदना अन् नवऱ्याची साथ…, कर्करोगाला हरवलेल्या तरुणीची कहाणी

भारतीताईंनी गावोगावी जाऊन समाजप्रबोधन केले आहे. दरवर्षी दिला जाणारा मानाचा राज्यस्तरीय “छत्रपती संभाजी महाराज गौरव पुरस्कार” त्यांना मिळाला आहे. याशिवाय झी टॉकीज या वाहिनीवरील ‘मन मंदिरा – गजर भक्तीचा’ या कार्यक्रमातसुद्धा त्यांनी सहभाग घेतला होता. आजच्या डिजिटल जगात वावरताना त्या सोशल मीडियाचा सुद्धा समाजप्रबोधनासाठी खूप प्रभावीपणे वापर करतात.

स्त्रियांमध्ये जग बदलण्याची ताकद आहे, फक्त योग्य मार्ग निवडा

भारतीताईंचे नुकतेच लग्न झाले. त्या सांगतात, “सासरची माणसे खूप सहकार्य करतात. त्यांना माझे किर्तन करणे खूप आवडते. आयुष्यात चांगला जोडीदार भेटणे, हा नशीबाचा भाग असतो आणि याबाबतीत मी खूप नशीबवान आहे.” भारतीताई फक्त २४ वर्षांच्या आहेत. एक स्त्री घर सांभाळू शकते, नोकरी करू शकते, एवढंच काय तर समाज प्रबोधनसु्द्धा करू शकते. स्त्रियांमध्ये जग बदलण्याची ताकद आहे. तिला फक्त मार्ग निवडावा लागतो. भारतीताई समाजासाठी एक उत्तम उदाहण आहेत. आजच्या एआय(AI)च्या जगात नोकरीसाठी स्पर्धा वाढली आहे. मात्र भारतीताईने निवडलेला मार्ग हेच सांगतो की काही लोक निरपेक्षपणे फक्त समाजाच्या कल्याणासाठी काम करतात. कोणत्याही परतफेडीची अपेक्षा न करता.

Story img Loader