लग्न करून सासरी जाणं हे प्रत्येक मुलीच्या नशिबी लिहिलेलं असतं. पण, बऱ्याच मुली नोकरी करीत असतात. अशातच लग्न झाल्यावर बहुतांशी ठिकाणी नवरा आणि सासरच्या इतर व्यक्तींकडून नोकरी करण्यास नकार असतो. मात्र, आता समोर आलेल्या प्रकरणामध्ये चक्क एका मोठ्या नामवंत कंपनीनेच विवाहित महिलांना नोकरी नाकारली आहे. तमिळनाडूमध्ये फॉक्सकॉन कंपनीचा कारखाना आहे. या कारखान्यात विवाहित महिलांना नोकरी नाकारण्यात येत असल्याची बाब पुढे आली आहे. त्यानंतर या कंपनीवर मोठ्या प्रमाणात टीका झाल्यावर फॉक्सकॉन इंडिया ॲपल आयफोन प्लांटमध्ये विवाहित महिलांना काम करण्याची परवानगी नसल्याच्या मुद्द्यावर कामगार आणि रोजगार मंत्रालयाने बुधवारी तमिळनाडूच्या कामगार विभागाकडून सविस्तर अहवाल मागविण्यात आला होता. त्यावर आता कंपनीने स्पष्टीकरण दिले आहे. मात्र, या स्पष्टीकरणानंतर वाद थांबणार का? त्याआधी पाहू की कंपनीनं नेमकं काय स्पष्टीकरण दिलं. या संदर्भात दी इंडियन एक्स्प्रेसनं वृत्त दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जगातील सर्वांत मोठी मोबाइल कंपनी असलेल्या ॲपल आयएनसी कंपनीने भारतातही आयफोन मोबाईलचे उत्पादन सुरू केले आहे. यापुढे ॲपलची इतर उपकरणेही भारतात उत्पादित करण्याची योजना कंपनीने आखलेली आहे. भारतात आयफोन उत्पादित करण्याचे काम फॉक्सकॉन कंपनीकडून करण्यात येते. तमिळनाडूमध्ये फॉक्सकॉन कंपनीचा कारखाना आहे. त्यामध्ये विवाहित महिलांना नोकरी नाकारल्याच्या चर्चेनंतर कंपनीनं सरकारला कळवले आहे की, त्यांच्या नवीन कर्मचारी भरतीमध्ये २५ टक्के विवाहित महिला आहेत. त्यामुळे विवाहित महिलांना नोकरी नाकारल्याची माहिती खरी नाही. मात्र, हे दावे करणारे असे लोक किंवा उमेदवार असतील; ज्यांना नोकरीवर घेतलेलं नाही किंवा फॉक्सकॉनमध्ये आता ते काम करीत नाहीत.

ॲपलमध्ये किती टक्के विवाहित महिला?

फॉक्सकॉन कारखान्यात सध्या सुमारे ७० टक्के महिला आणि ३० टक्के पुरुष कार्यरत आहेत. तर, तमिळनाडू कारखाना हा देशातील महिलांच्या रोजगारासाठी सर्वांत मोठा कारखाना आहे आणि एकूण रोजगार ४५ हजार कामगारांना कंपनीनं रोजगार दिला आहे.

कंपनीनं अहवालात असंही नमूद आहे की, हिंदू विवाहित महिलांनी सुरक्षेच्या मुद्द्यामुळे गळ्यात कोणत्याही धातूचे दागिने घालू नयेत, असे आधीच स्पष्ट केले हाते. फक्त महिलांनीच नाही तर कोणत्याही व्यक्तीने कारखान्यात काम करताना धातूची वस्तू शरीरावर न ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे इथेही कोणताच भेदभाव होत नाहीये हे लक्षात घेऊन सरकारने वस्तुस्थिती लक्षात घेतली पाहिजे. सुरक्षिततेच्या कारणास्तव कारखान्यात धातू परिधान केलेल्या कोणालाही काम करण्याची परवानगी नाही. अनेक उद्योगांमध्ये या बाबीचे पालन केले जाते.

हेही वाचा >> सार्वजनिक शौचालयात महिलांकडून पैसे आकारल्यास कारवाई होणार, कुठे झाला नियम? न्यायालयाचं म्हणणं काय?

नेमके काय घडले होते?

रॉयटर्सने दिलेल्या बातमीनुसार मार्च २०२३ मध्ये पार्वती आणि जानकी नावाच्या दोन महिला फॉक्सकॉन या कंपनीत काम मागण्यासाठी गेल्या होत्या. दोघींचे वय साधारण २० वर्षांच्या आसपास असल्याचे सांगितले गेले. कारखान्याच्या प्रवेशद्वारावर सुरक्षा रक्षकाने त्यांना विवाहित आहात का, असा प्रश्न विचारला. तेव्हा दोघींनी विवाहित असल्याची माहिती दिली, तेव्हा त्यांना तेथूनच परत पाठविले गेले.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 25 of new hires are married women nearly 70 of workforce are women foxconn chdc srk