90-Year-Old Texas Woman Earns Her Master’s Degree : शिक्षण ही एकमेव अशी संपत्ती आहे, की जी कोणी चोरू शकत नाही, असे अनेकदा म्हटले जाते. त्यामुळे अनेक जण आपापल्या परीने शिक्षणरूपी संपत्ती गोळा करीत असतात. शिक्षण घेण्याची जर जिद्द असेल, तर वय आणि आर्थिक स्थिती कधीही अडथळा ठरू शकत नाही. एखादी व्यक्ती तिला पाहिजे तेव्हा कोणत्याही वयात शिक्षण घेऊ शकते. जगात असे अनेक लोक आहेत; जे उतारवयातही शिक्षण घेण्यासाठी प्रयत्न करित आहेत. अशा प्रकारे अमेरिकेतील टेक्सासमधील एका महिलेने शिक्षणाची जिद्द ठेवली आणि वयाच्या ९० वर्षी नॉर्थ टेक्सास विद्यापीठातून पदव्युत्तर पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले; ज्यामुळे त्या इतिहासातील सर्वात वयस्कर पदवीधर ठरल्या आहे. या ९० वर्षीय महिलेचे मिन्नी पायने, असे नाव आहे. १७ डिसेंबर रोजी त्यांनी आंतरविद्याशाखीय अभ्यासात ही पदव्युत्तर पदवी मिळवली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मिन्नी पायने त्यांनी २००६ मध्ये टेक्सास वूमेन्स युनिव्हर्सिटीमधून सामान्य अध्ययनात बॅचलर पदवी मिळवली. त्यावेळी त्यांचे वय ७३ होते. पदवीनंतर १६ वर्षे त्यांनी कॉपी एडिटर म्हणून काम केले आणि सध्या त्या एता ह्युस्टन मॅगझिनमध्ये काम करीत आहेत. तिथे त्या शक्य तितका काळ काम करण्यासाठी योजना आखत आहे.

त्यांच्या या प्रवासाबद्दल मिन्नी पायने सांगतात, “मी माझे अंडरग्रॅज्युएटचे शिक्षण सुरू करण्यापूर्वी मी एक ट्रान्सक्रिप्शनिस्ट आणि वर्ड प्रोसेसर म्हणून काम करीत होती. त्यावेळी सकाळी ७ वाजता टेक्सवर पोहोचायची. त्या काळात मी सकाळी ४.३० वाजता उठायचे, कॉफी प्यायचे, रस्त्यावर फेटफटका मारायची, मग चर्चमध्ये जाऊन आनंदी नोट्स लिहायचे. मी सकाळी नाश्ता करायची, आंघोळ करायचे आणि मग तयार होऊन कामावर पोहोचायची.

मिन्नी पायने यांचे लेखनप्रेम

मिन्नी पायने यांनी युनिव्हर्सिटी ऑफ नॉर्थ टेक्सास (UNT)मधून 3.88 GPA सह पदवी प्राप्त केली. विशेष म्हणजे मिन्नी पायने यांचा २३ वर्षांचा नातू त्यांचा बॅचमेट होता; जो त्यांना पदवी घेत असताना त्यांच्याबरोबर होता. त्याने आजीचा हात पकडून हळू तिला व्यासपीठावर नेले. पायने यांनी पदवी मिळाल्यानंतर कॅमेऱ्यांसमोर पोज दिल्या, त्यावेळी उपस्थित लोकांनी त्यांचे टाळ्यांच्या कडकडाटात अभिनंदन केले; तसेच त्यांचे शिक्षणावर असलेल्या प्रेमाचे कौतुक केले.

त्यावर बोलताना मिन्नी पायने यांनी यूएसए टुडेला सांगितले, “ही एक प्रकारे अविश्वसनीय घटना आहे. टेक्सासच्या कॉलेज स्टेशनमध्ये राहणारी लेखिका ग्रीनविलेपासून १६ मैलांवर असलेल्या दक्षिण कॅरोलिनामधील एका लहानशा गावात लहानाची मोठी झाली. त्या काळी तिचे कुटुंब कापड व्यवसाय करीत होते; पण त्यांच्याकडे फारसे पैसे नव्हते.”

त्या पुढे सांगतात की, मी खूप लहानशा जगात राहत होते. जिथे एक चित्रपट (थिएटर), एक औषधांचे दुकान, एक पोस्ट ऑफिस, एक सर्व्हिस स्टेशन, एक किराणा दुकान, अशी परिस्थिती होती. १९५० मध्ये हायस्कूलपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. लिपीक म्हणून रिअल इस्टेटची नोकरी मिळेपर्यंत त्यांनी कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेतले.

त्यानंतर १९६१ मध्ये त्यांनी दिवंगत पती डेल यांच्याशी लग्न केले आणि दक्षिण कॅरोलिना इंडस्ट्रियल कमिशनसाठी कोर्ट रिपोर्टर म्हणून काम केले. ३० वर्षे टेक्सासमध्ये स्थायिक होण्याआधी त्या त्यांच्या पतीच्या नोकरीनिमित्त अनेक राज्यांमध्ये राहिल्या; पण लग्नानंतर दोन मुलांची काळजी घेण्यासाठी त्या काही काळ घरीच राहिल्या. त्यानंतर वयाच्या ३० व्या वर्षी त्या पर्यायी शिक्षिका, ट्रान्सक्रिप्शनिस्ट आणि वर्ड प्रोसेसर बनल्या.

त्यांना पत्रकारितेचा अभ्यास करायचा होता म्हणून ६० च्या उत्तरार्धात त्यांनी ‘टीडब्ल्यूयू’मध्ये प्रवेश घेतला. त्यावेळी त्यांनी TWU, UNT आणि टेक्सास A&M युनिव्हर्सिटी- विद्यार्थ्यांना तिन्ही विद्यापीठांमध्ये अभ्यासक्रम घेण्याची परवानगी देणार्‍या कार्यक्रमात भाग घेतला. त्या काळात पत्रकारितेसंदर्भातील कार्यक्रम टप्प्याटप्प्याने बंद केला जात होता; पण त्यांना तो काहीही करून पूर्ण करायचा होता. त्यावेळी पायने यांचे दोन पत्रकारितेचे अभ्यासक्रम पूर्ण करायचेच होते. यावेळी त्यांना यूएनटीमध्ये पत्रकारितेचे तीन अभ्यासक्रम आणि एक व्यवसाय अभ्यासक्रम घेण्याची परवानगी देण्यात आली.

कोरोना महामारीच्या काळात त्यांना आपले शिक्षण काही वेळ अपूर्ण राहणार की काय, असे वाटत होते; पण ऑनलाइन अभ्यासक्रम चालू ठेवत, त्यांनी पदव्युत्तर पदवी पूर्ण केली. त्याविषयी त्या सांगतात की, मला असे वाटते की, एकदा एखाद्या व्यक्तीने स्वत:च्या व्यक्तिमत्त्वविकासाला सुरुवात केली त्याप्रमाणे स्वतःच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणाऱ्या इतरांशी मिसळायला सुरुवात केली की, त्यांना उच्च ध्येयांकडे जाण्यासाठी प्रोत्साहन मिळते. मला चांगले काहीतरी करायचे होते. मी अनेक रात्री जागून अभ्यासात बराच वेळ घालवला. त्यात लेखन हा सर्वांत आनंददायक भाग होता, असेही पायने म्हणाल्या.

मिन्नी पायने सांगतात की, जेव्हा तुम्ही लिहिता तेव्हा तुम्ही खरोखर वेगळ्याच जगात असता. तुम्ही तुमची कल्पनाशक्ती वाढवता आणि त्यामुळे लेखन माझ्यासाठी खूप उपचारात्मक आहे. त्यांना लोकांमध्ये मिसळणे आणि लोकांकडून कथा ऐकायला खूप आवडते.

पायने पुढे म्हणाल्या, “मी एक मोठी कामगिरी केली आहे; पण मला असे वाटते की, मला अजूनही खूप चांगले जीवन जगायचे आहे. मला शेवटच्या क्षणापर्यंत काम करायचे आहे. कारण- जर मी काही फायदेशीर करीत नाही, मी एखाद्याला मदत करण्यासाठी काही करीत नाही, तर मी आनंदी कॅम्पर होऊ शकत नाही.”

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 90 year old woman completes masters degree as oldest graduate sjr
Show comments