नीलिमा किराणे

मेधा आणि तिची सहावीतली लेक इरा एका प्रदर्शनात शॉपिंग करत होत्या. समोरच्या स्टॉलवाल्याशी वरच्या पट्टीत हुज्जत घालणारी अर्चना दिसली तशी मेधा विरुद्ध दिशेने निघाली, पण अर्चनाने त्यांना पाहिलंच. तिने हाक मारल्यावर मेधाचा नाइलाज झाला. अर्चना म्हणजे इराच्या मैत्रिणीची आई. ऑफिसर, डॉमिनेटिंग, अधिकार अंगात मुरलेला आणि आवाज खणखणीत. तिच्याशी काय बोलावं ते मेधाला कळायचं नाही. कारण काहीही सांगितलं की त्याहून वरचढ अनुभव सांगण्याची अर्चनाची सवय होती. तिच्या ओळखीचा प्रत्येक माणूस ग्रेटच असायचा. आपला किंवा परिचितांचा ‘भारी’पणा सांगितल्याशिवाय कुणाचं बोलणं नुसतं ऐकून घेणं तिला जमायचं नाही. त्यामुळे मेधाची मनातल्या मनात चिडचिड व्हायची.

beed politics Devendra Fadnavis Suresh Dhas pankaja munde dhananjay munde
माध्यमांमध्ये ‘ आवाज’ बनलेल्या सुरेश धस यांच्या पाठिशी देवेंद्र फडणवीस
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Narendra Modi target arvind Kejriwal in lok sabha speech
निधीचा वापर देशासाठीच! पंतप्रधानांचे लोकसभेत प्रत्युत्तर; केजरीवाल यांच्यावर टीका
Chandrakant patil loskatta news
चावडी : चंद्रकांतदादांची ‘साखरझोप’
Pratap Patil Chikhlikar on Ashok Chavan
Pratap Patil Chikhlikar : प्रताप पाटील चिखलीकरांचा अशोक चव्हाणांना मोठा इशारा; म्हणाले, “जर कोणात खुमखुमी असेल तर…”
MLA Suresh Dhas On Santosh Deshmukh Case
Suresh Dhas : “आणखी बऱ्याच जणांवर मकोका लागायचाय”, सुरेश धसांचा मोठा इशारा; म्हणाले, “बीडमध्ये अजून…”
veteran actor amol palekar remark in jaipur literature festival 2025
जयपूर साहित्य महोत्सव :सध्या सरकारविरोधात जो बोलतो तो देशद्रोही; अमोल पालेकर यांचे परखड मत
BJP leader manoj tiwari interview
ते ‘रेवड्या’ वाटतात, आम्ही ‘मोफत’ देतो; भाजपा नेते मनोज तिवारींची ‘आप’वर टीका

आपल्याकडेही ‘भारी’ अनुभव असतात, भारी लोक ओळखीचे असतात, पण हिच्यासोबत काही शेअर करताच येत नाही. नकळतपणे आपण दबून जातो आणि बोलणंच सोडून देतो याचा तो राग होता. ‘आज मात्र अर्चनाची टिवटिव अजिबात ऐकून घ्यायची नाही. तिनं काहीही सांगितलं तरी आपलं घोडं पुढे काढायचंच.’ अर्चना जवळ येईपर्यंत मेधानं ठरवून टाकलं. पुढची दोन-पाच मिनिटं अर्चना जे बोलेल, त्याहून ‘भारी’ काही तरी मेधा सांगत राहिली. अटीतटीचा सामना खेळत असल्यासारखी ती आज पेटली होती. अर्चनाला ते जाणवलंही नसावं. पण एका पॉइंटला सामना थांबला. ‘अच्छा, बाय बाय’ करून दोघी निघाल्या.

हेही वाचा… चॉइस तर आपलाच : तुमची मुलं आळशी झालीत ?

शेजारीच उभी असलेली इरा हे सगळं नवलाने पाहात होती. अर्चना गेल्याबरोबर ती म्हणाली, “आई, हे काय चाललं होतं तुझं? तू पण अर्चनाकाकूसारखीच मोठेपणा सांगत होतीस? मला अजिबात आवडलं नाही. तू अशी कधीच बोलत नाहीस कुणाशी. आज काय झालंय तुला?” एवढ्याशा पोरीलाही आपण चढ्या अधिकारवाणीत बोललेलं लक्षात आलं याचं मेधाला बरं वाटलं.

हेही वाचा… चॉइस तर आपलाच: मुलं अशी का वागतात?

एकीकडे तिला स्वत:लाच स्वत:चं चॅलेंज घेतल्यासारखी ‘टिवटिव’ आवडलेली नव्हती. दमल्यासारखं वाटत होतं आणि दुसरीकडे खूप मोकळं आणि छानही वाटत होतं. “का बरं एवढं पर्सनली घेतलं आपण अर्चनाला? आपल्या स्वभावाविरुद्ध खुन्नस दिली?” मेधाला आता प्रश्न पडला. तिला जाणवलं, की आपल्याला अर्चनाच्या चढ्या आवाजाशी आणि ‘अधिकारवाणी’शी प्रॉब्लेम आहे. त्यामुळे थोड्याच वेळात आपण ब्लँक होतो आणि हे फक्त अर्चनासोबत नाही, लहानपणापासून कुणाचंही मोठ्या आवाजातलं, अधिकारवाणीनं बोलणं आपल्याला अस्वस्थ करतं. यांच्यापुढे आपण आपलं म्हणणं नीटपणे मांडूच शकणार नाही, अशी भीती वाटते आणि आपण बंद होतो. आतल्या आत चिडचिडत राहतो. अनेक लोकांसोबत असहाय वाटलेले अनेक प्रसंग तिला आठवून गेले, ज्यात अर्चना नव्हती. याचा अर्थ, प्रॉब्लेम आपलाच होता, अर्चनाचा नव्हताच. फक्त तिच्या निमित्ताने आज आपण ठरवलं, की डॉमिनेटिंग लोकांना घाबरून गप्प राहायचं नाही. अखेरीस ते जमलं म्हणून जिंकल्यासारखं वाटतंय, मोकळं वाटतंय आणि स्वभावाविरुद्ध गेल्यामुळे दमल्यासारखंही वाटतंय. मेधाला असंही जाणवलं, की आता तिला अर्चनाचा राग येत नाहीये. उलट आपल्या वागण्याचं हसायला येतंय. आजपर्यंत जे जमलं नव्हतं ते अर्चनासोबत जमलं, म्हणजे आता इतरांसोबतही जमेल. चढ्या अधिकारवाणीचा आपला कॉम्प्लेक्स संपेलच म्हणजे. तिला मस्तच वाटलं.

हेही वाचा… चॉइस तर आपलाच: निर्णयाचा पश्चात्ताप करणं की मूव्ह ऑन होणं?

“आई, स्वत:शीच काय हसतेयस? तू पुन्हा कुणाशी अशी बोललीस तर मी कट्टी करीन हं.” इरा म्हणाली. “नाही बोलणार गं राणी, मला नेहमीसारखं बोलायलाच आवडतं. पण कधी वेगळं बोलावं वाटलंच तरी मला ते जमत नव्हतं. अर्चनासारखं अधिकारवाणीनं आपल्यालाही बोलता येऊ शकतं हे आज कळलं, आता माझ्या हातात चॉइस आलाय. फक्त अशाच आणखी दोन-चार ‘वरिष्ठ’ स्वभावाच्या लोकांसोबत आणखी थोडी प्रॅक्टिस करावी म्हणते, म्हणजे गरज वाटली तर अधिकारवाणीचं अस्त्र बाहेर काढायचा आत्मविश्वास येईल. तेवढं चालेल ना तुला?” आईच्या बोलण्याचा इराला अर्थ लागेना. तिचा हात धरून मिश्कील हसत मेधा पुढच्या स्टॉलकडे निघाली.

(लेखिका रिलेशनल कौन्सिलर आहेत.)

neelima.kirane1@gmail.com

Story img Loader