कुटुंबात बाळाचा जन्माबरोबर जसा आनंद द्विगुणित होतो, तशीच जबाबदारीसुद्धा वाढते. पालक म्हणून इतर जबाबदाऱ्या असतातच, पण आर्थिक जबाबदारी उचलत आपल्या पाल्याला शक्य त्या सर्व सोयीसुविधा आणि उत्तम आयुष्य द्यायचं असतं. वाढती महागाई, बदलणारं राहणीमान, शैक्षणिक खर्च, यात सगळीकडे पुरून उरण्यासाठी पालक धडपडत असतात.

त्यात अजूनही खूपशा ठिकाणी मुलगा-मुलगी असा भेदभाव आहेच. मुलीचं भविष्य म्हणजे पालकांसाठी अधिक खर्च, अशीही भावना पुष्कळ जणांमध्ये पाहायला मिळते. पण वस्तुस्थिती पाहता मुलींनी आता शिक्षण आणि नोकरी-व्यवसायाच्या सर्व क्षेत्रांमध्ये आपलं उत्तम स्थान निर्माण केलेलं आहे. समानतेच्या रस्त्यावरचा त्यांचा हा देदीप्यमान प्रवास पाहता भेदभावाला जागा का द्यावी?… तेव्हा भेदभाव विसरून मुलीच्या उत्तम भवितव्याचा विचार करू या. तिच्या शैक्षणिक प्रगतीला, चांगल्या आयुष्याला आणि विवाहालाही आर्थिक हातभार लागावा यासाठी चांगली गुंतवणूक करू या. पालक म्हणून तुम्ही आपल्या मुलीसाठी सरकारप्रणित आणि इतर गुंतवणुकीचे पर्याय निवडू शकता. त्यातले निवडक आणि अत्यंत महत्त्वाचे पर्याय या लेखात जाणून घेऊ.

what 12 lakh exemption means and how tax is calculated
१२ लाख करमुक्त उत्पन्नाची सवलत नेमकी कुणासाठी?
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Encouraging private sector investment
खासगी क्षेत्राला गुंतवणुकीसाठी प्रोत्साहन
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे वर्ष शेअर बाजारासाठी…
dsp mutual funds
फंडांचा फंडा: डीएसपी मिड कॅप फंड
Moody Analytics made a statement on fiscal and monetary policy print eco news
वित्तीय, पतधोरणात मोठ्या सुधारणेनंतरच ६.४ टक्के विकासवेग शक्य- मूडीज
TReDS, features , uses , TReDS news,
Money Mantra : TReDSची उपयुक्तता आणि वैशिष्ट्यं काय?
review of impact on india stock market and economy after donald trump comes to power
Money Mantra : ट्रंप यांच्या ‘अमेरिका फर्स्ट’ धोरणामुळे आपलं आयुष्य का बदलणार?

हेही वाचा- अपत्यं जन्माला घालावीत की नाही?

१. सुकन्या समृद्धी योजना

२०१५ मध्ये केंद्र सरकारनं ‘सुकन्या समृद्धी योजना’ सुरू केली. या योजनेचा हेतू मुलींना उच्च शिक्षण मिळावं आणि त्यात कोणताही भेदभाव होऊ नये, त्यांच्या विवाहासाठीच्या खर्चातही हातभार लागावा हा आहे.

यात गुंतवणूक कशी करावी?

सुकन्या समृद्धी योजनेचं खातं मुलीचे पालक पोस्ट ऑफिस किंवा बँकेत उघडू शकतात. कोणत्याही एका पालकाच्या नावे हे खातं उघडता येतं. हे खातं उघडताना अर्ज, आयडी प्रूफ, आधार कार्ड, फोटो इत्यादी जरुरीचं आहे.
पालक त्यांच्या जास्तीत जास्त दोन मुलींसाठी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. जर जुळ्या मुली असतील, तर जास्तीत जास्त तीन खाती उघडता येतात. हे खातं मुलीच्या वय वर्षं १० पर्यंत उघडता येतं.

या योजनेमध्ये तुम्ही प्रती आर्थिक वर्ष कमीत कमीत रूपये २५० आणि जास्तीत जास्त रूपये १.५० लाख इतकी रक्कम गुंतवू शकता.
खातं कायम चालू ठेवण्यासाठी त्यात दर वर्षी किमान रुपये २५० इतकी रक्कम भरत राहा. या खात्याचा कालावधी बालिकेच्या वयाच्या २१ व्या वर्षी पूर्ण होतो आणि यात तुम्ही १५ वर्षं गुंतवणूक करू शकता.

बालिकेच्या वयाची १८ वर्षं पूर्ण झाल्यावर तिचं उच्च शिक्षण अथवा लग्न या कारणांसाठी तुम्ही जमा रकमेच्या ५० टक्केपर्यंत रक्कम काढू शकता.
या योजनेचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ही योजना करमुक्त आहे. म्हणजेच या योजनेअंतर्गत गुंतवली गेलेल्या रूपये १.५० लाख इतक्या रकमेवर तुम्ही आयकर से. 80-C अंतर्गत लागू आर्थिक वर्षी करातून सूट घेऊ शकता. या गुंतवणुकीवर मिळणारं व्याज आणि कालावधीअंती मिळणारी रक्कम संपूर्ण करमुक्त आहे.

हेही वाचा- घटस्फोट म्हणजे रोग नव्हे!

थोडक्यात महत्त्वाचं-

१. निवासी भारतीय आणि बालिका या योजनेअंतर्गत गुंतवणुक करू शकतात.
२. यात लागू होणारा व्याजदर हा बदलू शकतो.
३. सध्या यावर ७.६० टक्के इतका व्याजदर लागू आहे
४. जर योजना कालावधीमध्ये पालकांचा मृत्यू झाल्यास जमा रक्कम त्या बालिकेला परत मिळू शकते. अथवा ती रक्कम तिच्या वयाच्या २१ व्या वर्षापर्यंत गुंतवलेली राहू शकते.

पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (पीपीएफ)

तुमच्या मुलीसाठी लांब पल्ल्याचा, सुरक्षित आणि शिस्तपूर्वक गुंतवणुकीचा प्रकार म्हणजे ‘पब्लिक प्रॉव्हिडंट फंड’. हीसुद्धा एक सरकारप्रणित योजना आहे. यात तुम्ही तुमच्या मुलीच्या नावे पोस्ट ऑफिस अथवा मान्यताप्राप्त आणि नॅशनलाईझ्ड बँकांमध्ये खातं उघडू शकता. यात तुम्ही तुमची मुलगी सज्ञान होईपर्यंत तिचे ‘गर्डियन’ असता.

खातं उघडल्यानंतर प्रथम कालावधी हा १५ वर्षं असतो. या काळात तुम्ही दरमहा अथवा दरवर्षी एकूण रूपये १.५० लाखपर्यंत गुंतवणूक करू शकता. यानंतर मात्र कालावधी संपतो आणि तुम्ही जमा रक्कम व्याजासकट काढून घेऊ शकता. जर तुम्हाला ही गुंतवणूक चालू ठेवायची असेल, तर तुम्ही प्रत्येकी ५ वर्षं मुदत कालावधीच्या हिशोबानं सलग चालू ठेवू शकता.

यातही तुम्हाला करामध्ये फायदा मिळतो. यात गुंतवलेले एकूण रुपये १.५० लाखपर्यंत रकमेवर त्या लागू आर्थिक वर्षात तुम्हाला आयकर से. 80-C अंतर्गत सूट मिळू शकते. लागू होणारं व्याज आणि मुदतीअंती मिळणारी रक्कम करमुक्त असते.

थोडक्यात महत्त्वाचं-

१. मुलगी सज्ञान होईपर्यंत केलेली गुंतवणूक आणि परतावा हा गार्डियनच्या ‘पॅन कार्ड’अंतर्गत करपात्रतेसाठी ग्राह्य धरला जातो.
२. यात लागू होणारा व्याजदर तिमाही पतधोरणानुसार बदलू शकतो.
३. निवासी भारतीय यात गुंतवणूक करू शकतात.
४. व्याजदर वार्षिक चक्रवाढ असतो (कंपाउंडिंग इंट्रेस्ट).
५. सध्या लागू व्याजदर ७.१० टक्के आहे.

म्युचुअल फंड

म्युचुअल फंड हा गुंतवणूक प्रकार सध्या लोकप्रिय होत चालला आहे. हा प्रकार बाजार संलग्न असून जोखमीच्या आधीन आहे. यात प्रामुख्यानं इक्विटी, डेट (debt) आणि हायब्रीड असे प्रकार आहेत. या प्रकारांमध्ये पुढे अनेक उप-प्रकाराचे म्युच्युअल फंड उपलब्ध आहेत.
जेव्हा तुम्ही तुमच्या मुलीसाठी गुंतवणूक करता, तेव्हा तिच्याशी निगडित कमी पल्ल्याची आणि लांब पल्ल्याची ध्येयं निश्चित करा. जसं की, तिच्यासाठी प्राथमिक शाळेत प्रवेश फी भरणं किंवा तिच्या उच्च शिक्षणासाठी लागणाऱ्या फीची रक्कम जमा करणं वगैरे.

जर हे ध्येय कमी पल्ल्याचं म्हणजे २ ते ५ वर्षं मुदतीचं असेल, तर तुम्ही ‘डेट’ (debt) प्रकारातल्या फंडामध्ये गुंतवणूक करू शकता. लांब पल्ल्याच्या ध्येयासाठी तुम्ही ‘इक्विटी’ प्रकारातल्या फंडामध्ये गुंतवणूक करू शकता.

यात ऑफलाईन पद्धत म्हणजे ‘केवायसी’ आणि गुंतवणूक अर्ज भरून तुम्ही गुंतवणूक करू शकता किंवा ऑनलाईन पद्धतीमध्ये संलग्न म्युच्युअल फंड कंपनीच्या वेबसाईटवरून अथवा मोबाईल ॲपद्वारे गुंतवणूक करू शकता.

तुम्ही दरमहा निवडलेल्या फंडामध्ये, तुम्ही निश्चित केलेली रक्कम, तुम्ही निश्चित केलेल्या दिवशी, दरमहा तुम्ही निवडलेल्या मुदतीपर्यंत ‘सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन’द्वारे (एसआयपी) गुंतवू शकता. अथवा एकरकमीसुद्धा गुंतवू शकता.

हेही वाचा- मनाचा ब्रेक – उत्तम ब्रेक

थोडक्यात महत्त्वाचं-

१. म्युचुअल फंडमध्ये गुंतवणूक करताना फंडाविषयी सर्व माहिती नीट वाचून, समजून घ्या.
२. तुमची जोखीम क्षमता, ध्येय आणि त्याची मुदत, यावरून सुयोग्य असा फंड निवडा.
३. योग्य आणि अधिकृत मार्गानं गुंतवणूक करा.
४. केलेली गुंतवणूक ठराविक कालावधीनं तपासात राहा आणि त्यात गरज पडल्यास योग्य बदल करा.
५. जर तुम्हाला यात काहीही शंका असेल तर अधिकृत गुंतवणूक सल्लागाराच्या सल्ल्यानं पुढे जा.
अशा प्रकारे तुमच्या मुलीसाठी जर योग्य ध्येय निश्चित करून, सुयोग्य प्रकारे गुंतवणूक केली, तर ती नक्कीच फायद्याची ठरेल.

(लेखिका सेबी नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार व सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनर आहेत.)
priya199@gmail.com

Story img Loader