नवजात बालकांसाठी आईचे दूध जणू अमृतच! बाळाच्या वाढीसाठी आवश्यक असणारे सर्व घटक आईच्या दूधात असतात. आईच्या दुधाने बाळाची वाढ चांगली होते. एकंदरीतच आईचे दूध हे प्रत्येक नवजात बालकासाठी गरजेचे असते. पण काहीवेळेला असेसुद्धा हाेते की प्रसूतीनंतर काहीकारणास्तव मातेला दूध येत नाही किंवा कमी येते. अशावेळी बाळांना आईचे पुरेसे दूध मिळत नाही. परिणामी मुलांचे परंतु समाजात अशा अनेक माता आहेत ज्या स्वत:चे दूध अशा मुलांसाठी दान करतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अशाच एका उपक्रमातून अमेरिकेतील एका महिलेने जागतिक विक्रम केला आहे. अमेरिकेत टेक्सास येथे राहणाऱ्या ३६ वर्षीय ॲलिसे ओग्लेट्री यांनी आपल्या दूध दानातून लाखो प्रीमॅच्युर्ड बालकांना म्हणजे वेळेआधी जन्मलेल्या बालकांना तसेच काही कारणास्तव प्रसुती झालेल्या महिलांना दूध येत नसेल तर त्यांच्या बालकांसाठी दूध दान केल्याने त्या लाखो बालकांना पोषक आहार मिळाला आहे.

हे ही वाचा… समुपदेशन : बाबांची भीती वाटतेय?

ॲलिसच्या म्हणण्यानुसार, त्यांनी २०१० मध्ये तिच्या पहिल्या अपत्याच्या जन्मानंतर काही महिन्यांनी त्यांच्या लक्षात आले की, शरीरात प्रमाणापेक्षा जास्त दूधाची निर्मिती होत आहे. मग याबद्दल डॉक्टरांचा सल्ला घेण्यासाठी हॉस्पिटलमध्ये गेल्यावर एका परिचारिकेने त्यांना सांगितले की जर जास्त दूध तयार होत असेल तर तुम्ही ते दान करू शकता ज्याचा फायदा वेळेआधीच जन्मलेल्या बालकांना किंवा ज्या मातांना दूध येत नाही किंवा जे जोडपी नवजात बालकांना दत्तक घेतात त्या बालकांना पोषणासाठी उपयुक्त ठरेल. कालांतराने ॲलिस यांनी दुसऱ्या मुलीला जन्म दिला आणि त्यानंतर त्यांनी दूध दान करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्या दर तीन तासांनी १५ ते ३० मिनिटे पंपिंगद्वारे दूध काढत. मग ते फ्रीजमध्ये ठेवून दूध दान बँकेशी संपर्क करीत. दूध दान बँकेची माणसे येऊन ते दूध घेऊन जात. ॲलिस यांनी आत्तापर्यंत २६४५.५८ लिटर दूध दान केले आहे. त्यांनी आत्तापर्यंत केलेल्या दूध दानामुळे साडेतीन लाखांहून अधिक बालकांना दूध मिळाल आहे.

ॲलिस सांगतात की, दूधदानाबाबत माझ्या कुटुंबानेही मला साथ दिली. आपल्या दूधाचा फायदा जास्तीत जास्त मुलांना व्हावा यासाठी मी माझ्या खानपानावर जास्त लक्ष केंद्रित केलं. नेहमीच सकस आहार घेतला. आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने पंपिंग शेड्यूलवरसुद्धा लक्ष दिले. तसेच माझ्या दूधाचा लाभ ज्या ज्या बालकांना झाला त्या कुटुंबाला मी प्रत्यक्ष भेटले नाही पण आज ती नक्कीच सदृढ असतील या विचारानेच मला आनंद होतो. त्यात दुसऱ्यांदा गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये माझे नाव आल्याने मला अजूनच आनंद झाला. २०१४ मध्ये १,५६९.७९ लिटर दूध दान केल्याने त्यांचे गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड बुकमध्ये नाव आले होते.

हे ही वाचा… विसाव्या वर्षी मिळवला अध्यक्षपदाचा मान

ॲलिस यांना आता दूध दानाबद्दल समाजात जागरुकता निर्माण करायची आहे. दूध दानाबद्दल समाजात अजूनही समजगैरसमज आहेत असे त्यांचे म्हणणे आहे. हे गैरसमज दूर करून जास्तीत जास्त महिलांनी दूधदान करावे जेणेकरून ज्या बालकांना मातेचे दूध मिळत नाही त्यांना त्याचा लाभ मिळेल आणि तीही आईच्या अमृततुल्य दुधाने सदृढ होतील.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A woman from texas alyse ogletree donated breast milk with new record asj