डॉ. शारदा महांडुळे

दही घुसळून त्याचे ताक बनविताना लोणी तयार होते. श्रीकृष्णाचा आवडता पदार्थ म्हणजे ‘लोणी’. लोण्याचे नाव काढताच चोरून लोणी खाणाऱ्या बालकृष्णाची मूर्ती प्रत्येकाच्याच डोळ्यांसमोर उभी राहते ‘मैय्या मोरी मैं नही माखन खायो’ या गाण्यामधूनही बालकृष्णाला लोणी केवढे प्रिय होते, याचे वर्णन केले आहे. लोण्यामधील गुणधर्म बघितल्यानंतर श्रीकृष्णास ते का प्रिय होते हे लक्षात येईल. मराठीत ‘लोणी’, हिंदीमध्ये ‘मख्खन’, संस्कृतमध्ये ‘नवनीत’, इंग्रजीमध्ये ‘बटर’ (Butter) या नावाने लोणी ओळखले जाते.

Is Dandelion Tea Really Beneficial
कंबरदुखीपासून सुटका मिळवण्यासाठी डँडेलियन चहा खरंच फायदेशीर आहे का? वाचा, तज्ज्ञांचे मत…
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
Can 30 grams of protein within 30 minutes of waking help regulate cortisol and balance hormones
सकाळी उठल्यानंतर ३० मिनिटांत ३० ग्रॅम प्रथिने खाल्ल्याने कॉर्टिसोलचे नियमन आणि हार्मोन्स संतुलन होईल का? तज्ज्ञांनी केला खुलासा
Neena Gupta says she was not allowed to carry homemade dhaniya powder
Why Spices Are Not Allowed On Flights: घरी बनवलेले मसाले विमान प्रवासात घेऊन जाऊ शकतो का? वाचा, नीना गुप्ता यांचा अनुभव आणि तज्ज्ञांचे मत…
Milk paneer or curd Which is healthiest dairy product
दूध, पनीर व दही यांपैकी कोणता पदार्थ आहे सर्वांत जास्त फायदेशीर? कसे करावे सेवन, घ्या तज्ज्ञांकडून जाणून….
lead in turmeric FSSAI
तुमच्या आहारातील हळद विषारी आहे का? संशोधनात हळदीत आढळून आली ‘या’ हानिकारक धातूची भेसळ
Sweet or savoury breakfast
सकाळच्या नाश्त्यामध्ये गोड पदार्थ खावे का? त्याचा आरोग्यावर काय होतो परिणाम? तज्ज्ञांकडून घ्या जाणून…
curd in any food be dangerous
कोणत्याही पदार्थांमध्ये दह्याचा सतत वापर करणं ठरू शकतं घातक? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत…

औषधी गुणधर्म :

नवनीतं लघु ग्राहि शीतलं कफकारकम् । अग्निदीप्तिकरं वृष्यं मेधाकृच्च प्रियं मतम् । अतीव मधुरं स्वादु रुच्यं मेदोविवर्धकम् । धातुवृद्धिकरं बल्यं वर्ण तर्पणकारकम् ।।

निघंटु रत्नाकर

आयुर्वेदानुसार : लोणी पचण्यास हलके, चवीला मधुर, मनाला आवडणारे, हृदय रुचिकर असून सर्व धातूंचे पोषण करणारे आहे. लोणी हे मेद वाढविणारे असून बलकारक, बुद्धी वाढविणारे आहे.

आधुनिक शास्त्रानुसार : लोण्यामध्ये प्रथिने, ‘अ’ जीवनसत्त्व, बी-१२ जीवनसत्त्व, कॅल्शिअम खनिजे व पिष्टमय पदार्थ हे सर्व पौष्टिक घटक आहेत.

प्रकार : गायीचे, म्हशीचे याप्रमाणे निरनिराळ्या दुधांच्या प्रकारांपासून दही लावून त्याचे घुसळून ताक करून लोणी काढले जाते.

उपयोग :

१. दही घुसळून त्याचे ताक बनविताना वर लोण्याचा थर जमा होतो. जे ताजे लोणी अत्यंत मृदू असते, ते लहान बालकांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी अमृताप्रमाणे कार्य करते.

२. ताजे लोणी रुचकर असते. तसेच त्यामध्ये विलक्षण सामर्थ्य असते. लोणी खाल्ल्याने शरीर सुकुमार बनते. त्वचेवरील सुरकुत्या जाऊन त्वचा कांतीमय होते.

३. लहान मुलांचे आरोग्य सुधारण्यासाठी, शरीर सुदृढ व पचनशक्ती वाढण्यासाठी त्यांच्या आहारात नेहमी लोण्याचा वापर करावा. पोळीला लोणी व थोडी पिठीसाखर खाण्यास द्यावी. लावून तिचा रोल बनवून ती खाण्यास द्यावी.

४. मूळव्याधीमध्ये जर रक्त पडत असेल, तर अशावेळी लोणी आणि खडीसाखर एकत्र खाण्यास द्यावे.

५. खोकला येऊन घसा कोरडा पडला असेल, तर अशा वेळी अजूनच जास्त खोकल्याची उबळ येते. घशातील कोरडेपणा दूर करून खोकला कमी करण्यासाठी ताज्या लोण्याची गरम करून तयार केलेली विरघळ प्यायला दिल्यास फायदा दिसून येतो.

६. लोणी अग्निप्रदीपक असल्यामुळे त्याच्या सेवनाने भूक चांगली लागते.

७. लोणी पित्तवर्धक आहे. त्याच्या सेवनाने डोळ्यांचे आलोचक पित्त वाढते. त्यामुळे त्याचे नियमित सेवन करणाऱ्याला चष्मा लागत नाही व पर्यायाने डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते.

८. दही घुसळून तयार केलेल्या ताज्या लोण्यामुळे सर्दी होत नाही व हे ताजे लोणी स्वादिष्ट व मधुर असल्याने शरीराचा व मनाचा सर्वांगीण विकास करणारे असते.

९. ताजे लोणी शीतल, पचण्यास हलके, बलकारक, वीर्यवर्धक व बुद्धिवर्धक असल्याने शारीरिक पुष्टीबरोबरच मानसिक ताणतणाव असणाऱ्या व्यक्तींनी व बुद्धिजीवी व्यक्तींनी आहारामध्ये कायम लोण्याचे सेवन करावे.

१०. गायीचे लोणी व खडीसाखर एकत्र करून खाल्ल्यास जुना ताप बरा होतो.

११. गायीच्या दुधापासून तयार केलेले लोणी, खडीसाखर, मध व किंचित सुवर्णभस्म एकत्र करून खायला दिल्यास क्षयरोग आटोक्यात येऊन रुग्णास शक्ती निर्माण होऊन बल प्राप्त होते.

१२. जुलाब होत असतील तर लोण्यामध्ये मध व खडीसाखर मिसळून खावे. याने जुलाब कमी होतात.

१३. गायीच्या दुधापासून तयार केलेले लोणी डोळ्यांवर चोळल्यास डोळ्यांची जळजळ कमी होते.

१४. चेहरा कांतीयुक्त करण्यासाठी व रूक्षपणा घालविण्यासाठी लोणी व मध हे मिश्रण एकत्र करून चेहऱ्याला चोळावे. त्याने चेहरा गोरा होतो.

१५. वातविकार, अर्ध्या चेहऱ्यावरून वारे जाणे, पक्षाघात या विकारांमध्ये लोणी नियमित सेवन केल्यास वरील विकार आटोक्यात येतात.

सावधानता :

गाय, म्हैस व बकरी या सर्वांपासून बनविलेल्या लोण्यापैकी गायीचे लोणी उत्तम गुणधर्माचे असते. गायीच्या लोण्यापेक्षा म्हशीचे लोणी पचण्यास थोडे जड असते. त्यामुळे अति वजन असणाऱ्या रुग्णांनी म्हशीचे लोणी खाऊ नये. तसेच ताजे लोणी हे बलवर्धक, बुद्धिवर्धक असते. परंतु खूप दिवसांचे शिळे लोणी खारट, आंबट असल्याने ते रक्तपित्त प्रकोपक बनते. तसेच कफकारक, मेद वाढविणारे बनते, म्हणून शिळे लोणी खायचे टाळावे.

dr.sharda.mahandule@gmail.com