कवी मोरोपंत म्हणतात, “केल्याने देशाटन पंडित मैत्री सभेत संचार। शास्त्रग्रंथविलोकत, मनुजा चातुर्य येतसे फार।” थोडक्यात काय, फिरत राहणं हा माणसाचा स्थायी भाव आहे. ज्याच्यातून आनंद तर मिळतोच, परंतु त्यामुळे अनेकांच्या हाताला रोजगारही मिळू शकतो. शासनाच्या पर्यटन विभागाने स्त्रियांना केंद्रीभूत ठेऊन ‘आई’ नावाचे पर्यटन धोरण राबविण्यास सुरुवात केली आहे. पर्यटन क्षेत्रात स्त्रियांचा सहभाग वाढावा, त्यातून त्यांचे आर्थिक उत्पन्नाचे मार्ग प्रशस्त व्हावेत , त्यांचा उद्योजकीय दृष्टीकोन विकसित व्हावा हा त्याचा मुख्य उद्देश आहे. यामध्ये पंचसूत्री निश्चित करण्यात आली आहे.

स्त्रियांच्या सक्षमीकरणाच्यादृष्टीने ही पंचसूत्री निश्चित करण्यात आली ज्यामध्ये स्त्रियांचा उद्योजकीय विकास, स्त्रियांकरिता पायाभूत सुविधा, स्त्री पर्यटकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य, स्त्री पर्यटकांसाठी कस्टमाईज्ड उत्पादने आणि सवलती, प्रवास आणि पर्यटन विकास याचा समावेश आहे. यासाठी पर्यटन मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कार्यदलाची स्थापना करण्यात आली आहे. धोरणाची अंमलबजावणी पर्यटन संचालनालय आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्यामार्फत सर्व संबंधित विभागाच्या सहकार्याने केली जाते.

Assembly Election 2024 Extra Rounds of Best Bus on Polling Day Low floor deck buses will run for disabled elderly voters
मतदानाच्या दिवशी बेस्ट बसच्या जादा फेऱ्या; दिव्यांग, वृद्ध मतदारांसाठी ‘लो फ्लोअर डेक’ बस धावणार
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
adventure tourism in india
सफरनामा : साहसी पर्यटन!
investors of DSK, Maval-Mulshi sub-divisional magistrate, Court, DSK,
‘डीएसके’ यांच्या गुंतवणूकदारांची यादी सादर करण्याचे मावळ-मुळशी उपविभागीय दंडाधिकाऱ्यांना न्यायालयाचे आदेश
flat Palava Colony animals, Dombivli Palava Colony animals, Dombivli flat animals
डोंबिवली पलावा वसाहतीमधील अलिशान सदनिकेतून विदेशी वन्यजीव जप्त, ठाणे वन विभागाची कारवाई
article about sudhamma life in forest
व्यक्तिवेध : सुधाम्मा
traffic cleared due to police planning in Pune print news
पाेलिसांच्या नियोजनामुळे वाहतूक सुरळीत-पंतप्रधानांच्या सभेसाठी कडक बंदोबस्त
grse recruitment 2024 opportunities in indian education sector
शिक्षणची संधी : ‘जीआरएसई’ मध्ये संधी

हेही वाचा… गच्चीवरची बाग: हिरव्या मातीचे मैत्र

‘आई’ हे स्त्री केंद्रीत पर्यटन धोरण हे राज्याच्या पर्यटन धोरणाचा अविभाज्य भाग असेल व वार्षिक कृती आराखड्याद्वारे त्याची अंमलजावणी केली जाईल असे १९ जून २०२३ रोजीच्या ‘पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य’ विभागाच्या शासननिर्णयात नमूद आहे. हा शासननिर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर पर्यटन विभागांतर्गत उपलब्ध आहे. पर्यटन क्षेत्रात स्त्रियांचा सहभाग वाढावा म्हणून पर्यटन संचालनालयाने काही प्रोत्साहने आणि सवलतीही जाहीर केल्या आहेत.

यामध्ये खालील बाबींचा समावेश आहे.

राज्यातील प्रत्येक तालुक्यामधील पर्यटन संचालनालयाकडे स्त्रियांच्या मालकीच्या, त्यांनी चालवलेल्या आणि नोंदणीकृत १० पर्यटन व्यवसायांना जसे की होमस्टे, हॉटेल, रेस्टॉरंट, टुर ॲण्ड ट्रॅव्हल्स एजन्सी इ. पर्यटन व्यवसाय उभारणीसाठी मान्यताप्राप्त बँकांमार्फत घेतलेल्या १५ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावरील व्याजाची १२ टक्केच्या मर्यादेत रक्कम त्यांच्या आधारसंलग्न बँक खत्यात जमा करण्यात येईल. ही रक्कम पूर्ण कर्ज परतफेड होईपर्यंत, जास्तीत जास्त ७ वर्षांच्या कालावधीपर्यंत किंवा व्याजाची रक्कम ४.५ लाख रुपयांच्या मर्यादेएवढी होईपर्यंत अशा तीन पर्यायांपैकी जे आधी घडेल तोपर्यंत त्यांच्या खात्यात जमा होईल.

यासाठी अटी अशा आहेत.

  • या स्त्रियांचा पर्यटन क्षेत्रातील व्यवसाय पर्यटन संचालनालयाकडे नोंदणीकृत असावा.
  • पर्यटन व्यवसाय त्या स्त्रीच्या मालकीचा आणि त्यांनी चालवलेला असावा.
  • स्त्री मालक असलेल्या हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये व्यवस्थापन व इतर कर्मचाऱ्यांमध्ये ५० टक्के स्त्रिया असाव्यात.
  • स्त्रियांच्या मालकीच्या टूर आणि ट्रॅव्हल्समध्ये ५० टक्के कर्मचारी स्त्रिया असाव्यात.
  • पर्यटन व्यवसायाकरिता आवश्यक त्या सर्व परवानग्या व्यवसाय मालक स्त्रीने घेतलेल्या असाव्यात
  • कर्जाचे हप्ते वेळेत भरणे आवश्यक आहे

इतर लाभ

पर्यटन क्षेत्रात काम करणाऱ्या आणि पर्यटन संचालनालयाकडे नोंदणीकृत असलेल्या स्त्री सहल मार्गदर्शक, स्त्री वाहन चालक, स्त्री सहल संचालक, (टूर ऑपरेटर) व इतर स्त्री कर्मचाऱ्यांना केंद्र आणि राज्य शासनाच्या विमा योजनेत सहभागी करून त्यांचा वार्षिक विमा हप्ता पहिल्या पाच वर्षासाठी शासनाकडून भरण्यात येईल. महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळामार्फत दिली जाणारी प्रोत्साहने व सवलती

  • महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे छत्रपती संभाजीनगर येथील पर्यटक निवास, राज्यातील प्रथम पूर्णत: स्त्री संचलित पर्यटक निवास म्हणून तर खारघर रेसीडन्सीचे अर्का रेस्टॉरंट पूर्णत: स्त्री संचलित रेस्टॉरंट म्हणून घोषित करण्यात आले आहे.
  • महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या टूर ऑपरेटरमार्फत आयोजित पर्यटन सर्किट पॅकेजेसमध्ये स्त्री पर्यटकांना २० टक्के सवलत असून सवलतीची रक्कम पर्यटन विकास महामंडळाद्वारे टूर ऑपरेटरला दिली जाणार आहे.
  • सर्व स्त्री पर्यटकांना महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या सर्व रिसॉर्टस, युनिटसमध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने १ ते ८ मार्च या कालावधीत तसेच वर्षभरात इतर २२ दिवस अशाप्रकारे ३० दिवसांसाठी ऑनलाईन बुकिंगमध्ये ५० टक्के सूट मिळेल.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या मालमत्तांच्या ठिकाणी स्त्रियांच्या बचतगटांना हस्तकला, कलाकृती, प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ इ. च्या विक्रीसाठी स्टॉल किंवा जागा उपलब्ध करून दिली जाईल.

स्त्री पर्यटकांसाठी काही इतर विशेष सुविधा खालीलप्रमाणे

  • दिव्यांग तसेच वृद्ध स्त्रियांकरिता लिफ्टजवळच्या खोल्या उपलब्ध करून देण्यास प्राधान्य
  • स्त्रियांसाठी विशेष खेळ, मनोरंजन कार्यक्रमाचे आयोजन
  • ५ वर्षापर्यंतची मुले असलेल्या स्त्रियांसाठी पाळणाघर – समूह किंवा गटाने जाणाऱ्या स्त्री पर्यटकांसाठी टूर पॅकेजची सोय. यामध्ये जेष्ठ स्त्रियांसाठीची सहल, दिव्यांग स्त्रियांसाठीची सहल, (शारीरिक/मानसिक), स्त्री पर्यटकांसाठी एक दिवसीय सहल, शहर सहली, साहसी पर्यटन सहली, ट्रेकिंग टूर्सचे आयोजन याचा समावेश आहे. या धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी पर्यटन संचालनालयामध्ये स्त्री पर्यटन धोरण कक्षाची स्थापना करण्यात येणार असल्याचे ही या शासननिर्णयात नमूद आहे.
  • ज्या स्त्रियांना पर्यटनास जावयाचे आहे त्यांच्यासाठी आणि ज्यांना पर्यटन क्षेत्रात उद्योग व्यवसाय करून अर्थार्जन करावयाचे आहे त्या सर्व स्त्रियांसाठी ‘आई’ हे स्त्री केंद्रीत पर्यटन धोरण विकासाची एक नवी दिशा दाखवते एवढं नक्की. धोरणातील तरतूदींचा लाभ घेण्यासाठी पर्यटन संचालनालय, मुंबई तसेच महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, मुंबई यांच्याकडे संपर्क करावा.

(लेखिका लातूर येथे विभागीय माहिती उपसंचालक आहेत.)

drsurekha.mulay@gmail.com