प्राची पाठक

“सुट्टीचं कारण म्हणजे माझे पीरिएडस् सुरु झाले आहेत. खूप जास्त ब्लिडिंग होतंय, कामावर येणं शक्य नाही,” हे कोणतेही शब्दखेळ न करता, त्यासाठी संदिग्ध पर्यायी शब्द न वापरता स्त्री, पुरुष, थर्ड जेंडर बॉसेसना सरळ सांगता यायची स्पष्टता हवी. तरच स्त्रियांविषयीच्या या मुद्द्यांबाबत संवेदनशीलता वाढेल. कोणी कितीही आधुनिक विचारसरणीचा असो की जुनाट विचारसरणीचा, तुम्ही काय स्पष्टतेने बोलताय, हे तुमच्या समाधानासाठी तरी महत्वाचं असतंच. हे समजू न शकणारे लोक, ‘असं कसं बोलतात या बाया वैयक्तिक विषय,’ असं बोलणारे लोक जरा प्रगल्भ होतील, ते याच स्पष्टतेमधून. हे सगळे विटाळ आधी आपल्या डोक्यात असतात. तिथून ते मुळात जायला हवेत. समोरचे पुरुष कोणत्या मानसिकतेचे आहेत, त्यांना काय वाटेल, अमुकतमुक विचार हे सगळं नंतर येतं. आपण हे विषय झाकून ठेवले, त्यावर उघड बोललोच नाही, तर इतरांची मानसिकता व्यापक होणार कशी? सहसा लोक समजून घेणारे असतात.

Counseling center for victimized women in Thane district
ठाणे जिल्ह्यात पीडित महिलांसाठी समुपदेशन केंद्र
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Viral Video Of Girls Hostel
आनंदच निराळा…! अंघोळीसाठी रांगा, केसांत ब्रश अन्… VIRAL VIDEO पाहून डोळ्यांसमोर येईल तुमची ‘हॉस्टेल लाईफ’
Uber driver gets review as a good kisser from customer post viral on social Media
“चांगला किस करणारा”, ड्रायव्हरचा असा रिव्ह्यू तुम्ही कधीच ऐकला नसेल, ‘या’ व्हायरल पोस्टमध्ये नेमकं आहे तरी काय
ladies group dance on Hoti Hai Peelings Hoti Hai Feelings song video goes viral on social media
“होती है फीलिंग्स होती है फीलिंग्स” म्हणत चाळीतल्या महिलांचा तुफान डान्स; VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक
bmc to rehabilitate fisherwomen in tardeo
मासळी विक्रेत्या महिलांचे पुनर्वसन होणार ? पालिका अधिकाऱ्यांची मासळी विक्रेत्या महिलांसह बैठकीत चर्चा
article for husband and wife to maintaining healthy relationships
समुपदेशन : तुमचं ‘रॉटन रिलेशनशिप’ नाही ना?
Bharat Gogawale, Bharat Gogawale minister desire,
भरत गोगावले यांची मंत्रिपदाची इच्छा यंदा तरी पूर्ण होणार का ?

जे समजून घेऊ शकत नाहीत, त्यांना अशाच कारणाने त्यांची संवेदनशीलता व्यापक करायची एक संधी मिळत असते. प्रत्येक मासिक पाळीत अति रक्तस्त्राव होत असलेली नोकरदार स्त्री डोंबिवलीतून दोन ट्रेन बदलून, दोन शेअर रिक्षा पकडून अंधेरीला येतेय, अशी कल्पना करा. त्यात वाटेत टॉयलेट्स धड नसतात. असले, तरी त्यात स्वच्छता, पाणी नसतं. घाणेरड्या आणि अंधाऱ्या अशा त्या जागा असतात. अनेकदा तर असलेले एखाद दुसरे शौचालय कुलूपबंद करून ठेवलेले असते. त्याची किल्ली शोधण्यातच बराच वेळ जातो. तिथे डास, पाली, असुविधा, जाळी जळमटी आणि घाण वास येत असतो. अगदी मोठाल्या ऑफिसेसमध्ये, पॉश दुकानांमध्ये, हॉटेलांमध्ये काम करणाऱ्या कित्येक स्त्रियांना स्वच्छ, उजेडी टॉयलेट्सची सुविधा मिळत नाही. ज्यांना कामावर जायला किंवा घराबाहेर पडल्यावर तासाभरापेक्षा जास्त वेळ सार्वजनिक जागी घालवावा लागतो, त्या कोणत्याही व्यक्तीला मूलभूत सॅनिटेशन सुविधा अशाही मिळायलाच हव्या आहेत. त्यात उकाडा, पाऊस, गर्दी, ट्रॅफिक जॅम असे विविध प्रश्न घराबाहेर पडल्यावर असतातच.

देशभरात कुठेही रस्त्यावर काम करणाऱ्या पोलीस कर्मचारी, महिला कंडक्टर्स, ड्रायव्हर्स, महिला सफाई कर्मचारी यांना कोणत्या सॅनिटेशन सुविधा आपल्याकडे सहज उपलब्ध आहेत? कितीतरी सात्री कर्मचारी परिसरातल्या अनोळखी घरांमध्ये जाऊन शौचालय वापरता येईल का, अशी विनंती करतांना दिसतात. आजकाल अनोळखी व्यक्तीला लोक सहसा घरात घेत नाहीत. अशा कारणासाठी किती लोक इतरांना घरात येऊ देतील? आणि ते कायमस्वरूपी असू शकेल का? की मूलभूत सोय जागोजागी असणं जास्त गरजेचं आहे? त्यात जर पाळीचा त्रास होत असेल, तर अशा स्त्रीकडून कोणताही बॉस त्या दिवशी काय काम करून घेणार? आजकाल फिल्ड वर्क करणाऱ्या मुली देखील भरपूर असतात. या असुविधा त्यांनी का सहन करायच्या? अशा काळात एखाद दोन दिवस थोडं रिलॅक्स शेड्युल ठेवलं, जमेल तशी व्यवसायाला अनुसुरून घरून काम करायची संधी मिळाली, तर स्त्री कर्मचारी जास्त चांगलं काम करून देतात. कारण त्यांना माहित असतं, समोरची बॉसच्या खुर्चीत बसलेली व्यक्ती संवेदनशील आहे आणि तशी पॉलिसी त्या कंपनीने देखील त्यांच्यासाठी दिलेली आहे.

काही कंपन्यांमध्ये परदेशात आणि भारतातही मासिक पाळीची एक ते दोन दिवस अधिकृत सुट्टी किंवा घरून काम करता यायची सोय असते. कंपनीच्या पॉलिसीतच यायाचा उल्लेख असतो. अनेक नवीन जॉईन झालेल्या मुली ही सुट्टी माहीत असूनही घ्यायला टाळत असतात, कारण त्याने त्यांच्या तारखा जाहीर केल्यासारखं होईल. कोण्या पुरुष बॉसला त्यांना हे सांगावं लागेल किंवा कुठेतरी जाहीर करावं लागेल. म्हणून त्या मासिक पाळीच्या सुट्टीची सुविधा असूनही व्यक्त होत नाहीत. नीट समुपदेशन केल्यावर, त्यांच्याशी या विषयावर बोलल्यावर स्त्री कर्मचारी ही सुविधा वापरू लागतात. त्यांचं पाहून इतर डिपार्टमेंट्समधल्या स्त्रिया देखील अशी सुट्टी घेऊ लागतात, असा अनुभव आहे. म्हणजे, अनेकदा सुविधा असूनही केवळ लाजेपोटी तिचा लाभ न घेणे, हे एकीकडे दिसतं. सुविधा दिल्या आणि त्यांना सरावलो, तर जरासा गैरवापर होण्याची शक्यता असते. जबाबदारीचं भान मिळाल्यावर हक्कांसोबतच कर्तव्याची जाणीव देखील रुजवता येते. परंतु, गैरवापर होईलच, या काल्पनिक भीतीपोटी त्या मूलभूत सुविधाच न देणे, हे ही चूकच आहे.

जिथे अशी सॅनिटेशन सुविधा नसते, तिथे कायम त्याबद्दल बोलत राहिलं पाहिजे. मग समोरचा बॉस पुरुष असो की स्त्री. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात काम करत असल्या तरी बोलणाऱ्या, सहन न करणाऱ्या, पॉलिसीजबद्दल जागरुक असणाऱ्या स्त्रिया जितक्या वाढतील, तितक्या या सुविधा हळूहळू उपलब्ध होऊ लागतील. कधी स्त्रियांना असा संकोच असतो, की आपण आपलं वैयक्तिक काही सांगितल्याने लगेच कोणी मैत्री करायला बघतील. जवळीक करू लागतील. हे बोलायचं कसं? दुसऱ्या कोणाला सोबत घेता येईल का? वगैरे. असे अडथळे आपणच घालून घेतले, व्यक्त व्हायला संकोच बाळगला, तर प्रश्न कधीच सुटणार नाहीत. म्हणूनच, मासिक पाळीच्या सुट्टीविषयी, शौचालयांच्या सुविधेविषयी बिनदिक्कत बोलायला लागा. बोलल्याने प्रश्न लगेच सुटले नाहीत, तरी दखल तर घेतली जाईल आणि मार्ग निघायची किमान संधी दिसू शकेल.

prachi333@hotmail.com

Story img Loader