‘कमोदिनी काय जाणे परिमळ, भ्रमर सकाळ भोगितसे’ या तुकोबांच्या अभंगातील सोंदर्य, आर्तता, परमेश्वराशी असलेली सख्य भक्ती हे सगळं तासन् तास चर्चा करावी असं. पण मला यातला कमोदिनी म्हणजे कुमुदिनी किंवा कुमुद फुलाचा उल्लेख विशेष भावून गेला. कुमुदिनीचं सौंदर्य ज्याने अनुभवलंय तोच त्या सुखाची कल्पना करू शकेल. गच्चीवर लावलेल्या फुलझाडांमध्ये नेहमीच माझी अत्यंत आवडती कोणती फुलं असतील तर ही कुमुद फुलं आणि अर्थातच राजस कमळं.

आज या कुमुद विषयीच लिहिणार आहे. आमच्या लहानपणी फुलांचा राजा कोण या एका मुद्द्यावर नेहमी वाद रंगायचे. गुलाबाची मोठी टपोरी फुलं जिकडे तिकडे सहज पाहता यायची. लालभडक रंगाची सरळ देठाची अजिबात वास -श्वास नसलेली काहिशी रूक्ष वाटणारी फुलं राजा म्हणून कशी शोभतील हा प्रश्न मला तेव्हाही पडायचा, पण कमळ मात्र आवडायचं. लहानपणी प्रत्यक्षात कमळ कधी पाहायला मिळालं नव्हतं, पण चित्रकलेच्या तासाला कमळाचे फूल सहज काढता येई. गुलाब चित्रातही अवघडचं वाटायचा.

Samsaptak Yog 2025
मिथुन राशीमध्ये निर्माण होतोय समसप्तक, ‘या’ ३ राशींच्या लोक जगतील सुख-समृद्धीचे जीवन, आयुष्यात होईल आनंदी आनंद
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
NG Acharya Udyan, Butterfly Festival, Mumbai,
मुंबई : एन. जी. आचार्य उद्यानात फुलपाखरू महोत्सवाला सुरुवात
International Space Center vidarbh Maharashtra
आज सायंकाळी अंतराळातील आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्र डोळ्यांनी पाहता येणार….शुक्र, शनी, गुरुजवळ….
The luck of these zodiac signs will shine on January 28th
२८ जानेवारीला चमकणार ‘या’ तीन राशींचे नशीब, शुक्र ग्रह निर्माण करणार मालव्य राजयोग!
Do butterflies sleep at night
माणसांप्रमाणे फुलपाखरंही रात्री झोपतात का? जाणून घ्या रंजक माहिती…
Loksatta kutuhal Blue Planet Earth British Geologist Dr Arthur Holmes
कुतूहल: निळा ग्रह : आपली पृथ्वी
butterfly
बालमैफल : आमच्या खिडकीतलं फुलपाखरू

आणखी वाचा-Vinesh Phogat Olympics : विनेश फोगटची संघर्षमय कहाणी; आई ३२ व्या वर्षी विधवा, कर्करोग आणि समाजाशी एकटीने दिला लढा

भाज्या, फुलांच्या लागवडीचे आणि मुख्य म्हणजे शहरी शेतीचे प्रयोग जेव्हा मी सुरू केले त्यावेळी कमळ आवर्जून लावायचचं हे कुठेतरी आपोआपच ठरलेलं होतं. त्यामुळे छोट्याशा टबात थोडा मातीचा चिखल करून पहिल्यांदा एक रोप लावलं. अगदी गणेशचतुर्थीच्या दिवशीच त्याला एक सुरेख टपोरं फूल आलं. किती विलक्षण आनंद झाला होता म्हणून सांगू. आपण केलेला एक प्रयोग सफल झाला. या साफल्यतेच्या आनंदासोबतच त्या फुलाचं सौंदर्यही भुरळ घालत होतं.

ती होती निळी कुमुदिनी. लांबसर पाकळ्यांची सरळसोट देठाची, मध्यभागी पुंकेसरांची गर्दी असणारी ही फारच लोभस होती. बागेच्या सौंदर्यात तिच्यामुळे भर तर पडत होतीच, पण मधमाशा आणि इतर छोट्या किटकांची बागेतील वर्दळ वाढली होती. त्या दिवशी या निलोफरचे माझ्या या कुमुदिनीचे मी भरपूर फोटो काढले. निलोफर किती छान नाव आहे ना? माझं मीच दिलं होतं ते तिला.

आणखी वाचा-वायनाड मदतकार्यात प्रेरणादायी ठरलेले स्तनपान

माझ्या या निलोफरमुळे मग मी खुळावल्यासारखी वेगवेगळ्या रंगातील कुमुद फूल शोधू लागले. कर्जतच्या नर्सरीमध्ये मला दोन-तीन रंग मिळाले. छोट्या टबामधे मी ते निगुतीने लावले. त्यावेळी इंटरनेटचं फार प्रस्थ नव्हतं, त्यामुळे पुस्तकातून मिळणारी माहिती हा मार्ग मी अवलंबत होते. लाल रंगाची कुमुदिनी- जी मला पालीच्या गणपतीच्या मंदिरापासून थोड्या अंतरावर असलेल्या एका छोट्या तळ्यातून मिळाली. पुढे पांढरी, पिवळी गर्द निळी, पैठणीतल्या चिंतामणी रंगाची छटा मिरवणारी आणि लोभस गुलाबी… असे कितीतरी प्रकार माझ्या संग्रही आले.

यातील गुलाबी वॉटर लीली सोडली तर इतर प्रकार अगदी वर्षभर फुलतं. पण एवढे प्रयत्न करून सौंदर्यावर लुब्ध होऊन मी जमवलेल्या कुमुदिनी म्हणजे काही खरी कमळं नव्हती. ती होती पोसरांची फुलं. शास्त्रीय भाषेत म्हणायचं झालं तर या होत्या वॉटर लीली. यांची लागवड करणं तसं कमी कष्टाचं होतं. पण कमळाची खंत कुठेतरी आत होतीच.

या कुमुद फुलांची एक गंमत होती. यातील काही दिवसा उमलत तर काही रात्री. रात्री उमलणाऱ्या फुलांना चंद्रविकसिनी कमलिनी असं सुरेख नाव आहे. ज्ञानेश्वरीत या चंद्रविकसिनी कुमुद फुलांचा उल्लेख आहे. संध्याकाळी सूर्य मावळतीला लागला की चंद्राचं पुसटसं अस्तित्व जाणवू लागे. त्यावेळी आकाशातील विलोभनीय रंग निरखताना हळूच चंद्राची चाहूल घेऊन उमलायला तयार असणाऱ्या पांढऱ्याशुभ्र कमलिनीची लगबग मोठी मजेदार वाटायची.

आणखी वाचा-Paris Olympics 2024: बाईपण भारी देवा! कुणी गरोदर, तर कुणाचं तान्हं बाळ; ऑलिम्पिकमध्ये ‘या’ महिलांच्या कामगिरीमागचा संघर्ष एकदा वाचाच…

जस जसा चंद्र फिरे तसतशी ही कमलिनी त्या बाजूला झुकत असे. पावसाळ्यात काळ्याभोर ढगांच्या आत चंद्र लपून जाई. त्यावेळी या कमोदिनीवरून चंद्राचं नेमकं स्थान कळत असे. पुढे पुढे तर हा अंदाज घेण्याचं मला वेडचं लागलं. रात्रीच्या थंड वातावरणात झोपाळ्यावर बसून मी कितीतरी वेळ या कमलिनीकडे पाहात बसे. हिच्या फुलांना एक मंद सुगंध येत असे. नीट निरखून पाहिल्यावर या फुलांवर रुंजी घालणारे इवलाले किटकही दिसू लागले.

वर्षभर कमी अधिक फुलणारीही कमलिनी माझ्या विशेष आवडीची आहे. कुमुद, कमोदिनी, कमलिनी, वॉटर लीली अशा अनेक नावांनी ओळखलं जाणारं हे फूल मोहक आहे खास! हळूहळू आणखी शोध घेतल्यावर आळंदी जवळच्या डुडुळगावात कमळाची शेती करणारे गदिया यांच्याशी परिचय झाला. या वॉटर लीलींची लागवड कशी करावी, खतं कोणती द्यावी. रिपॉटिंग कसं करायचं या सगळ्याची थोडीफार माहिती मिळाली. काही नवीन रंग मी त्यांच्या कडून आणले आणि लावले. आता साधारण पंधरा एक प्रकारच्या कुमुदिनी माझ्याकडे वाढत होत्या. पण अजूनही यांची सगळी गुपिते मला कळली नव्हतीच. ती जसजशी उलगडत गेली तसतसा हा प्रवास अधिकच मजेदार होत गेला. या प्रवासाविषयी पुढच्या लेखात सांगणार आहेच. पण त्याबरोबरच मोठ्या जागेत वाढणारे हे फूल छोट्याशा बाऊलमध्येही किती सुरेख वाढते. कसे लावता येते हे सगळे ही सविस्तर लिहिणार आहे.
mythreye.kjkelkar@gmail.com

Story img Loader