सध्या, सर्वच गोष्टी ऑनलाईन करणं सवयीचं झाल्यानंतरच्या काळात ‘ऑनलाईन गेमिंग’ हा एक नेहमीचा सार्वजनिक चर्चेचा विषय असतो. परंतु या चर्चेत एक गोष्ट कळत-नकळत गृहित धरलेली असते, ती ही, की ऑनलाईन गेम खेळणारी मंडळी म्हणजे मुलगे किंवा पुरूषच असणार! ऑनलाईन गेम खेळणारी किंवा तयार करणारी स्त्री आपल्या डोळ्यांसमोर सहसा येत नाही. (याला अपवाद केवळ ‘गेम ओव्हर’सारख्या एखाद्याच चित्रपटाचा; ज्यात अभिनेत्री तापसी पन्नू हिनं एका गेम डिझायनरची भूमिका निभावली होती.)

या सार्वत्रिक समजाला छेद देणारं एक सर्वेक्षण नुकतंच समोर आलं आहे. नुकतेच हैद्राबादमध्ये १५ व्या ‘इंडिया गेम डेव्हलपर’ परिषदेमध्ये याविषयीचे आकडे सादर करण्यात आले. देशातील ५० टक्के गेमर्स हे १८ ते ३० या वयोगटातले आहेत, त्यात ६० टक्के पुरूष असले, तरी स्त्रियांचं प्रमाण जवळपास ४० टक्के आहे. एकूण गेमिंग कम्युनिटीमध्ये स्त्रियांचं नोंदवण्यात आलेलं जवळपास ४१ टक्के हे प्रमाण निश्चितच अनेकांसाठी आश्चर्यकारक ठरण्याजोगं आहे. गेमर किंवा गेम डेव्हलपर स्त्री ही रूढ नसलेली संकल्पना यापुढे रूढ करावी लागेल, असेच हे आकडे आहेत.

What did you decide on the No November trend Chatura new
चतुरा: ‘नो नोव्हेंबर’ ट्रेंड मध्ये तुम्ही काय ठरवलं?
Womens Health Suffering from abdominal
स्त्री आरोग्य – ओटीपोटीदुखीने त्रस्त आहात ?
nisargalipi Decorating glass garden
निसर्गलिपी : काचपात्रातील बाग सजवताना…
woman voters chatura article
तू मात्र या फुकट योजनांच्या अमिषाला बळी पडू नकोस…
Sanskruti More, a visually challenged chess player, satara district
अंधत्वावर मात करून यशशिखर गाठणारी बुद्धीबळपटू संस्कृती मोरे
chatura cesarean delivery
स्त्री आरोग्य: गर्भजल कमी असल्यास ‘सिझेरियन’ अनिवार्य आहे?
vidya balan bhool bhulaiyaa 3
‘भूल भुलैया -३’मधली माधुरी आणि माझी जुगलबंदी अविस्मरणीय…- विद्या बालन
soil making for plants in glass pot
काचपात्रातील बागेसाठी माती तयार करताना…
Loksatta Chatura How to identify children racket filling
मुलांचे ‘रॅकेट फिलिंग’ ओळखा

हेही वाचा… शासकीय योजना: शालेय मुलींसाठी सायकल- बस योजना

‘इंडिया गेम डेव्हलपर’ परिषद ही दक्षिण आशियातली मोठी आणि महत्त्वाची डेव्हलपर परिषद मानली जाते. २ नोव्हेंबर २०२३ रोजी हैद्राबादमध्ये ही परिषद सुरू झाली आणि त्यात ४,००० व्यक्तींनी सहभाग नोंदवला. गेमिंग क्षेत्रातल्या मोठ्या कंपन्यांचाही परिषदेत सहभाग होता. १२५ हून अधिक मोठ्या गेमिंग फर्मस् मधून या ठिकाणी लोक आले होते.

गेमिंग क्षेत्राची जगात उत्तम वाढ होत असून भारतीय बाजारात गेमिंगची घोडदौड सुरू आहे, असं निरीक्षण या वेळी नोंदवण्यात आलं. अनेक गेमिंग स्टार्ट-अप कंपन्या स्थिरस्थावर होऊन स्वत:च्या ब्रँडिंगसाठी चांगली गुंतवणूक करू लागली आहेत. यांपैकी काही जणांच्या बाबतीत इतर मोठ्या कंपन्यांनी स्टार्ट-अप्सची गेमिंग ॲप्सना पाठबळ दिलं आहे. या क्षेत्रातलाच आणखी एक प्रकार- अर्थात ‘यू-ट्यूब’वरचे गेम रीव्ह्यूचे आणि गेमच्या ट्युटोरियल्सचे चॅनल्स भरपूर ‘व्ह्यूज’ कमावत आहेत.

हेही वाचा… लग्नापूर्वीच घटस्फोटाची शक्यता गृहित धरून करार करावा का?…

परिषदेचे अध्यक्ष राजेश राव यांनी असं नमूद करतात, की भारतात गेमिंग क्षेत्राच्या होणाऱ्या प्रगतीमध्ये स्त्रियांचा गेमिंगमधला वाढलेला सहभाग ही विशेष लक्षात घेण्याजोगीच गोष्ट आहे. आणखी एक गोष्ट अशी, की गेमिंग ही फक्त मोठ्या, ‘मेट्रो’ शहरांमध्ये राहणाऱ्या तरुणांचीच मक्तेदारी असल्याचं समजलं जातं; मात्र जवळपास ६० टक्के गेमर्स हे मेट्रो शहरांमध्ये राहणारे नाहीत. गेमिंगचं लोण आणि गेमिंगची आवड ही पुरूषांप्रमाणेच स्त्रियांमध्ये आणि मोठ्या शहरांइतकीच लहान शहरं आणि गावांपर्यंत पसरलेली आहे, हेच यातून दिसतं.

हल्ली गेमिंग या क्षेत्रात डेव्हलपर किंवा त्याच्याशी संबंधित जबाबदाऱ्यांचा समावेश असलेलं करिअर किंवा अगदी ‘गेमर’ म्हणून करिअर करण्याची इच्छा असलेले तरूण बरेच दिसतात. या परिषदेत मांडल्याप्रमाणे यूट्यूबवर गेमिंगशी संबंधित कंटेंट तयार करणारे तरुणही अनेक आहेत. परिषदेत नमूद केलेली ‘गेमिंग’मधल्या स्त्री-पुरूषांची आकडेवारी पाहता आता गेमिंग क्षेत्रात असलेल्या आणि यापुढेही या क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या स्त्रियांसाठी आशादायक असंच चित्र दिसतंय. आपल्या करिअरमध्ये एखादं वेगळं क्षेत्र निवडू पाहणाऱ्या तरुणींनी तज्ञांचा सल्ला आणि पूर्ण अभ्यासानिशी या क्षेत्राचा विचार करायला हरकत नसावी, अशीच सध्याची ही स्थिती म्हणायला हवी.