आज बऱ्याच दिवसांनी अश्विनीकडे जाण्याचा योग आला. अमेय आणि अश्विनी दोघांचंही लव्ह मॅरेज. ही जोडगोळी कॉलेजपासून अगदी एकत्र होती. दोघेही एकमेकांना सोडून एकटे कधी दिसलेच नाहीत. ‘जोडा असावा तर असा’ अशी चर्चा आमच्या ग्रुपमध्ये नेहमीच व्हायची.

त्यांच्या लग्नाच्या रिसेप्शननंतर मी तिला भेटलेच नव्हते. आज तिच्या घराजवळच माझं एक काम असल्यानं आवर्जून तिला भेटावं असं ठरवलंच होतं. मी घराजवळ जाऊन बेल वाजवली. अश्विनीनं दार उघडलं आणि आश्चर्यकारक प्रतिक्रिया व्यक्त केली.

women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव कसा असतो?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
loksatta chatura A mother taking custody of her child is not kidnapping telangana high court decision
आईने अपत्याचा ताबा घेणे अपहरण नव्हे
Suicide girlfriend Nagpur, crime case against boyfriend,
नागपूर : प्रेयसीची आत्महत्या, प्रियकराविरुद्ध गुन्हा
tarkteerth lakshmanshastri joshi expressed views on marriage age of girls
तर्कतीर्थ विचार : कन्या विवाह वय विचार
philosophers exploring the good life
तत्त्व-विवेक : सरधोपट जगण्याच्या अल्याडपल्याड…
History , Art , Contemporary Visual Art , Feminist ,
दर्शिका : ‘अनंतकाळच्या माते’ची अनंतकाळची लढाई…
ramesh mantri
पडसाद : रमेश मंत्री यांची निवड त्यांच्या साहित्यिक कारकीर्दीच्या आधारेच!

“तू? मी स्वप्नात तर नाही ना? ये ये घरात ये. तुला अगदी १०० वर्षं आयुष्य आहे. माझ्या मनात तुझ्याबद्दलच विचार चालू होते आणि तू दारात हजर, अगदी बोलावल्यासारखी आलीस बघ.”

“बाप रे, आज माझी आठवण कशी काय झाली?”

माझ्या मनात उगाचच शंकेची पाल चुकचुकली. आता ही माझी आठवण कशासाठी काढत होती याचे गूढ मला जाणून घ्यायचेच होते म्हणूनच मी मुद्द्याचं बोलायला सुरुवात केली.

“कशी आहेस? आणि अमेय काय म्हणतोय?”

“मी ठीक आहे, पण अमेयचे मी काही सांगू शकत नाही. ते तू त्याच्याशीच बोल.”

तिचा सूर वेगळंच काही सांगून गेला.

“का गं, असं का बोलतेस? ठीक आहे ना सगळं?”

“अगं, आम्ही दोघंही गेले दोन महिने एकमेकांशी अजिबात बोलतच नाही तर तो कसा आहे हे मला कसं समजणार?”

“अगं, एका घरात राहून एकमेकांशी बोलत नाही तुम्ही? हा अबोला, दुरावा कशासाठी?”

“आमच्या दोघांमध्ये वाद झाला, की आमच्यात अबोला असतो, महिनोन्महिने आम्ही एकमेकांशी अजिबात संभाषण करीत नाही. शब्दाने शब्द वाढतो, भांडणं वाढीस लागतात. भांडणाऐवजी अबोला बरा नाही का?”

भांडणानंतर एकमेकांशी बोललंच नाही तर प्रश्न आपोआप सुटतात असा काही व्यक्तींचा गोड गैरसमज असतो, एकाच घरात राहून वर्षानुवर्षे एकमेकांशी अजिबात संवाद न ठेवणारी किती तरी जोडपी समाजात बघायला मिळतात, पण अशा अबोल्याचा आपल्या मनावर आणि शरीरावरही परिणाम होतो याची जाणीवच अबोला धरणाऱ्या व्यक्तीला नसते. मानसिक स्वास्थ्यासाठी एकमेकांचं मन एकमेकांकडं मोकळं करणं आवश्यक आहे.

म्हणूनच मी अश्विनीला समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत होते. “अश्विनी,चुकतेस तू. अगं, एक वेळ भांडण परवडलं, एकमेकांशी बोलून मोकळं तरी होता येतं, न बोलण्याने घुसमट होते आणि त्याचा त्रास आधिक होतो. चार भिंतींत एकत्र राहणे म्हणजे संसार नाही गं. समाजाला दाखवण्यासाठी एकत्र राहण्यात काहीच अर्थ नाही. एकत्र राहत असताना एकमेकांचे सगळे विचार एकमेकांना पटतीलच असं नाही, पण एकमेकांचे विचार भिन्न असतील तरीही त्या व्यक्तीच्या भूमिकेत जाऊन तिचे वेगळे विचार समजून घेणं आणि त्या विचारांची खिल्ली न उडवता त्या विचारांचाही कल समजून घेणं, आदर करणं आवश्यक असतं. विचार वेगळे आहेत या कारणामुळे नात्यात ताणतणाव निर्माण करणं योग्य नाही. नात्यातील स्नेह जपणे आवश्यक आहे. किरकोळ मतभेद, गैरसमज वेळच्या वेळी दूर करायला हवेत. हे तण काढून टाकले तर नात्याची जोपासना चांगली होईल. सहवासातून आनंद मिळविणं आपल्याच हातात असते.”

अश्विनीला माझं म्हणणं कळत होतं, पण वळत नव्हतं, म्हणूनच तिच्या शंका चालूच होत्या. “पण समजून घेणं, आइसब्रेकिंग करणं हे दोन्हीकडून व्हायला हवं, असं तुला वाटत नाही का? प्रत्येक वेळी समोरच्यानंच माघार घ्यावी अशी अपेक्षा असेल तर काय करायचं?”

“हो तुझं बरोबर आहे, पण सुरुवात कोणी करायची यात अडकायचं नाही, सुरुवात आपल्यापासूनच करायची हे आपणच ठरवायचं. अबोला धरून, मनातल्या मनात त्रास करून घेऊन व्यक्त न होणं म्हणजे स्वतःच स्वतःच्या मनावरचं ओझं वाढवून घेण्यासारखं आहे.”

काही क्षण अश्विनी शांत राहिली, बहुतेक माझं बोलणं तिला पटलं असावं.

“अमेयशी मी आजच बोलायला सुरुवात करते, अगं, अनेक कामं आणि निर्णय पेंडिंग आहेत. हा रुसवा आणि अबोला मला सोडायलाच हवा. गेले महिनाभर मला शांत झोप नाहीये, मनातल्या मनात मी कुढत आहे, पण आज त्याच्याशी बोलणारच, तू अमेय येईपर्यंत थांबतेस का?”

“अश्विनी, आपले प्रश्न आपणच सोडवायला हवेत. तुमच्या दोघांमध्ये मी हिंगाचा खडा कशाला? मी आता निघते.”

अश्विनीच्या चेहऱ्यावरील भाव बदलले होते. बहुधा अमेयशी कसं बोलायचं, या विचारात ती असावी. मी मात्र तिथून काढता पाय घेतला.

smitajoshi606@gmail.com

Story img Loader