Harmanpreet Kaur birthday special: भारतीय महिला संघाची धाकड खेळाडू अशी ओळख असणारी कर्णधार हरमनप्रीत कौरचा आज @३४वा वाढदिवस आहे. सध्या ती महिला प्रीमिअर लीगमध्ये मुंबई इंडियन्स संघाचे नेतृत्व करते आहे. टीम इंडियाला जेव्हा पण तिची गरज असते तेव्हा ती फलंदाजी आणि गोलंदाजीत देखील योगदान देते, एक ऑफस्पिनर म्हणून संघात प्रसिद्ध आहे. टीम इंडियाकडून ती मधल्या फळीत चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करते. ८ मार्च जागतिक महिला दिनाच्या दिवशी तिचा जन्म झाला असून या वर्षापासूनच महिलांसाठी bcciने WPL म्हणजेच महिला प्रीमिअर लीगची स्थापना केली आहे. यासंदर्भात आपण तिच्या आणि wpl विषयी जाणून घेऊ.

हरमनप्रीत कौरचा जीवनप्रवास

भारतीय महिला क्रिकेटपटू हरमनप्रीत कौरचा जन्म आंतरराष्ट्रीय महिला दिनी म्हणजेच ८ मार्च १९८९ रोजी झाला. पंजाबच्या मोगा जिल्ह्यात जन्मलेल्या हरमनप्रीतच्या वडिलांचे नाव हरमंदर सिंग भुल्लर आणि आईचे नाव सतविंदर सिंग आहे. हरमनप्रीतचे वडील चांगले व्हॉलीबॉल आणि बास्केटबॉल खेळाडू आहेत. त्यामुळे हरमनप्रीत लहानपणापासूनच खेळात रमली. हरमनप्रीत कौरला ज्ञान ज्योती स्कूल अकादमीमध्ये प्रवेश मिळाला. येथूनच हरमनप्रीत क्रिकेटशी जोडली गेली. त्याची शाळा घरापासून ३० किलोमीटर अंतरावर होती. हरमनप्रीत कौरने शाळेत कमलदीश सिंग यांच्याकडून क्रिकेटच्या मूलभूत गोष्टी शिकल्या.

aditya roy kapoor
रुपेरी पडद्यावरील सच्चा प्रेमी आदित्य रॉय कपूर खऱ्या आयुष्यात पडला ‘या’ अभिनेत्रींच्या प्रेमात
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
old womans dead body found in Mutha river police investigation underway
पुणे : मुठा नदी पात्रात ज्येष्ठ महिलेचा मृतदेह, पोलिसांकडून तपास सुरू
government that gives Rs 1500 as ladaki bahin is not doing favour to women
‘लाडक्या बहिणींनो’ कोणी तुमच्यावर उपकार करत नाही…!
actor himansh kohli wedding photos out
बॉलीवूड अभिनेत्याने मंदिरात साधेपणाने केलं अरेंज मॅरेज; लग्नातील फोटो आले समोर
udayanraje bhosale attack rahul gandhi while talking to media
सातारा: राहुल गांधी यांच्याकडून शिवाजी महाराजांची बदनामी; उदयनराजे यांचा हल्लाबोल
MS Dhoni impressed by Mumbai Ayush Mhatre
MS Dhoni : मुंबईच्या १७ वर्षीय फलंदाजाने जिंकले माहीचे मन, IPL 2025 च्या लिलावापूर्वी CSK ने दिली ‘ही’ खास ऑफर

हरमनप्रीत कौरचे क्रिकेट करिअर

हरमनप्रीतवर क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागचा प्रभाव होता. त्याने क्रिकेटला आपले करिअर बनवले. हरमनप्रीत कौरने वयाच्या २०व्या वर्षी औपचारिकपणे क्रिकेटमध्ये पदार्पण केले. २००९ मध्ये, हरमनप्रीत कौरने पाकिस्तान महिला क्रिकेट आर्क प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध सामना खेळला होता. त्याच वर्षी तिला महिला क्रिकेट विश्वचषकातही खेळण्याची संधी मिळाली.

हेही वाचा: WPL 2023, UP-W vs DC-W: मॅचविनर हॅरिसला बाकावर‌ बसवणे पडणार का महागात? दिल्लीने यूपीसमोर ठेवले २१२ धावांचे लक्ष्य

हरमनप्रीतने २००९ मध्ये टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. यामध्ये त्याने इंग्लंड महिलांविरुद्ध पदार्पण केले. २०१२ मध्ये तिने महिला टी२० आशिया कपच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व केले. त्यावेळी मिताली राज संघाची कर्णधार आणि झुलन गोस्वामी उपकर्णधार होती मात्र दोघीही दुखापतीमुळे सामन्यातून बाहेर होत्या. हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला क्रिकेट संघाने पाकिस्तानला हरवून मागील वर्षी आशिया कप जिंकला.

तिचे कर्णधारपद आणि संघाचे यश पाहता, २०१३ सालीही हरमनप्रीतला बांगलादेशातील एकदिवसीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार बनवण्यात आली होती. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात हरमनप्रीतने आपले दुसरे शतक झळकावले. नंतर २०१४ मध्ये, हरमनप्रीत कौरला भारतीय रेल्वेमध्ये नोकरी मिळाली, त्यानंतर ती मुंबईला गेली.

आयसीसीने सप्टेंबर महिन्यासाठी सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार जाहीर केला होता. महिला आणि पुरुष अशा दोन्ही प्रकारात दिल्या जाणाऱ्या या पुरस्कारावरही भारताचे वर्चस्व होते. भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हिला महिलांमध्ये हा सन्मान देण्यात आला होता. ‘आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ’ अवॉर्ड जिंकणारी ती पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली होती.

परदेशी लीगमध्ये सहभागी होणारी पहिली भारतीय महिला खेळाडू

परदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणारी हरमनप्रीत कौर ही पहिला भारतीय क्रिकेटपटूही आहे. हरमनला २०१६ साली बिग बॅश लीगमध्ये सिडनी थंडर्स संघाने करारबद्ध केले होते. त्यामुळे बीबीएलमध्ये करारबद्ध होणारी ती पहिली भारतीय क्रिकेटपटू ठरली. ती इंग्लंडमधील किया सुपर लीगमध्येही करार करणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू आहे.

हेही वाचा: WPL 2023, DC-W vs UPW-W: ताहिला मॅकग्राची एकाकी झुंज अपयशी! दिल्ली कॅपिटल्सचा यूपी वॉरियर्सवर ४२ धावांनी दणदणीत विजय

Wplमध्ये मुंबई इंडियन्सची कर्णधार

हरमनप्रीत कौरला आता पहिल्या महिला प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्सने आपल्या संघात सामील करून घेतले आहे. त्यांनी तिला लिलावात १ कोटी ८० लाख रुपयांना खरेदी केले. तिच्याकडे मुंबईने कर्णधारपदही सोपवले.

हरमनप्रीत कौरची आंतरराष्ट्रीय कारकीर्द

हरमनप्रीत कौरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आत्तापर्यंत ३ कसोटी सामने खेळले असून ३८ धावा केल्या आहेत आणि ९ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच १२४ वन डेत ३३२२ धावा आणि ३१ विकेट्स घेतल्या आहेत. तिने १५१ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले असून ती सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळणारी भारतीय क्रिकेटपटूही आहे. तिने १५१ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांमध्ये ३०५८ धावा केल्या असून ३२ विकेट्स घेतल्या आहेत. तिने २०१७ मध्ये झालेल्या एकदिवसीय विश्वचषकामध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध उपांत्यफेरीतील सामन्यात १७१ धावांची खेळी केली होती. त्यामुळे ती महिला एकदिवसीय विश्वचषकामध्ये बाद फेरीत सर्वोच्च वैयक्तिक धावा करणारी क्रिकेटपटू ठरली.