अगदी फार पूर्वी, म्हणजे सतराशे-अठराशे सालात अमेरिकन आर्मीत महिलांचा सहभाग होता तो फक्त छावणीतल्या सैनिकांसाठी परिचारिका, शिवणकाम करणं किंवा स्वयंपाकी इतकाच. त्यातही काही स्त्रिया हेरगिरी करीत, पण प्रत्यक्ष सैनिक म्हणून त्यांचा युद्धात सहभाग नसे. तुम्हाला हा इतिहास सांगण्याचं कारण म्हणजे, अलीकडेच अमेरिकन नौदलात अ‍ॅडमिरल लिसा मेरी फ्रँचेट्टी (Lisa Marie Franchetti) यांची नौसेनेच्या प्रमुखपदी निवड झाल्याची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी केली आणि जगभरातील महिलांसाठी ती अभिमानाची बाब ठरली.

अर्थात या निवडीला अमेरिकन सिनेटची मान्यता मिळायची आहे, परंतु लिसा यांची निवड जवळ जवळ निश्चित मानली जात आहे. लिसा सध्या अमेरिकन नौदलाच्या युरोप-आफ्रिका आणि नेपल्स, इटली येथे सहयोगी संयुक्त सैन्य दलाच्या कमांडर आहेत. लवकरच त्या आपल्या नव्या कारकीर्दीला सुरुवात करतील.

maharashtra government defends ladki bahin yojana in bombay high court
महिला सशक्तीकरणासाठी ‘लाडकी बहीण’; राज्य शासनाचे उच्च न्यायालयात उत्तर; अतिरिक्त भार पडत नसल्याचे स्पष्टीकरण
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
PM Modi to dedicate 3 frontline naval combatants to nation
आत्मनिर्भरतेतील आव्हाने!
News About Eknath Shinde
Eknath Shinde : ठाकरे-फडणवीसांची भेट, महायुतीत एकनाथ शिंदेंच्या नाराजीचा दुसरा अंक?
ex-servicemen , nation building, Army Chief ,
माजी सैनिकांचा राष्ट्रनिर्मितीमध्ये सहभाग शक्य; लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचे मत
Success story of kalpana saroj who got married at 12 now owning crores business
बाराव्या वर्षात लग्न अन् सासरच्यांचा छळ! पण हार न मानता २ रुपयांची कमाई करणाऱ्या ‘या’ महिलेने उभारलं कोट्यवधींचं साम्राज्य
History , Art , Contemporary Visual Art , Feminist ,
दर्शिका : ‘अनंतकाळच्या माते’ची अनंतकाळची लढाई…
chaturanga  article on Menstruation and menopause
ऋतुप्राप्ती ते ऋतुसमाप्ती : सर्जनशीलतेच्या वाटेवर चालताना

हेही वाचा… नातेसंबंध: ‘चाइल्ड-फ्री’ संसार हवा की?  

अमेरिकन नौसेनेच्या प्रमुखपदी एका महिलेची निवड ही जितकी अमेरिकेतील महिलांसाठी- विशेषत: संरक्षण क्षेत्रातील- महत्त्वाची बाब आहे, तितकीच संरक्षण क्षेत्राचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या जगभरातील मुली आणि महिलांसाठी एक उमेद आहे. कारण संरक्षण क्षेत्रातील एका दलाचे नेतृत्व एका महिलेकडे येण्याची ही तशी पहिलीच वेळ आहे.

सध्या त्या अमेरिकन नौदल ऑपरेशन्सच्या उपाध्यक्ष म्हणून काम पाहात आहेत. लिसा यांची थोडी थोडकी नव्हे, तर अडतीस वर्षांची उत्तम कारकीर्द आहे. लिसा यांना नौदलाच्या ऑपरेशन्स आणि धोरणात्मक कामाचा दांडगा अनुभव आहे. अमेरिकन सैन्यदलात उच्चपदावर अर्थात चार स्टार मिळवणाऱ्या त्या दुसऱ्या महिला आहेत.

कोण आहेत या लिसा फ्रँचेट्टी?

न्यूयॉर्कमधील रोचेस्टर येथे जन्मलेल्या लिसा यांनी पत्रकारितेत बॅचलर डिग्री मिळवली आणि नंतर फिनिक्स विद्यापीठातून संस्थात्मक व्यवस्थापनात पदव्युत्तर पदवी घेतली. १९८५ मध्ये नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटीच्या नेव्हल रिझर्व्ह ऑफिसर ट्रेनिंग कोअर प्रोग्रॅमच्या माध्यमातून लष्करी प्रशिक्षण घेतल्यानंतर लिसा यांच्या लष्करी कारकीर्दीला सुरुवात झाली. त्यांची लष्करी कारकीर्दीतली कमान कायम चढती राहिली. नौदलाच्या अनेक कारवायांमध्ये त्यांचा सहभाग आहे.

अमेरिकन नौदलात अनेक मानाची पदे त्यांनी भूषवली आहेत. कोरियातील अमेरिकन नौदलाच्या कमांडर, कॅरियर स्ट्राइक ग्रुप ९ आणि वाहक स्ट्राइक ग्रुप १५ च्या कमांडर म्हणून त्यांनी नेतृत्व केले. तसेच नेव्ही स्टाफच्या संचालक आणि यूएस नेव्ही वॉर कॉलेजच्या कमांडर म्हणूनही काम पाहिले आहे. लिसा सध्या अमेरिकन नौदल ऑपरेशन्सच्या उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. त्यांना अमेरिकन नौसेनेच्या सेकंड लेफ्टनंट, नौसेनेच्या ऑपरेशन्स विभागाच्या उपप्रमुख तसेच स्ट्रॅटेजी, प्लॅन्स आणि पॉलिसी ऑफ द जाॅइंट स्टाफच्या संचालकपदी काम करण्याचा दांडगा अनुभव आहे. इतकंच नव्हे तर कॅरिअर स्ट्राईक ग्रुपचे त्यांनी यशस्वी नेतृत्वही केले आहे. २०२२ मध्ये अमेरिकन नौसेनेच्या ऑपरेशन्स विभागाच्या उपप्रमुख म्हणून त्यांची नेमणूक झाली आणि आता त्या याच नौसेनेचं प्रमुख नेतृत्व करणार आहेत.

हेही वाचा… सीमा, अंजू… अशी कोणती परिस्थिती परदेशातील प्रियकराकडे नेते ? काय असू शकतात कारणे…

लिसा यांची निवड जाहीर करताना बायडन म्हणाले, की ‘लिसा यांनी संरक्षण क्षेत्रात येण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या पुढच्या पिढीतील महिलांसाठी एक नवी वाट करून दिली आहे, जी निश्चितच कौतुकास्पद आहे.’

लिसा यांच्या या निवडीमुळे संरक्षण क्षेत्राची धुरा एक महिला तितक्याच सक्षमपणे सांभाळू शकते ही गोष्ट अधोरेखित झाली आहे.

lokwomen.online@gmail.com

Story img Loader