वनिता पाटील

२०१० साली ज्योती आणि आलोक मौर्य यांचं लग्न झालं, तेव्हा आलोक प्रतापगढ इथे पंचायती राजमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून काम करत होता. आपल्या पत्नीची पुढे शिकायची, सरकारी अधिकारी बनण्याची इच्छा बघून त्याने तिला शिकण्यासाठी प्रोत्साहन दिलं. तिला घेऊन प्रयागराजला रहायला आला. तिला कोचिंग सेंटरमध्ये पाठवलं. त्या सगळ्यासाठी आपल्या पदरचे पैसे खर्च केले. वेळप्रसंगी कर्जही काढलं. त्याच्या घरच्या लोकांनीही ज्योतीला अभ्यास करता यावा म्हणून शक्य तो सगळं सहकार्य केलं.

Shyam Manav comment on Ladki Bahin Yojana,
‘लाडकी बहीण योजना अर्थव्यवस्थेला चालना देणारी’, काँग्रेसच्या सभेत अंनिसचे श्याम मानव म्हणाले….
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
Supriya sule on sunil tingre
Supriya Sule : “पोर्शेप्रकरणी शरद पवारांनी माफी मागावी”, सुप्रिया सुळेंनी ‘ती’ नोटीसच दाखवली, म्हणाल्या…
sai godbole brand ambassador of the apple company
मराठी अभिनेत्रीची लेक झाली ‘Apple’ कंपनीची ब्रँड अँबॅसेडर! आईसाठी अभिमानास्पद क्षण; म्हणाली, “लॉस एंजेलिस येथे…”
Sadabhau Khot allegations
“…तेव्हा माझा एन्काऊंटर करण्याचा डाव होता”, सदाभाऊ खोत यांचा खळबळजनक आरोप!
BJP Party Worker Dead Body Found in Office
BJP Worker : भाजपा कार्यकर्त्याचा रक्ताने माखलेला मृतदेह कार्यालयात सापडल्याने खळबळ, महिला अटकेत; कुठे घडली घटना?
Loksatta lokrang A review of the achievements of Maharani Baijabai Shinde
दखल: बायजाबाई यांच्या कर्तृत्वाचा आढावा
Amit Shah made special mention of Devendra Fadnavis in speech in shirala
अमित शहांनी फोन काढला आणि थेट फडणवीसांना लावला… म्हणाले, “पुन्हा…”

ज्योती शिकली आणि आपल्या हुषारीच्या बळावर २०१५ मध्ये उपविभागीय दंडाधिकारी झाली. या जोडप्याला जुळ्या मुलीही झाल्या आहेत. २०२० पर्यंत दोघांमध्ये सगळं उत्तम सुरू होतं. पण ज्योतीच्या आयुष्यात तिसऱ्या कुणीतरी प्रवेश केला आणि तीन वर्षांत परिस्थिती बदलत गेली. आता आलोकने आपली पत्नी ज्योतीच्या डायरीमधली काही पानं समाजमाध्यमांवर टाकली आहेत. त्यातले तपशील बघितले, तर त्यानुसार ज्योती दर महिन्याला अवैध पद्धतीने सहा लाख रुपये कमावताना दिसते.

ज्योतीचा मित्र आणि भाऊ मिळून आपली हत्या करू शकतात, आपल्या जीवाला धोका आहे, असं आलोक मौर्यचं म्हणणं आहे, तर नवऱ्याने ५० लाख रुपये आणि घर यासाठी तगादा लावला आहे, असा आरोप करत ज्योतीने घटस्फोट मागितला आहे. आलोकने आपल्याला अधिकारी होण्यासाठी मदत केली, हेपण ती आता मान्य करायला तयार नाही. मी माझ्या हुषारीच्या बळावर अधिकारी झाले, असं तिचं म्हणणं आहे.

त्यात आलोकने तिचे आणि तिच्या मित्राचे व्हॉट्सअॅप चॅट समाज माध्यमांवर टाकल्यामुळे त्यांचं प्रेमप्रकरण, ते एकमेकांना काय म्हणून संबोधतात, याचीच लोकांनी जोरदार चर्चा सुरू केली. त्यात ज्योती मौर्यचा कथित मित्र मनीष दुबेची चौकशी सुरू झाली आहे. नुकत्याच महाराष्ट्रात घडून गेलेल्या दर्शना पवार प्रकरणातही वन खात्यात अधिकारी म्हणून निवड झाल्यावर तिने लग्नाला नकार दिला म्हणून सगळा पुढचा अनर्थ घडला, याचीच चर्चा समाजमाध्यमांमधल्या कमेंटस् मध्ये दिसत होती.

त्या पार्श्वभूमीवर ज्योती मौर्यच्या प्रकरणाकडे कसं बघायचं?

० ज्योती मौर्यचं हे वागणं बरोबर की चुकीचं हे ठरवायचा आपल्याला अधिकार नसला, तरीही आपलं सामाजिक स्थान बदलल्यावर आधीची बायको आवडत नाही, आपल्याला शोभत नाही, म्हणून तिला सोडून, टाकून दुसरं लग्न केलेल्या पुरूषांची किती तरी उदाहरणं आहेत. तेव्हा त्यांच्यावर टीका केली गेली असेल का? की कर्तृत्ववान पुरूषाने असंच वागायचं असतं, असं म्हटलं गेलं असेल?

० ज्योती मौर्यवरचे भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध व्हायचे असले, तरी हातात सत्ता आल्यावर ‘निदान स्त्रियांनी तरी भ्रष्टाचार करू नये’, ‘त्यांच्याकडून ही अपेक्षा नसते,’ असं म्हटलं जातं. ते बरोबर आहे की चुकीचं आहे?

० सामाजिक स्थान बदललं म्हणून स्त्री वा पुरूष यांच्या व्यक्ती म्हणून नातेसंबंधांमधल्या आवडीनिवडी बदलू शकतात का? त्या आवडीनिवडी स्टेटसनुसार असतात का?

० ज्योतीचे खासगी चॅट तिच्या नवऱ्याने समाजमाध्यमांवर टाकले ते योग्य केलं की अयोग्य? समजा तिचं प्रेमप्रकरण असेल, तरी त्याचे तपशील समाजमाध्यमांवर टाकणं कितपत सयुक्तिक आहे? तिच्या खासगीपणावरचं हे अतिक्रमण नाही का?

या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं?…

lokwomen.online@gmail.com