डॉ. शारदा महांडुळे

स्वयंपाकघरात नेहमीच्या मसाल्यामध्ये आवर्जून वापरण्यात येणारा पदार्थ म्हणजे ‘तमालपत्र’ होय. याच्या वापराशिवाय ‘खडा मसाला’ पूर्ण होऊ शकत नाही. तमालवृक्षाच्या पानांना ‘तमालपत्र’ असे म्हणतात. मराठीत ‘तमालपत्र’, हिंदीमध्ये ‘तेजपत्ता’, इंग्रजीमध्ये ‘कॅसिया सिनॅमॉन’, संस्कृतमध्ये ‘तेजपत्र’, तर शास्त्रीय भाषेत ‘सीनॅमोमम तमाला’ (Cinnamomum Tamala) या नावाने ओळखले जाणारे तमालपत्र ‘लॉरेसी’ या कुळातील आहे. तमालवृक्ष हा सामान्यपणे आठ ते नऊ मीटर उंचीचा सुगंधी वृक्ष असून, त्याची पाने हिरवीगार असतात. ही पाने लहान देठाची, साधी समोरासमोर लांब भाल्यासारखी असतात. मसाल्यामध्ये या पानांचा उपयोग करता यावा म्हणून ती वाळवून सांभाळून ठेवली जातात.

curd in any food be dangerous
कोणत्याही पदार्थांमध्ये दह्याचा सतत वापर करणं ठरू शकतं घातक? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत…
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Shocking video If you eat roti made dough keeping fridge can make you sick
महिलांनो चपात्या केल्यानंतर उरलेलं पीठ फ्रिजमध्ये ठेवताय?; ‘हा’ VIDEO पाहून पायाखालची जमीन सरकेल
Testy bhindi fry khatti mitthi bhindi lady fingars recipe for lunch or diner
भेंडीची खट्टी -मीठी भाजी; ती पण चिकट न होता! पाहा सोपी मराठी रेसिपी
Can drinking water with food cause gas or indigestion
जेवताना पाणी प्यावे का? जेवताना पाणी प्यायल्याने अपचनाचा त्रास होतो का? डॉक्टरांकडून घ्या जाणून…
What is the right time to have breakfast
सकाळी ८ ते १० नाही, तर नाश्त्याची ही वेळसुद्धा ठरू शकते फायदेशीर? वाचा तज्ज्ञांचे मत…
Make delicious kheer
दिवाळीतील मिठाई कधी संपणार, असा प्रश्न पडलाय? मग झटपट बनवा मिठाईची स्वादिष्ट खीर
sugar workers salary
कोल्हापूर: पंचवार्षिक पगारवाढ लांबल्याने ऐन दिवाळीत साखर कामगारांची तोंडे कडू

औषधी गुणधर्म :

आयुर्वेदानुसार : तमालपत्र मधुर, किंचित तीक्ष्ण, उष्ण, चिकट व लघु गुणधर्माचे आहे. त्याच्या गुणधर्मामुळे ते कफनाशक, अजीर्ण, अपचन, अर्श, अरुची व सर्दी या विकारांमध्ये गुणकारी आहे. आधुनिक शास्त्रानुसार : तमालपत्राच्या तेलामध्ये ७८% युजेनॉल आणि सालीच्या तेलात ८५% पर्यंत सिनॅमिक अल्डीहाईड असते.

उपयोग :

१. ज्या महिलांचा वारंवार गर्भपात होतो, त्यांनी आहारामध्ये तमालपत्राचे नियमित सेवन केल्यास गर्भपात होण्याचे टळू शकते.

२. काही महिलांमध्ये गर्भाशयासंबंधित आजार होऊन अनेक प्रकारचे औषधोपचार करूनही उपशय मिळत नाही. अशा वेळी तमालपत्र, दालचिनी, वेलचीचे दाणे यांचे एकत्र चूर्ण करून त्याचे नियमित एक चमचाभर सेवन केल्यास गर्भाशयाचे विकार दूर होतात.

३. ज्यांना लघवी थेंब थेंब होते. तसेच साफ होत नाही अशांनी तमालपत्राचा काढा एक-एक कप सकाळ-संध्याकाळ प्यायल्यास व त्यावर पाणी भरपूर प्यायल्यास लघवी साफ होते.

४. हृदयरुग्णांनी हृदयाची कार्यक्षमता टिकविण्यासाठी व ब्लॉकेजेस टाळण्यासाठी नियमितपणे तमालपत्राचा काढा किंवा चूर्ण सेवन करावे.

५. लहान मुलांना वारंवार जंत होत असतील, तर तमालपत्राच्या चूर्णाचे अर्धा-अर्धा चमचा सकाळ-संध्याकाळ मधातून चाटण द्यावे. याने पोटातील जंत मरून शौचावाटे बाहेर पडतात.

६. शरीराची पचनक्रिया बिघडली असेल, तर तमालपत्राचे चूर्ण व पिंपळी चूर्ण यांचे मधातून चाटण केले असता पचनशक्ती क्रियाशील बनून सुधारते.

७. सर्दी-खोकला, बारीकसा ताप बऱ्याच दिवसापासून झाला असेल व औषधोपचार करूनही फरक पडत नसेल, तर अशा वेळी सुंठ, पिंपळी व तमालपत्राचे चूर्ण यांचे मधातून सकाळ-संध्याकाळ चाटण द्यावे.

८. तमालपत्र हे उत्तेजक असल्याने स्मृतिभ्रंश, बुद्धिक्षमता कमी असणे, स्नायुदौर्बल्य या विकारांवर लाभदायी ठरते.

९. तमालपत्र सुगंधी व औषधी गुणयुक्त असल्याने अनेक सुवासिक साबण व तेले बनविण्यासाठी त्याचा उपयोग करतात.

१०. सांधेदुखी तीव्र स्वरूपात जाणवत असेल, तर तमालपत्राच्या चूर्णाचा लेप सांध्यांवर लावल्यास वेदना कमी होतात.

११. मधुमेहाच्या रुग्णांनी शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी रोज तमालपत्राचे चूर्ण अर्धा चमचा सेवन करावे.

१२. तमालपत्रामध्ये असणाऱ्या औषधी गुणधर्मांमुळे त्याचा वापर अनेक आयुर्वेदिक औषधांमध्ये करण्यात येतो. उदाहरणार्थ च्यवनप्राश.

सावधानता :

तमालपत्राचे प्रमाणातच सेवन करावे. अति प्रमाणात सेवन केल्यास पित्तप्रकोप होऊन शरीरातील उष्णता वाढून दाह, तृष्णा ही लक्षणे निर्माण होतात.