डॉ. शारदा महांडुळे

दैनंदिन आहारात च घरगुती उपचार म्हणून अगदी प्राचीन काळापासून हळदीचा उपयोग केला जातो. हळदीमुळे आहारीय पदार्थांना पिवळा रंग येतो. पदार्थाची चवही वाढून पचन सुलभ होते. पूर्वीपासूनच निरोगी, सुंदर व सुदृढ शरीरासाठी हळदीचा वापर केला जातो. मराठीमध्ये ‘हळद’, हिंदीमध्ये ‘हल्दी’, संस्कृतमध्ये ‘हरिद्रा’, इंग्रजीमध्ये ‘टरमरिक’, तर शास्त्रीय भाषेमध्ये ‘कुरकुमा लाँगा’ (Curcuma Longa) या नावाने ओळखली जाणारी हळद ‘झिजीबरेसी’ या कुळातील आहे.

Can 30 grams of protein within 30 minutes of waking help regulate cortisol and balance hormones
सकाळी उठल्यानंतर ३० मिनिटांत ३० ग्रॅम प्रथिने खाल्ल्याने कॉर्टिसोलचे नियमन आणि हार्मोन्स संतुलन होईल का? तज्ज्ञांनी केला खुलासा
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Neena Gupta says she was not allowed to carry homemade dhaniya powder
Why Spices Are Not Allowed On Flights: घरी बनवलेले मसाले विमान प्रवासात घेऊन जाऊ शकतो का? वाचा, नीना गुप्ता यांचा अनुभव आणि तज्ज्ञांचे मत…
stomach cancer marathi news
पोटदुखीकडे करू नका दुर्लक्ष!
Milk paneer or curd Which is healthiest dairy product
दूध, पनीर व दही यांपैकी कोणता पदार्थ आहे सर्वांत जास्त फायदेशीर? कसे करावे सेवन, घ्या तज्ज्ञांकडून जाणून….
lead in turmeric FSSAI
तुमच्या आहारातील हळद विषारी आहे का? संशोधनात हळदीत आढळून आली ‘या’ हानिकारक धातूची भेसळ
Moringa or drumstick
Fact check : खरंच शेवग्यामध्ये दह्यापेक्षा नऊ पट जास्त प्रथिने असतात? तज्ज्ञांनी केला खुलासा

हळदीचे रोप साधारण दोन-तीन फूट उंच असते. त्याची पाने केळाच्या पानासारखी असून, त्यावर पांढरे ठिपके असतात. हळदीच्या कंदाला जमिनीमध्ये गाठी फुटतात. या गाठी पिवळ्या चमकदार रंगाच्या असतात. या गाठींनाच हळद असे म्हणतात. हळदीच्या पिकासाठी पाण्याची आवश्यकता जास्त असते. हळदीचे दोन प्रकार आहेत. १) लोखंडी हळद हिचा वापर रंग बनविण्यासाठी केला जातो. २) मऊ – सुगंधी हळद ही आहारीय पदार्थ बनविण्यासाठी मसाल्यात वापरली जाते. आंबेहळद म्हणूनही एक हळदीचा प्रकार आहे. ही हळद मसाल्यामध्ये वापरत नाहीत. परंतु रक्तदोषांवरील विकारामध्ये औषधी म्हणून तिचा वापर केला जातो.

आणखी वाचा-चॉइस तर आपलाच: करियर आणि गृहिणीकामातला बॅलन्स कसा साधणार?

औषधी गुणधर्म :

आयुर्वेदानुसार : हळद तिखट, कडवट, रूक्ष, शुष्क, उष्ण गुणधर्माची असल्यामुळे ती कफ, पित्त, त्वचादोष, प्रमेह, रक्तविकार, पंडुरोग, त्वचाविकार दूर करणारी आहे. हळदीच्या गुणधर्मामुळे ती जंतुनाशक, दुर्गधीहारक आहे.

आधुनिक शास्त्रानुसार : हळदीमध्ये तंतुमय पदार्थ, प्रथिने, मेद, पिष्टमय पदार्थ, कॅल्शिअम, ‘बी’ जीवनसत्त्व, लोह, ‘क’ जीवनसत्त्व, मॅग्नेशिअम, पोटॅशिअम व सोडिअम ही पोषक घटकद्रव्ये असतात.

उपयोग :

१. कोठल्याही जखमेसाठी हळद गुणकारी आहे. जखमेवर हळदीचा लेप लावल्यास रक्तस्राव थांबून जखम निर्जंतुक होते व त्वरित भरून येते..

२. शरीराचा एखादा भाग मुरगळला असेल किंवा स्नायूला दुखापत झालेली असेल, तर हळकुंड पाण्यात उगाळून ते गरम करून मुरगळल्या जागी लेप दिल्यास सूज कमी होऊन वेदना कमी होतात. घरात हळकुंड शिल्लक नसल्यास हळदीचूर्ण आणि मीठ सम प्रमाणात घेऊन पाण्यात मिसळून हे मिश्रण उकळी येईपर्यंत गरम करून त्याचा लेप दुखणाच्या भागावर किंचित गरम असतानाच लावल्यास सूज व वेदना कमी होतात.

३. बाळंतिणीचे आरोग्य चांगले राखण्यासाठी हळद अत्यंत गुणकारी आहे. तिच्या आहारामध्ये ओल्या हळदीचा वापर करावा. भाजीला, आमटीला फोडणी देण्यासाठी ओली हळद वापरली असता गर्भाशय शुद्ध होते व बाळंतिणीचे दूध वाढून रोगप्रतिकारक शक्तीही वाढते.

४. हळद लावून बाळंतिणीला अंघोळ घातल्यास त्वचेचे सर्व विकार दूर होऊन शरीर स्वच्छ व कांतियुक्त होते.

५. मधुमेध आजार आटोक्यात ठेवण्यासाठी एक चमचा आवळा रस, एक चमचा कारलेरस, अर्धा चमचा मेथीचूर्ण व अर्धा चमचा हळदपूड एकत्र करून रोज सकाळी हे मिश्रण कोमट पाण्यातून घ्यावे.

६. हळद दीपक, पाचक असल्याने जाठराशी प्रदीप्त करून भूक वाढविण्यासाठी उपयोगी ठरते.

७. मधुमेध आजारामुळे अनेकांना लघवीला वारंवार जावे लागते. अशा वेळी अर्धा चमचा हळदपूड, अर्धा चमचा तीळपूड हे मिश्रण कोमट पाण्याबरोबर घेतल्यास वारंवार लघवीला जाण्याची भावना कमी होते.

८. थंडी वाजून ताप येत असेल, तर गरम दुधात अर्धा चमचा हळद व चिमूटभर मिरेपूड टाकून ते दूध
प्यायल्यास ताप नाहीसा होतो.

९. घसा दुखून आवाज बसला असेल, तर गरम दुधात थोडी हळद व ओवा टाकून ते दूध प्यायल्यास आवाज मोकळा होता.

१०. लहान मुलांना सर्दी-खोकला, श्वास लागणे हे विकार झाल्यास गरम दुधामध्ये हळद, पुदिना, ओवा व लवंग टाकून दूध चांगले उकळावे. हा काढा मुलांना दिल्यास वरील विकार कमी होतात.

११. सर्दी होऊन तीव्र डोकेदुखी झाली असेल, तर हळदीचा धूर करून तो हुंगल्यास सर्दी कमी होते…

१२. वारंवार उचकी येत असेल, तर ती कमी करण्यासाठी हळदीचा धूर हुंगावा.

१३. पोटामध्ये कृमी झाले असतील, तर हळद, कडुलिंबाची पाने, कारलेरस व वावडिंगचूर्ण आणि गूळ एकत्रित करून त्यांच्या लहान-लहान गोळ्या कराव्यात. या गोळ्या दिवसातून तीन ते चार वेळा दोन-दोन पाण्यासोबत घ्याव्यात. यामुळे तीन ते चार दिवसांत सर्व कृमी शौचावाटे पडून जातात.

१४. खोकला तीव्र स्वरूपात येत असेल, तर हळद भाजून त्याचे चूर्ण एक ते दीड चमचा मधाबरोबर दोन ते तीन वेळा घेतल्यास किंवा तुपाबरोबर चाटण केल्यास खोकल्याची उबळ त्वरित कमी होते.

१५. पित्त उठणे, खाज सुटणे, त्वचेवर फोड येणे इत्यादी त्वचेचे विकार बरे करण्यासाठी एक ग्रॅम हळद, कडुलिंबाच्या १५ ते २० पानांबरोबर बारीक वाटून त्याच्या गोळ्या तयार कराव्यात. रोज सकाळ- संध्याकाळ दोन-दोन गोळ्या पाण्याबरोबर घ्याव्यात. तसेच बाह्य उपचारांमध्ये हळद आणि कडुलिंबाची पाने वाटून अंगाला लावून अंघोळ केल्यास वरील आजार काही दिवसातच कमी होतात.

१६. मधुमेह, यकृताचे विकार, जुना ताप, जुलाब, त्वचाविकार, रक्तविकार, अपचन, आम्लपित्त इत्यादी रोगांवर हळद गुणकारी आहे.

१७. आवळ्याच्या रसात मध व हळद घालून तो रस प्यायल्यास शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढून सर्व आजार कमी होतात.

सावधानता :

हळद उष्ण, तिखट, रूक्ष असल्याने अति प्रमाणात तिचा आहारामध्ये वापर केल्यास शरीराची उष्णता वाढून दाहनिर्मिती होऊ शकते.

बाजारातून हळकुंड आणून घरी हळदपूड तयारी करावी, कारण आयत्या हळदपूडमध्ये भेसळीचे प्रमाण जास्त असते. विविध कृत्रिम रंग, लाकडाचा भुसा मिसळण्याची शक्यता असल्यामुळे हळकुंड आणूनच हळदपूड तयार करावी.