डॉ. शारदा महांडुळे

शहरी भागामध्ये विविध प्रकारची शीतपेये पिण्याचे प्रमाण सध्याच्या काळात वाढलेले आहे. तत्काल ऊर्जा मिळविण्यासाठी व तहान भागविण्यासाठी या शीतपेयांचा नक्कीच उपयोग होतो; पण त्याचबरोबर वारंवार जर यांचा जास्त प्रमाणात वापर केला, तर त्यांचे शरीरावर दुष्परिणाम होतात, म्हणून क्वचितच यांचा वापर करावा.

Kangana Ranaut criticism that Priyanka Gandhi has no respect for democracy
प्रियंका गांधीना लोकशाहीचा आदर नाही,कंगना रानौतची टीका..
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Jeevan pramaan online process
Money Mantra: हयातीचा दाखला ऑनलाईन मिळवण्यासाठी जीवन प्रमाण सुविधा काय आहे?
readers reaction on loksatta editorial
लोकमानस : हस्तक्षेपास एवढा विलंब का झाला?
chaturang article
‘भय’भूती : भयातून अभयाकडे
attention deficit hyperactivity disorder
उनाड मुलेच नव्हे, तर प्रौढांमध्येही जगभर वाढतेय अतिचंचलता? काय आहे ADHD? लक्षणे कोणती? आव्हाने कोणती?
maharashtra assembly elections 2024 security need in maharashtra
‘सेफ’ राहण्यासाठी, एक होण्यापेक्षा…

औषधी गुणधर्म :

त्यामध्ये शरीराचे पोषण होईल अशी पोषणमूलद्रव्ये व औषधी गुणधर्म फारसे नसतातच.

उपयोग :

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तहान भागविण्यासाठी कधीतरी तृष्णाशामक म्हणून पेयांचा उपयोग होतो. प्रवासामध्ये तहान लागल्यानंतर स्वच्छ पाणी पिण्यास उपलब्ध नसेल, तर अशा वेळी तहान शमविण्यासाठी यांचा उपयोग होतो.

३. खेळाडूंना तत्काळ ऊर्जा मिळण्यासाठी व त्यांचा थकवा घालविण्यासाठी शीतपेयांचा उपयोग होतो.

सावधानता :

१. या शीतपेयांचा कधीतरी उपयोग केल्यास शरीरावर जास्त दुष्परिणाम होत नाहीत; परंतु याचा वारंवार जास्त प्रमाणात वापर केल्यास शरीरावर दुष्परिणाम होतात.

२. अनेकजण जेवण करताना आवड म्हणून पाण्याऐवजी शीतपेय पितात. परंतु यामध्ये असणाऱ्या साखर व कॅफिन या घटकांमुळे भूक कमी होऊन योग्य त्या प्रमाणात आहार घेतला जात नाही. पर्यायाने शरीरास आवश्यक असणारी पोषकतत्त्वे आहारातून मिळत नाहीत व त्यामुळे अनेक आजारांची लागण होते.

३. लहान मुले आवडीने शीतपेये पितात; परंतु या शीतपेयांमध्ये असणाऱ्या साखरेचे पचन करण्यासाठी शरीरातील कॅल्शिअम खर्ची पडते व त्यामुळे मुलांच्या हाडांची वाढ व्यवस्थित व योग्य प्रमाणात होत नाही. हाडे ठिसूळ राहतात व उंची वाढण्यावर परिणाम दिसून येतो..

४. समजा एखादे मूल ३५५ मिलि. कोकाकोला पित असेल, तर त्यामध्ये साधारणतः ५० मिलिग्रॅम कॅफिन असते व कृत्रिम साखरही पुष्कळ प्रमाणात असते. हे प्रमाण साधारणतः २ कप कॉफी इतके असते. संशोधनामध्ये असे आढळून आले आहे, की अनेक लहान मुलामध्ये अस्वस्थता, बेचैनी, निद्रानाश हे विकार अति प्रमाणात शीतपेय पिल्यामुळे निर्माण होतात.

५. कोलामध्ये खूप प्रमाणात फॉस्फेट असते. त्याच्या दुष्परिणामामुळे शरीरातील कॅल्शिअमचे शोषण पुरेसे होत नाही.

६. या शीतपेयांमध्ये कॅफिन अति प्रमाणात असल्यामुळे त्याचा दुष्परिणाम म्हणून रक्तदाब वाढतो व हृदयाचे ठोके अनियमित होतात.

७. या शीतपेयांमध्ये पौष्टिक घटक फारच कमी असतात. तर दुष्परिणाम करणारी साखर, कृत्रिम गोडवा निर्माण करणारे स्वीटनर, अनैसर्गिक रंग, ॲसिड व कृत्रिम स्वाद तयार करणारे रासायनिक घटक असतात. या रासायनिक घटकांमुळे अनेकांना त्रास होऊ शकतो. काहींना त्वचेवर ॲलर्जी निर्माण होते, तर काहींना पित्ताचा त्रास होतो. या पेयांमधून मिळणाऱ्या उष्मांकांमुळे पौष्टिक अन्नाची भूक कमी होते.

८. कोलासारख्या शीतपेयांमध्ये कॅफिन, फॉस्फेटिक ॲसिड आणि एथिलीन ग्लायकॉल नावाचे गोठणविरोधक रसायन असते. तसेच बेन्झोइक ॲसिड किंवा बेन्झोइट्स ही द्रव्ये परिरक्षक (प्रिझर्वेटिव्ह) स्वरूपात असतात. काही संवेदनशील लोकांना या परिरक्षकांचा त्रास होऊन उलटी, मळमळ, तीव्र डोकेदुखी, रक्तदाब वाढणे, त्वचेवर खाज येऊन फोड येणे अशा प्रकारचा त्रास होऊ शकतो.

९. अनेकांचा गैरसमज असतो, की या शीतपेयांमध्ये नैसर्गिक फळांचा रस व रंग असतो; परंतु नैसर्गिक फळांचा वापर अगदी कमी प्रमाणात म्हणजे १०% फळांचा रस वापरतात. उरलेले ९०% हे कृत्रिम साखर, कृत्रिम रंग, स्वाद यांचा वापर करण्यात येतो.

१०. शीतपेयांमध्ये जास्त प्रमाणात साखर आणि ॲसिडचा वापर करण्यात येतो. त्यामुळे अति प्रमाणात वजन वाढून स्थौल्य विकार जडतो. सध्या लहान मुलांमध्येही या शीतपेयांमुळे स्थौल्य विकार दिसून येतो. या पेयांमुळे भूक भागली जाऊन आहारातील पोषक घटक घेतले जात नाहीत. एकीकडे शरीराचे वजन वाढते; परंतु हे वजन फक्त विकृत चरबीचेच असल्यामुळे इतर धातूंचे पोषण होत नाही व पर्यायाने कुपोषण होते.

११. शीतपेयांमध्ये असणाऱ्या साखर व कॅफिनमुळे शरीरातील पॅनक्रियाज हा अवयव उत्तेजित होऊन इन्शुलिनची निर्मिती करतो. हे वाढलेले इन्शुलिन शरीरामध्ये चरबी साठविण्याची आज्ञा देते. शरीरात इन्शुलिनची मात्रा वाढल्यामुळे पुन्हा पुन्हा भूक लागल्याची भावना निर्माण होते व अशा पद्धतीने चुकीच्या आहारामुळे स्थुलता वाढते. म्हणून पाश्चात्त्य संस्कृतीचे अनुकरण थांबवून वेळीच शीतपेयांचा वापर आपल्या जीवनशैलीत अगदी प्रमाणात गरजेपुरताच करावा.

पर्यायी पेये :

नैसर्गिक फळांपासून बनविलेली पेये, सरबते यांचा वापर तहान भागविण्यासाठी व शरीराला ऊर्जा मिळविण्यासाठी करावा.

उदाहरणार्थ: संत्री, मोसंबी, ज्यूस, कोकम सरबत, आवळा, लिंबूसरबत इत्यादी.

dr.sharda.mahandule@gmail.com