वडीलांचा वारसा मुलीनं सांभाळणं ही गोष्ट आता तशी नवीन राहिलेली नाही. घरातच उद्योगाचं बाळकडू असलेल्या व्यावसायिक कुटुंबामधल्या मुलींसाठी तर ही अगदी रुटीन गोष्ट असेल. पण मोठा व्यवसाय नसताना केवळ वडिलांना मदत म्हणून सुरुवात करणं, तेही वयाच्या ११ व्या वर्षी, हे नक्कीच वेगळं आहे. स्वत:चं शिक्षण सांभाळून वयाच्या ११ व्या वर्षापासून वडिलांना दुधाच्या व्यवसायात मदत करणारी अहमदनगरची श्रध्दा धवन आता मोठी व्यावसायिक बनली आहे. एकेकाळी प्रत्येक गोष्ट शिकण्यासाठी धडपडणारी श्रध्दा आता वयाच्या पंचवीशीतच अन्य शेतकऱ्यांना व्यवसायातल्या खाचाखोचा समजावून देत आहे, प्रशिक्षण देत आहे. अहमदनगरचं डेअरी व्यवसायातलं उत्तम उदाहरण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रध्दाची ही यशोगाथा…

खरंतर ११ वर्षांचं वय म्हणजे मनसोक्त जगण्याचं, स्वप्नं पाहण्याचं कोवळं वय. पण याच वयात श्रध्दाला जाणीव झाली, तिच्या वडिलांच्या अपंगत्वाची, आपल्या परिस्थितीची आणि स्वत:मधल्या क्षमतेचीही. श्रध्दाच्या वडिलांकडे सुरुवातीला ६ म्हशी होत्या. त्यांची एक छोटीशी दूध डेअरी होती. पण अपंगत्वामुळे अनेक मर्यादा येत. दूध विकण्यासाठी लांब प्रवास करणे शक्य नसायचे. अशा परिस्थितीत श्रध्दा त्यांचा आधार बनली. म्हशींचं दूध काढण्यापासून ते विकण्यापर्यंत सगळ्या गोष्टींत श्रध्दानं तिच्या वडिलांना मदत केली. त्या वेळेस आपण एका मोठ्या व्यवसायाची बीजं रोवतोय हे तिच्या गावीही नव्हतं. पण हळूहळू श्रध्दाने म्हशींचं दूध काढण्याबरोबरच डेअरी व्यवसायातल्या अनेक गोष्टी शिकून घेतल्या. एकेकाळी आपल्या उदरनिर्वाहासाठी सुरु झालेलं हे काम आता एक कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या उद्योगापर्यंत येऊन पोहोचलं आहे.

foot march of Project affected farmers from Ambad and Satpur left for Mumbai on Thursday
प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा मुंबईकडे रवाना
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
Scientist Rahul Damale selected for Netaji Subhash ICAR International Fellowship
वडील तिसरी उत्तीर्ण तर आई निरक्षर, मुलगा शास्त्रज्ञ झाला, आता परदेशी शिक्षणासाठी निवड
Increase in the number of people obtaining international driving licenses pune news
पुणे: आंतरराष्ट्रीय वाहनचालक परवाने काढणाऱ्यांमध्ये वाढ
Supriya Sule and Pankaja Munde (1)
VIDEO : अजित पवार व्यासपीठावर असताना सुप्रिया सुळे अन् पंकजा मुंडेंची गळाभेट, सुनेत्रा पवार येताच…; व्यासपीठावर नेमकं काय घडलं?
sharad pawar slams amit shah news in marathi
देशाचे पहिले तडीपार गृहमंत्री! शरद पवारांचा अमित शहांवर प्रतिहल्ला
Nagpur 3 idiot latest news in marathi,
नागपूर : ‘थ्री इडियट’ फेम सोनम वांगचुक म्हणाले, “विकास करतोय याचा अहंकार नको…”
shikaayla gelo ek marathi drama review
नाट्यरंग : शिकायला गेलो एक! व्यंकूची ‘आज’ची शिकवणी

हेही वाचा… गच्चीवरची बाग: झाडांचे आरोग्य सांभाळा!

भौतिकशास्त्रातली डबल ग्रॅज्युएट असलेली २४ वर्षांची श्रध्दा अहमदनगरमधल्या निघोज गावातील श्रध्दा फार्मची मालकीण आहे. म्हशींचं दूध काढण्यापासून ते विकण्यापर्यंत श्रध्दाने सर्व काही केलं आहे. त्यातल्याच अनुभवाच्या जोरावर तिनं म्हशींसाठी दुमजली गोठा बांधला. अहमदनगर जिल्ह्यातील अशा प्रकारचा हा पहिला गोठा मानला जातो. आज त्यांच्याकडे ८० म्हशी आहेत. म्हशींचा व्यवसाय, डेअरीचा व्यवसाय श्रध्दाने अतिशय नियोजनपूर्वक वाढवला. तिला मिळत असलेल्या पैशांमधून, नफा मिळायला लागल्यावर तेच पैसे गुंतवून तिनं व्यवसाय वाढवला. त्यामुळे तिला कर्ज घेण्याची वेळ आली नाही. २०१७ मध्ये तिच्याकडे ४५ म्हशी होत्या. त्यावेळेस तिनं जास्त दुग्धोत्पादन कसं होईल, दुधाची गुणवत्ता कशी सुधारेल याकडे पूर्ण लक्ष दिलं. त्यासाठी म्हशींना देण्यात येणारे खाद्य कशा प्रकारचे असावे याचा तिनं अभ्यास केला. तिच्या तिला त्याची परतफेडही उत्तम मिळाली. त्यानंतर मात्र तिनं मागे वळून पाहिलंच नाही. सीएस एग्रो ऑर्गॅनिक्स या ब्रँडअंतर्गत तिनं महिन्याला ३०,००० किलो गांडुळखताची निर्मिती करुन गांडूळ खत प्रकल्पातही पाऊल टाकलं. इतकंच नाही, तर म्हशींच्या शेणाचा उपयोग करत तिनं वीज निर्मितीसाठी बायोगॅस प्रकल्पही सुरु करत शून्य कचरा निर्मिती व्यवसाय संकल्पना अत्यंत प्रभावीपणे राबवली. प्रयत्नांचे सातत्य हे तिचं वैशिष्ट्य आहे.

हेही वाचा… समलिंगी विवाहांना सध्यातरी कायदेशीर मान्यता नाही, पुढे काय?

पण श्रध्दाने तिला मिळालेलं ज्ञान तिच्यापुरतंच मर्यादित ठेवलं नाही तर ती गरजू शेतकऱ्यांसाठी ऑनलाईन व ऑफलाईन प्रशिक्षण कार्यक्रम घेते. त्यांना कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त फायदा कसा होईल याच्यासंबंधी मार्गदर्शन करते. वडिलांना मदत करता यावी म्हणून श्रध्दा शिक्षणासाठी शहरातही गेली नाही. उलट गावातच राहून शिक्षणही घेतलं आणि व्यवसायही वाढवला. अगदी छोटीशी सुरुवात जरी असेल, तरी सातत्य, जिद्द, मेहनतीच्या जोरावर काय करता येऊ शकतं याचं श्रध्दा उत्तम उदाहरण आहे. म्हशींच्या खरेदी-विक्रीमध्ये ती एखाद्या कसलेल्या व्यावसायिकाप्रमाणे व्यवहार करते, चांगला चारा कुठून स्वस्त मिळेल, चांगल्या म्हशी कुठे आणि कोणत्या व्यापाऱ्याकडे परवडणाऱ्या दरांत मिळतील याचं उत्तम व्यवहारज्ञान तिला आहे. तिच्या कामामुळे, प्रामाणिकपणामुळे तिच्याबद्दल अत्यंत विश्वास निर्माण झाला आहे. त्यामुळेच कोणतीही मोठी पार्श्वभूमी नसताना श्रध्दा फार्म्सचं नाव आदरानं घेतलं जातं.

मुली म्हणजे परक्याचं धन, मुली म्हणजे काळजाला घोर, असा विचार आजही करणारे कमी नाहीत पण घरचा व्यवसाय बंद होऊ नये म्हणून लहान वयापासूनच धडपड करत बापाचा आधार होणाऱ्या श्रध्दाने मुलगी म्हणजे बापाचा आधार, मुलगी म्हणजे बापाचा अभिमान, हे खरं करुन दाखवलं आहे.

Story img Loader