Modi Oath Ceremony guests invitation : रविवार, म्हणजेच ९ जून २०२४ रोजी नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान पदाची अधिकृतपणे शपथ घेतली आहे. या शपथविधी सोहळ्यासाठी जवळपास आठ हजार पाहुणेमंडळी उपस्थित राहणार होते. या सर्व मंडळींमध्ये, ऐश्वर्या एस मेनन यांनाही शपथविधी सोहळ्याला हजर राहण्यासाठी आमंत्रण पाठवण्यात आले होते. मात्र, ऐश्वर्या एस मेमन आहे तरी कोण? तर ऐश्वर्या ही वंदे भारत रेल्वेमध्ये महिला लोको पायलट म्हणून कार्यरत आहे. ऐश्वर्यासह आशियामधील सर्वात पहिली महिला लोको पायलट सुरेखा यादव यांनादेखील या सोहळ्यासाठी बोलावण्यात आलेले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोण आहे ऐश्वर्या एस मेनन?

ऐश्वर्या मेनन ही दक्षिण रेल्वेच्या चेन्नई विभागातील वरिष्ठ सहाय्यक [Senior Assistant] लोको पायलट आहे. म्हणूनच तिला दक्षिण रेल्वेकडून आमंत्रण करण्यात आले होते. वंदे भारत आणि जनशताब्दीसारख्या प्रीमियम, विशेष रेल्वे गाड्यांसाठी काम केल्यामुळे, या अनुभवी लोको पायलटला दोन लाख तासांहून अधिक फूटप्लेट कामाचा अनुभव आहे. या क्षेत्रात इतका मोठा पल्ला गाठणे अतिशय अवघड काम असते; मात्र ऐश्वर्याने अत्यंत जिद्दीने आणि मेहेनतीने हा पराक्रम करून दाखवला आहे.

हेही वाचा : तिसऱ्यांदा अंतराळ प्रवास करून सुनीता विलियम्सने रचला इतिहास! पाहा तिचा हा आत्मविश्वासपूर्ण प्रवास

ऐश्वर्याला तिच्या मेहनतीसाठी आणि कौशल्यांसाठी ओळखले जाते. तिला वेळोवेळी तिच्या सतर्कता, चपळाई आणि तिच्याकडे असलेल्या कमालीच्या रेल्वे सिग्नलिंगच्या गुणांमुळे पुरस्कार देण्यात आले आहेत. ती दररोज चेन्नई-विजयवाडा आणि चेन्नई-कोइम्बतूर या मार्गांवर वंदे भारतमधून प्रवाश्यांना रेल्वे सेवा देते.

पहिली महिला लोको पायलट सुरेखा यादव

ऐश्वर्या एस मेननसह आशियामधील पहिली महिला लोको पायलट ठरलेल्या सुरेखा यादव यांनादेखील ९ जून २०२४ रोजीच्या पंतप्रधान शपथविधी सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते, अशी माहिती मध्य रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने दिली असल्याचे इंडिया डॉट कॉमच्या एका लेखावरून समजते. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर अशा मार्गावर वंदे भारत रेल्वेचे पायलटिंग करणाऱ्या सुरेखा यादव या नवी दिल्लीमध्ये पार पडलेल्या शपथविधी सोहळ्यासाठी इतर दहा लोको पायलटपैकी एक असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले असल्याचे समजते.

पश्चिम महाराष्ट्रातील सातारा भागातील रहिवासी असणाऱ्या सुरेखा यादव या १९८८ साली भारतातील पहिली महिला रेल्वेचालक बनल्या होत्या. आत्तापर्यंत सुरेखा यांना अनेक राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार देण्यात आले आहेत.

इतकेच नाही तर सुरेखा या सोलापूर ते मुंबई सीएसएमटी [CSTM] दरम्यान धावणाऱ्या, सेमी हाय स्पीड वंदे भारत एक्स्प्रेसच्यादेखील पहिल्या महिला लोको पायलट बनल्या होत्या, अशी माहिती इंडिया डॉट कॉमच्या एका लेखावरून समजते.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aishwarya s menon and surekha yadav invited to pm modi oath ceremony 2024 they are vaned bharat female loco pilot check out chdc dha