प्रिया भिडे

नाजूक लालुग्या मोहरांनी रायआवळ्याच्या फांद्या मोहरून गेल्या होत्या, काही दिवसांत टप्पोरे रायआवळे एकमेकांना खेटून दाटीवाटीने फांदीला बिलगले. गच्चीत येणारा प्रत्येक जण ‘वा, आवळे कित्ती सुंदर!’ असे उद्गार काढून दोन-चार आवळे तोंडात टाकायचा, कारण हा मोह आवरणे कठीण. आंबट-गोड खोबरी चवीचे हे आवळे खाताना बालपण नाही आठवले तरच नवल. रायआवळा युफोरबेसी कुटुंबातला मध्यम उंचीचा, फांद्या कमकुवत पण दिसतो सुंदर. पानांची रचना फार छान, लागवड बीपासून किंवा फांदी लावून सहज करता येते. भरभर वाढते अन् भरपूर आवळे देते. आवळे मीठ लावून खायला, चटणी, जेली, मुरांब्यासाठी, लोणच्यासाठी वापरता येतात. मीठ, मिरची, आवळ्याचा ठेचा पोह्य़ाची लज्जत वाढवतो.

Viral Video Of Pet Dog
‘त्यांचाही जीव… त्यांना वाऱ्यावर सोडू नका ‘ घर शिफ्ट करणाऱ्या कुटुंबाने जिंकली नेटकऱ्यांची मने; पाहा Viral Video
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Fossil footprints show life on earth
कुतूहल : खडकांवरच्या पाऊलखुणा
Zebra vs Crocodile fight video zebra escaped from crocodiles jaws netizens were shocked video goes viral
“नशीब नाही प्रयत्नांचा खेळ” मगरीच्या जबड्यातून असा निसटला झेब्रा; VIDEO पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
nylon manja news in marathi
अकोल्यात नायलॉन मांजामुळे डोळाच धोक्यात… प्रशासनाच्या नाकावर टिच्चून…
Video About Vadhvan Port
Vadhvan Port : वाढवण बंदर का महत्त्वाचं आहे? पाच वैशिष्ट्ये कुठली? लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांचं सखोल विश्लेषण
monkey
थेट एसटी बसच्या छतावर बसून माकडाचा ऐटीत प्रवास! Viral Video पाहून नेटकरी म्हणे, “तिकीट काढले का?”
nagpur leopard latest news in marathi
Video : मादी बिबट्याने हरविलेले पिल्लू अलगद तोंडात धरून…

डोंगरी आवळा, नावाप्रमाणे डोंगरावर, जंगलातून सहज उगवतो. मोठ्या प्रमाणात सापडतो. आपले आरोग्य राखण्यात याचे स्थान फार वरचे. हा आवळा फायलॅन्थेसी कुटुंबातला सदस्य. कलमी आवळे पांढुरके, चकचकीत, आकाराने मोठे असतात. साधे डोंगरी आवळे आकाराने लहान, हिरवट, पिवळट असतात. तुरट हीच याची मुख्य चव. आपण लावताना आवर्जून साध्या, डोंगरी आवळ्याची झाडं लावावीत. बियांपासून रोप तयार होतात पण उगवण कमी व फार हळू वाढतात. पाच-सहा वर्षांनंतर फळे येतात. रोपवाटिकेतून रोपं आणून लावावीत. लोहाचा खजिना असलेल्या या फळास पाणी कमीच लागते.

आणखी वाचा- गच्चीवरची बाग: झाडांचे जीवन जलसिंचन

बहुगुणी डोंगरी आवळा, याचे एखादे तरी झाड गृहनिर्माण सोसायटी, बंगला, फार्म हाउस सोसायटीच्या रस्त्यांवर हवे. जिथे सगळ्यांना मिळून, आवळी भोजन करता येईल. जांभूळ हा अतिपरिचित वृक्ष मायरटॅसी कुटुंबातला हा सदस्य. याच्या पानांनाही छान वास येतो. सुगंधी, पांढुरक्या, फुलांच्या सुंदर गुच्छांवर मधमाश्यांची प्रीती असते. सुरुवातीला हिरव्या रंगाची असलेली जांभळे नंतर गडद जांभळ्या रंगाची होतात. मोठी, भरपूर गराची रसरशीत जांभळे सहज मिळतात पण छोटी, कमी गराची, गडद रंगाच्या महाबळेश्वरच्या जंगलांमध्ये विपुल प्रमाणात आढळणाऱ्या अतिमधुर लेंडी जांभळाची चव काही खासच!

व्हिटॅमीन सी, फॉस्फरस, मॅग्नेशियमचा साठा असलेला हा मेवा मुलांनीच नाही तर मोठ्यांनीही चाखावा असा. जांभळाची झाडं पूर्वी रस्त्याकडेला, बंगल्यांमधून लावली जात. सध्या जांभळे काढायला माणसे नाहीत म्हणून रस्त्यावर जांभळाचा सडा पडून वाया जातात अन् एकीकडे विक्रेते दोनशे रुपये किलोने जांभळे विकतात असा विरोधाभास दिसतो. बियांपासून सहज येणाऱ्या या जांभळाचे एखादे तरी झाड आपल्या जवळ हवेच.

आणखी वाचा-गच्चीवरची बाग- करू बीज संकलन अन् निसर्ग संवर्धन!

काडी खोचताच सहज येणार, भरभर अन् अस्ताव्यस्त वाढणारं, लवकर फळं देणारे झाड तुती. वस्तुत: सगळ्या गृहनिर्माण संस्थांमध्ये हे झाड लावता येणे सहज शक्य आहे. मोरॅसी कुटुंबातील हे फळ म्हणजे व्हिटॅमीन ‘ए’, ‘के’, ‘सी’ पोटॅशियम, कॅल्शियमचा खजिना. बोटाएवढ्या लांब हिरव्या तुती व बोटाच्या पेराएवढ्या काळ्या जांभळ्या तुती असे प्रकार आढळतात. ही रोप सहजी मिळत नाहीत. तुतीची पानं अनेक फुलपाखरांच्या अळ्यांना व रेशीम किड्याच्या बॉम्बॅकस मोरी अळीला फार आवडतात. लाल काळ्या तुतींनी लगडलेले झाड म्हणजे मुले व पक्ष्यांची चंगळच. हे फळ फार नाजूक, झाडावरून थेट तोंडात घालण्याचे. अर्थात पक्ष्यांच्या तावडीतून राहिल्या तरच.

करवंद हा मुलांना आवडणारा रानमेवा. रोपवाटिकेत याची रोपं मिळतात. कुंपणाला लावण्यास हिरवी भिंत होते. करवंदाची फळे छानच पण फुलेही शुभ्र पांढरी अन् सुवासिक असतात.

आणखी वाचा-गच्चीवरची बाग: पुष्पलता दारात रंगगंधांची बरसात!

रानमेव्यातले खास फळ बोर. गोल आकाराचे, आंबड-गोड, दळदार गराची झाडावरची बोरं खाणं पर्वणीच. बियांपासून रोपं होतात. रस्त्यांवर, माळरानावर, कमी पाण्यावर काही देखभाल न करता वाढतात अन् ‘क’ जीवनसत्त्व, कॅल्शिअम, फॉस्फरस व व्हिटॅमीन ‘बी ३’ चा खजिना आपल्याला देतात. हे दीर्घायू झाडं, थोडं उशिरा फळ देतं म्हणून जुन्या झाडांना जपलं पाहिजे. रस्ता रुंदीकरणात बंगले पाडून मॉल करताना या झाडांचे बळी जातात, याची खंत वाटते.

माझी आजी म्हणे घरात मुलांना माकडमेवा हवा. आजोबांनी पन्नास-साठ आंब्यांच्या झाडांबरोबर, बंगल्याच्या आवारात भरपूर माकडमेव्याची सोय केली होती. आपण हे समृद्ध बालपण पुढच्या पिढीला देणार का? हे समृद्ध, श्रीमंत बालपण देण्याची आपली जबाबदारी आहे.

Story img Loader