समीर जावळे
प्रिय यशश्री,
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Yashashree Shinde: आज तू या जगात नाहीस. २२ वर्षे हे तुझंच नाही कुठल्याही मुलीचं जाण्याचं वय नाही किंवा नसतं. ज्या पद्धतीने तुझी हत्या झाली आणि ज्या पद्धतीने आता तुझ्या आयुष्यातील गोष्टी समोर येत आहेत त्या पाहून, ऐकून मन सुन्न झालं आहे. दाऊद शेख या तुझ्याच ओळखीच्या असलेल्या माणसाने तुला संपवलं. प्रेम होतं म्हणे त्याचं तुझ्यावर… तरीही तुझा इतका भयंकर शेवट त्याने करावा? तू २५ जुलैला घरातून बाहेर पडतेस काय, बेपत्ता होतेस काय आणि पोलिसांना तुझा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत मिळतो काय?(!) दाऊदने जे केलं त्याचा त्याला काडीमात्र पश्चात्ताप नाही असं कळतंय!
यशश्री, ( Yashashree Shinde ) तुझ्यावर प्रेम आहे हे सांगणाऱ्या दाऊदने धारदार शस्त्राचे वार करुन तुझी हत्या केली. का? तर तू त्याच्याशी लग्न करुन संसार करायला नकार दिलास आणि त्याच्या बरोबर बंगळुरुला जात नाही म्हटलं म्हणून. बस्स इतकंच कारण… त्याच्या डोक्यात या नकाराची तिडीक गेली. त्याने तुला इतक्या वाईट पद्धतीने संपवलं, तुझ्या मृतदेहाची विटंबनाही केली. प्रेम असं असतं? तुझं त्याच्यावर प्रेम होतं का? हे सांगायला तू आज या जगात नाहीस, मात्र ज्या गोष्टी पोलीस समोर आणत आहेत त्यावरुन काही प्रश्न उपस्थित होतात.
यशश्री तुझं असं जाणं कुणालाच मान्य नाही
पोलिसांच्या म्हणण्यानुसार तुझ्या अंगावर दोन टॅटू होते ज्यापैकी एकावर दाऊद शेखचं नाव होतं. आता हा टॅटू यशश्री( Yashashree Shinde ) तू मर्जीने काढलास की, तुला त्याने तसं करायला भाग पाडलं? याचं उत्तर द्यायला तू या जगात नाहीस. पण तू अशा माणसाच्या नावाचा टॅटू का काढला, ज्याने कायम तुला त्रास दिला? तू अल्पवयीन असल्यापासून दाऊद तुला छळत होता तर तू ( Yashashree Shinde ) त्याला भेटलीस का? त्याच्याकडे असे कुठले फोटो होते जे अपलोड करण्याची धमकी तो तुला देत होता? तारुण्यात बहकणं, आहारी जाणं, वाहवत जाणं या सगळ्या गोष्टी घडतात. मात्र यशश्री, ( Yashashree Shinde ) अगं बाळा तू कुणावर विश्वास टाकलास? अशा माणसावर ज्याने तुला मानसिक आणि कदाचित शारिरीकही त्रासच दिला? या माणसाला तू भेटण्याचं कारण काय, हे आता शोधलं जातं आहे. कदाचित असाही अँगल समोर येईल की तुमचे प्रेमसंबंध होते. काही जण तशी चर्चाही करत आहेत. तसं असलं तरीही तू त्याच्या दबावाला बळी पडली होतीस हे वास्तव कसं नाकारता येईल?
मुलींनो दबाव सहन करु नका..
यशश्री, ( Yashashree Shinde ) तू आणि तुझ्यासारख्या असंख्य मुली अशा प्रकारच्या कुठल्या दबावाला बळी पडत असतील तर त्यांनी त्याला योग्य वेळी वाचा फोडली पाहिजे गं. आज तू हे वाचायला, ऐकायला जगात नाहीस. पण तुझ्यासारख्या अशाच प्रकारचा दबाव सहन करणाऱ्या असंख्य मुली असतील ज्यांनी वेळीच सावध होणं ही समाजाची गरज आहे. प्रेम ही एक नितळ भावना आहे. त्यात दबाव, मारहाण, अन्याय याला जागा नाही हे समजून घ्या मुलींनो नाहीतर तुमची अवस्था वाईट होऊ शकते.
आपल्या देशाने श्रद्धा वालकर आणि सरस्वती वैद्य प्रकरणही पाहिलंय
आपल्या देशाने ‘श्रद्धा वालकर’ प्रकरणही पाहिलं आहे. तसंच ‘सरस्वती वैद्य’ प्रकरणही पाहिलं आहे. दोन्ही प्रकरणांनी देश हादरला होता. त्यात आता तुझ्या हत्या प्रकरणाची भर पडली आहे, यशश्री. श्रद्धा काय किंवा सरस्वती काय, दोघींवरही नात्याचा एक प्रकारचा दबावच होता. त्यामुळे त्यांचे तुकडे तुकडे झाले. तर तू एक नकार दिलास आणि तुझी हत्या झाली. त्यानंतर तुझ्या मृतदेहाचेही तुकडे झाले. किती भीषण आणि विषण्ण करणारीही ही घटना आहे. या घटनेत समोर येणारे पैलू हे आणखी धक्कादायक आहेत.
यशश्री, तू दाऊदच्या संपर्कात का राहिलीस? ( Yashashree Shinde )
यशश्री, ( Yashashree Shinde ) तू अल्पवयीन असल्यापासून जर तुला दाऊद शेख त्रास देत होता तरीही तू त्याच्या संपर्कात का राहिलीस? तू त्याच्याशी बोलणं बंद केलं होतं, संपर्क ठेवला नव्हता असंही कळतं आहे मग तू त्याचा नंबर अनब्लॉक का केला? मौसिन नावाच्या त्याच्या मित्राच्या माध्यमातून दाऊदच्या संपर्कात का राहिलीस? हे सगळे प्रश्न निर्माण होत आहेत. तुझं जाणं हे माझ्यासारख्या कुठल्याही मुलीच्या बापाला सून्न करुन जाईल, असंच आहे. आज तुझ्या वडिलांना काय वाटत असेल? आईला काय वाटत असेल? याची कल्पनाही करवत नाही. तू वाचली असतीस, जर वेळीच सावध झाली असतीस, काय सहन करावं लागतं आहे ते बोलली असतीस. आता जे खुलासे तुझ्या मृत्यूनंतर होत आहेत ते तू जिवंतपणी करायला हवे होतेस. तसं झालं असतं तर कदाचित तुझा जीव वाचला असता. यशश्री ( Yashashree Shinde ) आता या जगात नाही, पण नात्यात दबावाखाली असलेल्या तमाम मुलींना हीच विनंती आहे की दबावाला बळी पडू नका, काय घडतंय त्याची वाच्यता करा. घरातल्यांशी बोला, ते तुम्हाला ओरडतील, तुमच्यावर चिडतील पण शेवटी तेच मदत करतील. तसं घडलं नाही तर यशश्रीसारख्या ‘बातमी’ होऊन बसाल. तुमच्या मृत्यूनंतर तुमच्याबाबत बरंच काही बोललं जाईल जे ऐकायला तुम्ही या जगात नसाल. इतकी टोकाची वेळ येऊ देऊ नका. मनमोकळा संवाद ठेवा आणि व्यक्त व्हा!
एका तरुण मुलीचा बाप