Radhika Merchant Shubh Aashirwad Look : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाह मोठ्या थाटामाटात पार पडला. गेल्या काही महिन्यांपासून या लग्नाची तयारी जोरात सुरू होती. लग्नाला अनेक उच्च प्रतिष्ठित पाहुणे उपस्थित होते. यावेळी नववधू राधिका मर्चंटच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. राधिकाचे सर्व लूक्स हे चर्चेचा विषय ठरले. लग्नात नवरी राधिका मर्चंट हिचे सर्वच लेहेंगे आणि लूक्स बघण्यासारखे होते. त्यात लग्नसोहळ्यातील एका प्रसंगात राधिकाने गुलाबी रंगाचा सुंदर लेहेंगा परिधान केला होता. पण, या सुंदर लेहेंग्याचे वैशिष्ट्य म्हणजे तो कारागीरांनी स्वत: हातांनी सुबक रंगकाम करीत तयार केला होता. राधिकाचा लग्नातील हा लेहेंगा अतिशय वेगळा ठरला. पण, राधिकाचे हे सौंदर्य अधिक खुलून दिसण्यामागे कोणाची मेहनत होती हे तुम्हाला माहितेय का? नसेल तर… चला जाणून घेऊ.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आशीर्वाद घेण्याप्रसंगी राधिका मर्चंटने गुलाबी रंगाचा हा सुंदर लेहेंगा परिधान केला होता. या लेहेंग्यावर कारागीरांनी स्वहस्ते असे काही सुंदर रंगकाम करण्यात आले होते की, तो उठून दिसत होता. त्यामुळे साहजिकच मूळात आरस्पानी सौंदर्य लाभलेल्या राधिकाचे रूप आणखी खुलले होते आणि ती एखाद्या अप्सरेप्रमाणे नकळतपणे सर्व उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होती.

हेही वाचा- Anant Ambani Radhika Wedding: अनंत-राधिकाचं लग्न अन् मुंबईच्या बीकेसीतील हॉटेल्स फुल्ल, एका रुमचं भाडं ऐकून तुम्हीही व्हाल अवाक्

राधिकाने तिच्या आशीर्वाद समारंभासाठी परिधान केलेला लेहेंगा प्रसिद्ध डिझायनर अबू जानी संदीप खोसला यांनी तयार केला होता आणि त्यावर प्रसिद्ध चित्रकार व शिल्पकार जयश्री बर्मन यांनी रंगकाम केले होते.

जयश्री बर्मन यांनी राधिकाचा सुंदर लेहेंगा तयार करण्यासाठी खूप मेहनत घेतली; ज्यामुळे राधिका त्या लेहेंग्यात एखाद्या राणीपेक्षा कमी दिसत नव्हती. या लेहेंग्यावरील रंगकामासाठी जवळपास एक महिना लागला. दररोज १६-१६ तास बसून, त्यावर नाजूक आकर्षक असे रंगकाम केले जायचे. केवळ लेहेंगाच नाही, तर त्यावरील ब्लाउज आणि ओढणीवरही अशाच प्रकारे अतिउत्कृष्ट रंगकाम केल्याचे दिसत होते.

More Stories on Ambani Wedding :- Radhika Anant Wedding : …म्हणून राधिकाने लग्नात घातले होते बहिणीचे दागिने; कारण वाचून तुम्हीही व्हाल अवाक्

कोण आहेत जयश्री बर्मन? (who is jayshree burman)

जयश्री बर्मन या दिल्लीच्या आहेत. त्या व्यवसायाने चित्रकार व शिल्पकार आहेत. त्या भारतातील प्रसिद्ध चित्रकार व शिल्पकार आहेत. देशभरातील प्रदर्शनांतून त्यांनी तयार केलेल्या कलाकृती मांडल्या होत्या. त्यांनी एकदा एक मुलाखतही दिली होती. त्यामध्ये त्यांनी सांगितले होते की, त्यांची कला कॅनव्हासवर आणण्यासाठी त्यांना फारशी तयारी करावी लागली नाही. त्या फक्त कॅनव्हास भरतात आणि कला आपोआप तयार होते.

राधिकाचा लेहेंगा का आहे खास? (Radhika Merchant Shubh Aashirwad Lehenga)

आता राधिका मर्चंटच्या सुंदर लेहेंग्याबद्दल बोलायचे झाल्यास जयश्री यांनी स्वतः हाताने त्यावर रंगकाम केले आहे. त्यात त्यांना रिया कपूर यांनी साथ दिली. अहवालांनुसार हा सुंदर लेहेंगा इटालियन कॅनव्हासपासून १२ पॅनेल्सद्वारे बनविला गेला आहे. त्यातील संपूर्ण कलात्मकता केवळ हातांनी केली जात असल्यामुळे हा लेहेंगा आणखी खास बनतो. त्यामध्ये खऱ्या सोन्याची तार वापरण्यात आली आहे.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anant ambani radhika merchant wedding who is jayshree burman who made radhika merchants lehenga for shubh aashirwad is a brilliant combination of art and fashion chdc sjr
Show comments