केतकी जोशी

मोबाइल केवळ संपर्क साधण्याचे साधन म्हणून वापरण्याचा जमाना कधीच गेला. आता मोबाइल आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. फक्त संपर्क, संवादाबरोबरच मनोरंजन, माहिती मिळवणे आणि अगदी व्यवसायासाठीही आता मोबाइलचा वापर अपरिहार्यपणे होतो. भारतात जवळपास प्रत्येकाकडे मोबाइल फोन आहे. स्त्री आणि पुरुष दोघांकडेही मोबाइल असला तरी संपर्काव्यतिरिक्त दोघांच्या मोबाइल वापरण्यामध्ये फारच फरक आहे. आता स्त्रियांकडेही अपडेटेड, हाय क्वालिटीचे मोबाइल्स असतात. सहसा फावल्या वेळेत किंवा मोठ्या शहरांमध्ये प्रवासात असताना मोबाइलवर गेम्स खेळणे, विविध प्रकारचे व्हिडीओज बघणे किंवा वेब सीरिज, चित्रपट, मालिका बघणे सर्रास केले जाते. पण भारतात पुरुष गेमिंग ॲप जास्त वापरतात तर महिला खाद्यपदार्थ आणि मेसेजिंग ॲपवर जास्त भर देतात, असे दिसून आले आहे. एका सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे.

How to get rid of mobile addiction from kids parents did this trick viral video
मुलाने चक्क मोबाइल सोडला आणि अभ्यासाला बसला! पालकांनी केलेला ‘हा’ प्रयोग पाहून तुम्हीही व्हाल चकित, पाहा VIDEO
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
How will state boards mobile app be useful for students parents and teachers
राज्य मंडळाचे मोबाइल अॅप विद्यार्थी, पालक, शिक्षकांना कसे ठरणार उपयुक्त?
25 lakh online fraud of senior citizens in kamothe panvel crime news
कामोठेत जेष्ठाची २५ लाखांची ऑनलाईन फसवणूक
mobile transport officer stolen Mumbai, mobile stolen Mumbai,
मुंबई : वाहनावरील कारवाई टाळण्यासाठी परिवहन अधिकाऱ्याचा मोबाइलच पळवला
Bharti Airtel Indias first spam fighting network
Spam Fighting Solution :Airtel चं पहिलं AI नेटवर्क सोल्युशन! सर्वाधिक स्पॅम कॉल, मॅसेज मुंबई आणि दिल्लीमध्येच; वाचा, सविस्तर रिपोर्ट
All about the new wedding invite scam on WhatsApp
सायबरचोरांचे नवे शस्त्र… डिजिटल लग्नपत्रिका! फसवणूक कशी? खबरदारी कोणती?
Men walking with billboard of food delivery app in Bengaluru netizens not amused by marketing campaign
मार्केटिंगसाठी काहीही! फूड डिलिव्हरी ॲपचे बिलबोर्ड घेऊन रस्त्यावर फिरत आहे पुरुष, Viral Video पाहून चक्रावले नेटकरी

बॉबल आयने (Bobble AI) जवळपास 8.5 कोटी ॲण्ड्रॉइड स्मार्टफोन डेटाचे सविस्तर विश्लेषण करून हा अहवाल तयार केला आहे. यामध्ये महिला आणि पुरुषांच्या मोबाइल वापरण्याच्या सवयींबद्दल माहिती देण्यात आली आहे. गेल्या वर्षीपेक्षा भारतीयांनी स्मार्टफोन्सवर ५० टक्के जास्त वेळ घालवल्याचेही या अहवालात म्हटले आहे. या रिपोर्टसाठी २०२२ ते २०२३ या कालावधीचा अभ्यास करण्यात आला आहे, असे कंपनीने स्पष्ट केले आहे. या सर्वेक्षणासाठी सहा विभाग करण्यात आले होते. ई-कॉमर्स, सौंदर्य, फॅशन, आरोग्य आणि फिटनेस, फायनान्स, शिक्षण या सहा विषयांवरील ॲप्सचा अभ्यास करण्यात आला आणि त्या संदर्भात प्रश्न विचारण्यात आले होते.

आणखी वाचा- चॉइस तर आपलाच : कम्फर्ट झोन तोडायलाच हवा…

भारतीय पुरुष आणि स्त्रियांच्या मोबाइल वापरण्याच्या सवयी अर्थातच वेगवेगळ्या आहेत. मुळात स्त्री गृहिणी असो किंवा नोकरदार महिला, तिला पुरुषांइतका फावला वेळ नक्कीच मिळत नाही. गृहिणीच्या जबाबदाऱ्या संपतच नाहीत तर नोकरदार महिलांना घरी आल्यानंतर घरातल्या जबाबदाऱ्यांमधून वेळ मिळत नाही. याचेच प्रतिबिंब या रिपोर्टमध्ये दिसते. कारण जेवढा वेळ महिलांच्या हातात मोबाइल असतो, त्या वेळेत त्या गेम खेळण्यापेक्षा काही उपयुक्त ॲप्सना पसंती देतात असे दिसून आले आहे. म्हणजे जवळपास ११.३ टक्के महिला कोणत्या तरी ग्राहकोपयोगी ॲप्स सर्च करतात किंवा बघतात असे या रिपोर्टममधून समोर आले आहे. फक्त ६.१ टक्के महिला गेमिंग ॲप्सचा वापर करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. याचाच अर्थ गेमिंग ॲप्समध्ये महिलांना फारसे स्वारस्य नाही. मग महिला कोणत्या ॲप्सना पसंती देतात? तर मेसेजिंग ॲप्सना २३.३ टक्के, व्हिडीओ ॲप्सना २१.७ टक्के आणि फूडसंदर्भातील ॲप्सना महिलांची २३.५ टक्के पसंती असल्याचे या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. इंटरनेटच्या वाढत्या वापरामुळे जगभरातील खाद्यपदार्थांच्या रेसिपीज आता माहिती होऊ लागल्या आहेत. पारंपरिक, एखाद्या ठिकाणचे स्थानिक पारंपरिक पदार्थ यांचेही महत्त्व अधोरेखित होऊ लागले आहे. लॉकडाऊनच्या काळात तर अनेक घरांमध्ये विविध प्रांतांचे, देशांचे पदार्थ करून पाहिले गेले. जेवढा वेळ महिलांना मिळतो, त्या वेळेत त्या अशा प्रकारच्या ॲप्सना प्राधान्य देतात. पुरुषांच्या तुलनेत महिलांकडे आरामात बसून मोबाइल बघण्यासाठी वेळ कमी असतो. किंबहुना २००० सालानंतर पुरुषांच्या मोकळ्या वेळेत वाढच झाल्याचे बोलले जात आहे. त्याउलट महिला सतत कामात असल्याने त्यांचा विरंगुळा मोबाइलवर त्या शोधतात तेव्हा त्यात गेम्सना अजिबात प्राधान्य नसते.

एरवीही सर्वसाधारणपणे महिला कोणते ॲप्स जास्त वापरतात हे पाहिलं, तर त्यात कम्युनिकेशन ॲप्स म्हणजे संवादासाठीची ॲप्स (whats app सारखी) २३.३ टक्के, व्हिडिओ ॲप्स २१.७ टक्के आणि फूड ॲप्स २३.५ टक्के वापरली जातात असे लक्षात आले आहे. तर महिलांकडून पेमेंट ॲप्स ११.३ टक्के आणि गेम्स ॲप फक्त ६.१ टक्के वापरली जातात. अर्थातच पुरुष वापरतात त्या तुलनेत हे प्रमाण कमीच आहे. डिजिटल पेमेंटचे प्रमाण जरी वाढले असले तरी महिला मात्र त्याच्याशी संबंधित ॲप्स मात्र त्या फारशा वापरत नाहीत. या ॲप्सच्या वापरातही लिंगभेद दिसून येत आहे.

आणखी वाचा-सोन्यापेक्षा घरात गुंतवणूक, रिअल इस्टेटमधील गुंतवणुकीला महिलांचं प्राधान्य

त्याशिवाय वयाचा विचार केला तर त्यातही ॲप्स वापरण्यात विविधता आढळते. १८ वर्षांखालील बहुतांश मुलांचे स्वत:चे उत्पन्न नसते. त्यामुळे या वयोगटातील बहुतेक मुले फ्री ॲप्स वापरण्याला प्राधान्य देतात असे दिसून आले आहे. तर १९ ते ३५ वयोगटांतील लोक ई-कॉमर्सशी संबंधित ॲप्स (४८ टक्के), पेमेंट ॲप्स (५२.६ टक्के), ओटीटी (५२.२ टक्के) आणि फूड ॲप्स (५६.१ टक्के) वापरत असल्याचे या सर्वेक्षणातून समोर आले आहे. याचाच अर्थ या ॲप्सचा वापर १९ ते ३५ या वयोगटांतील लोक सर्वांत जास्त करीत आहेत.

एकूणच, महिलांचे मोबाइल वापरण्याचे प्रमाण वाढले. अपडेटेड मोबाइल्स घेण्यातही महिला, मुली मागे नाहीत. आर्थिक स्वयंपूर्णता असल्याने आपल्याला हवा तो मोबाइल घेण्याचे स्वातंत्र्यही अनेक महिलांकडे आहे. अर्थातच पूर्वीच्या तुलनेत महिलांचे मोबाइलवर वेळ घालवण्याचे प्रमाण वाढले असले तरी आजही पुरुषांच्या तुलनेत महिला मोबाइलवर कमी वेळ घालवतात. शक्यतो प्रवासात किंवा रात्री सगळे आवरून झाल्यावर झोपण्याआधी आवडीच्या मालिका, वेब सीरिज, व्हिडीओज् बघणे महिलांना जास्त आवडते. आवश्यक त्या किंवा रोज लागणाऱ्या गोष्टींसाठीचे ॲप्स वापरण्याला महिलांचे प्राधान्य आहे असेच दिसून येते. रोजच्या कामकाजातून थोडासा विरंगुळा म्हणूनच आजही अनेक महिला या ॲप्सकडे पाहतात. त्यामुळे गेम्समध्ये गुंतणे किंवा तास न् तास मोबाइलवर काही बघणे हे फारसे महिला करीत नाहीत. अर्थात यालाही अपवाद असतीलच. पण मोबाइल आपल्यासाठी आहे आपण मोबाइलसाठी नाही हे भान महिलांना जास्त आहे, हे मात्र नक्की.

Story img Loader