डॉ. उल्का नातू – गडम
आसने करताना अंगात अतिशय सैलसर, सुती कपडे परिधान करावेत. अतिशय कोंदट जागी आसने करणे टाळावे. गुरुवर्य योगाचार्य व्यवहारे म्हणत, साधना रोगी, भोगी अथवा योगी कुणीही करावी. वनी करावी, कोनी म्हणजे घराच्या एखाद्या कोपऱ्यात करावी, महत्त्वाचे – ती ‘मनी’ म्हणजे मनापासून करावी.
आसने करताना कधीही श्वास रोखून धरू नये. कुणाशीही स्पर्धा करून अंतिम स्थिती गाठण्याचा प्रयत्न करू नये. स्वत:च्या मर्यादा – उदाहरणार्थ वय, लिंग, शारीरिक व्याधी समजून घेऊनच आसने करावीत. प्रयत्नाने, हळूहळू सरावाने अंतिम स्थिती गाठता येईल पण त्यासाठी हट्ट नको. दुराग्रह नको. साधना करताना आनंद, साधनेचे अंतिम उद्दिष्टही आनंदच असावे!
ध्यानात्मक गटातील एक सोपे आसन- सुलभ अर्धपद्मासन! आज आपण त्याचा सराव करूया. आसन करण्यासाठी पूर्वस्थिती – बैठकस्थिती घ्या. दोन्ही पाय शरीरापुढे एकमेकांस समांतर, सरळ ठेवा. आता एक पाय दुमडून त्याची टाच विरुद्ध बाजूच्या जांघेमध्ये ठेवा.
आता दुसरा पाय दुमडून ते पाऊल मांडीखाली सरकवा. वरचे पाऊल जितके पोटाजवळ, जांघेमध्ये घेता येईल तितके घेण्याचा प्रयत्न करा. अंतिम स्थितीत डोळे मिटून लक्ष श्वासावर एकाग्र करा. पाठकणा समस्थितीत ठेवा. कपाळावरील आठ्या प्रयत्नपूर्वक काढून टाका. चेहेरा प्रसन्न असू दे.
या आसनाच्या सरावाने उदरश्वसनाची सवय होते. पाया अतिशय मजबूत, शरीराचा आकृतीबंध त्रिकोणी होतो. स्थिरतेकडे शरीर व मन दोन्ही झुकू लागते. ध्यानासाठी मनाची आदर्श तयारी होते. चिडचिड कमी होते. सारासार विवेक वाढीला लागतो, त्यामुळे जीवनातील द्वंद्वांना सामोरे जाण्यास लागणारी मनोभूमिका तयार होऊ लागते.
ulka.natu@gmail.com