“शर्वरी, गेले काही दिवस तू खूप बेचैन आहेस, हे जाणवतंय. काय झालंय नक्की?”
“काही नाही गं. कामाचा ताण आहे एवढच.”
“कामाचा ताण घेणारी तू नाहीस. ऑफिसमध्ये कितीही कामं करावी लागली तरी तू दमत नाहीस, थकत नाहीस हे काय मला माहिती नाही? तुझ्या मनात काय चाललंय ते मला सांग. तुझं दुःख तू कुणाला सांगत नाहीस. चेहऱ्यावर हसू ठेवतेस, पण मी तुझी चांगली मैत्रीण आहे. तुझ्या डोळ्यांतील भाव मला ओळखता येतात.”

दुबईहून पुन्हा भारतात आल्यानंतर एवढी खूष असणारी शर्वरी अलीकडे फारच निराश दिसत होती. शामल आणि शर्वरी बालपणापासूनच्या मैत्रिणी होत्या. म्हणूनच शर्वरीच्या वागण्यातील बदल शामलच्या लक्षात आला होता. शर्वरीनं डोळ्यातली आसवं रुमालानं टिपून घेतली.

Mother Always Protect Her Child
आई आहे ना…! वेगात येणारी राईड पाहून चिमुकलीने काढला पळ अन् पाहा VIDEO चा जबरदस्त शेवट
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Supriya Sule and Pankaja Munde (1)
VIDEO : अजित पवार व्यासपीठावर असताना सुप्रिया सुळे अन् पंकजा मुंडेंची गळाभेट, सुनेत्रा पवार येताच…; व्यासपीठावर नेमकं काय घडलं?
Success Story Of IAS Siddharth Palanichamy
Success Story: यूपीएससीच्या अभ्यासासाठी सोशल मीडियाची मदत; पहिल्याच प्रयत्नात भरघोस यश; वाचा, देशातील सर्वांत तरुण IAS ची गोष्ट
Former Shekap district secretary and Meenakshi Patil son Aswad Patil will join BJP print politics news
शेकापचे पाटील कुटुंबीय भाजपच्या वाटेवर
Mumbai police latest news in marathi
मुंबई पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेत गैरप्रकार, आधीच दिली होती सूचना तरीही…
mother shouts at the Pet Dog
आई अशीच ओरडते ना? घरभर केस पडलेले पाहून श्वानाला ओरडली अन्… ; VIDEO पाहून येईल हसू
chaturanga  article on Menstruation and menopause
ऋतुप्राप्ती ते ऋतुसमाप्ती : सर्जनशीलतेच्या वाटेवर चालताना

हेही वाचा: ‘कूल द ग्लोब’ ॲप बनवणाऱ्या मराठमोळ्या प्राचीवर फोर्ब्सची कौतुकाची थाप

“चल आपण कॉफी घेऊ या,”, असं म्हणून ती शामलला घेऊन ऑफिसच्या कॅन्टीनमध्ये आली.
“शामा, मला ऑफिसमधून दुबईच्या प्रोजेक्टसाठी पाठवलं, तेव्हा मी जायला तयार नव्हते. प्रमोशन नाही मिळालं तरी चालेल, पण सुहास आणि मुलांपासून लांब राहायचं नाही, असं ठरवलं होतं. परंतु त्या वेळेस सुहासने मला धीर दिला. ‘मुलांकडे मी बघेन. सर्व सांभाळून घेईन. तुझं करिअरही महत्वाचं आहे. तू ही संधी सोडू नकोस.’ असं म्हटल्यावर मी दुबईला जाण्यास तयार झाले. मी सुट्टी घेऊन परत येण्याची तो असोशीनं वाट बघायचा. ‘आई येणार’ म्हणून मुलंही खूप खूष असायची. या चार वर्षांच्या कालावधीत मुलांचे उपक्रम शिक्षण,आजारपणं इत्यादी सर्व त्यानं एकट्यानं सांभाळलं.

माझा प्रोजेक्ट पूर्ण झाल्यानंतर मी तीन महिन्यापूर्वी पुन्हा भारतात परतले. आता सगळे प्रॉब्लेम संपले, असं मला वाटलं होतं, पण सगळं उलटंच झालं गं. मी घरात असणं कुणालाच नकोसं झालंय. माझ्याशिवाय जगण्याची माझ्या नवऱ्याला आणि मुलांनाही सवय झाली आहे. मुलांना खाण्यापिण्याची बंधने, लवकर घरी येणं, अभ्यासकडं लक्ष देणं या बाबतीत शिस्त लावण्याचा प्रयत्न केला तर त्यांना माझी कटकट वाटते. मी काही बोलायला गेले तर म्हणतात,‘जेव्हा आम्हांला तुझी गरज होती, तेव्हा तू सोबत होतीस का?’सुहासला काही सांगायला गेले तर तो ही म्हणतो,‘माझ्यामध्ये लुडबुड करू नकोस.’ फक्त त्यांचंच नाही तर घरातील कामवाल्या मावशी मला परवा म्हणाल्या,‘ताई, तुम्ही नव्हता तवा दादा लै संभाळून घ्यायचं. तुम्ही लई कटकट घालता.’ मी घरात कुणालाच नकोशी झाले आहे.”

हेही वाचा: Election 2024 : पुरुषांपेक्षा महिलांचं मतदान अधिक, यंदाच्या निवडणुकीत महिला मतदारांची संख्या का वाढली?

“मलाही एकट्यानं राहण्याची सवय झालेली होती. मी केव्हाही कुठंही जाऊ शकत होते. माझ्या मनानं काही निर्णय घेऊ शकत होते, पणआता ‘हे असंच का? आणि ते तसंच का?’अशा प्रश्नांना उत्तरं द्यावी लागतात आणि सुहासचे आणि माझे सारखे खटके उडतात. मी उगाचंच इकडं आले. मी पुढचं प्रमोशन घेऊन तिथंच थांबले असते, तर बरं झालं असतं असं आता मलाही वाटायला लागलंय. आपल्याचं नात्यांपासून आपण एवढं दूर का जातो गं? प्रेमाच्या नात्यातही अशी घुसमट का होते?हव्याहव्याशा वाटणाऱ्या नात्यांमध्ये असा दुरावा का?”

शर्वरी तिचं मन मोकळं करीत होती. तिच्या मनातील वादळांना थोपवण्याचा प्रयत्न शामल करू लागली.
“शर्वरी, तुझ्या घरातील सर्वांना आणि तुलाही एकमेकांशिवाय जगणं सुरुवातीला अशक्य वाटलं. सुरुवात केल्यावर जड वाटलं, पण त्यात स्वतःचा आनंद शोधण्याचा प्रयत्न तुम्ही केलात. आणि त्याची सवय करून घेताना मोकळ्या ढाकळ्या स्वातंत्र्याची सवय अंगवळणी पडली. ‘तुझं तू, माझं मी’ जगण्याची सवय झाली आणि आता पुन्हा एकत्र राहताना एकमेकांच्या स्वभावाचे, विचारांचे कंगोरे एकमेकांना टोचायला लागले आहेत. हे बघ, इतके दिवस आपल्या मनाला वाटेल तसं मजेत, आनंदात आणि आळसात जगायला सोकावलेली मुलं तुझ्या शिस्तीला कशी जुमानतील? आणि तू सुद्धा मुलांनी लगेच ऐकावं असा अट्टाहास का करतेस? तू नसल्यामुळं सुहासलाही स्वतःचे सर्व निर्णय स्वतः घ्यायची सवय लागली होती, आता पुन्हा प्रत्येक गोष्ट तुला विचारून करायची हे त्याला लगेच कसं जमेल? स्वतःचे स्वातंत्र्य प्रत्येकाला हवं असतं, तुलाही ते हवं आहेच, हे स्वातंत्र्य मिळालं नाही, अपेक्षांची पूर्तता झाली नाही, की मग हवाहवासा वाटणारा सहवासही बोचायला लागतो.

हेही वाचा: lok sabha election 2024 : उन्हामुळे सकाळीच मतदानाचा उत्साह

शर्वरी तू आणि सुहास मध्यंतरीच्या काळात ‘मॅरीड बॅचलर’ म्हणून जगत होतात. तेच बरं आहे, असंही तुम्हांला वाटायला लागलं होतं, पण एकत्र राहताना एकमेकांच्या भावनांचा विचारही करावा लागतो. आता यापुढं स्वतःमध्ये कसे बदल घडवून आणायचे, याबाबत तुम्ही एकमेकांशी मोकळेपणाने बोलायला हवं आणि त्यासाठी वेळही द्यायला हवा.”

शामलच्या बोलण्यात तथ्य आहे, हे शर्वरीला कळत होतं. तिनं मनातल्या मनात घडून गेलेल्या सर्व घटनांचं सिंहवलोकन केलं आणि स्वतःमध्ये काही बदल करायचं ठरवलं आणि ती पुढच्या कामाला लागली.

(लेखिका कौटुंबिक न्यायालयात समुपदेशक आहेत.)
(smita joshi606@gmail.com)

Story img Loader