पिरीयड्सच्या काळात होणारा त्रास कमी करण्यासाठी पेनकिलर्स आणि अगदी इंजेक्शन्सपासून सगळं काही घेतलं जातं. पण तरीही काहीवेळेस उपयोग होतोच असं नाही. दरवेळेस सगळ्यांनाच पेनकिलर्स सूट होतातंच असंही नाही. त्यामुळे पाळीच्या काळात त्रास कमी होण्यासाठी काही पर्याय असू शकतो याची वाट पाहणाऱ्या अनेकींसाठी एक खूशखबर आहे. कारण या वेदना कमी करण्यासाठी आता एक पिरीयड किट आलं आहे. पिरीयड्सच्या काळातील वेदना कमी करण्यासाठीच्या एका बॉडीसूटची चाचणी घेण्यासाठी हंगेरीतल्या बुडापेस्टमध्ये ‘अल्फा फेमटेक’या स्टार्ट अपच्या वतीने एक सर्व्हे पार पडला. हा बॉडीसूट विकसित करण्यासाठी स्वयंसेवक म्हणून मदत करण्याचं आवाहन या स्टार्ट अपच्या वतीने महिलांना करण्यात आलं होतं. मासिक पाळीच्या काळात होणाऱ्या असह्य वेदनांपासून सुटका करण्याच्या हेतूनेच हा बॉडीसूट बनवला जात होता.

आणखी वाचा : UNION BUDGET 2023 केंद्रिय अर्थसंकल्पात महिलांसाठी ‘या’ खास योजना!

painkillers, addiction, Pune, Young woman arrested,
पुणे : वेदनाशामक औषधांचा नशेसाठी वापर, तरुणी अटकेत; औषधांच्या १६० बाटल्या जप्त
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Government Nursing Training School , Bhandara ,
भंडारा : गुण वाढवण्यासाठी प्राचार्यांनी विद्यार्थिनींकडे केली शरीरसुखाची मागणी
Algae found in ginger
महिलांनो तुम्हीही हिवाळ्यात जास्तीचं आले आणताय? एका महिलेला त्यात काय मिळालं पाहा; VIDEO पाहाल तर झोप उडेल
chatura loksatta marathi news
स्त्री आरोग्य : नववर्षाचा संकल्प; फिट राहा!
epileptic attack, youth epileptic attack, Pune,
पुणे : अपघातानंतर तरुणाला अपस्माराचा झटका, पोलीस उपायुक्त संदीप भाजीभाकरेंच्या तत्परतेमुळे वैद्यकीय मदत
How Cold Weather Impacts Men's Sexual Health
हिवाळ्यात पुरुषाच्या लैंगिक आरोग्यावर कसा परिणाम होतो? तज्ज्ञांनी सांगितले, कशी घ्यावी काळजी?
BCG vaccination Mumbai, tuberculosis in Mumbai,
मुंबईत क्षयरोग प्रतिबंधात्मक प्रौढ बीसीजी लसीकरण, पहिल्याच दिवशी १ हजार ९९० नागरिकांचे लसीकरण पूर्ण

मासिक पाळीच्या संदर्भात सर्व्हे पूर्ण करणाऱ्या अर्जदार महिलांमधून डॉक्टरांनी या प्रयोगासाठीच्या योग्य उमेदवारांची निवड केली. या बॉडीसूटला आर्टेमिस असं नाव देण्यात आलं. या बॉडीसूट्समध्ये अंतर्गत उष्णतेचे पॅनेल्स असून आणि टेन्स (transcutaneous electrical nerve stimulation) जेल पॅड्स आहेत. हे जेल पॅड्स सहसा स्त्रिया बाळंतपणाच्या वेळेस वापरतात. वेदनांबाबतचे सिग्नल्स मेंदूपर्यंत पोचवण्यात यातील पॅनल्स अडथळे निर्माण करतात. दरम्यान, हे हिट पॅनेल्स गर्भाशय आणि त्याच्या आजूबाजूच्या स्नायूंना थोडा थंडावाही देण्याचं काम करतं. हा बॉडीसूट तळहाताच्या आकाराची बॅटरी आणि टेन्स मशीनवर चालतो. हा सूट छोट्याशा खिशातही मावतो किंवा क्लिपने जोडला जाऊ शकतो. हा वापरणाऱ्या स्त्रीच्या म्हणजे यूजरच्या स्मार्टफोनला ब्लूटूथ किंवा अॅपद्वारे सूट जोडला जाऊ शकतो.

आणखी वाचा : महिला वैमानिकाची सर्वाधिक टक्केवारी भारतातच का?

प्रयोगात सहभागी झालेल्यांना पिरीयड्स सुरु असताना हा बॉडीसूट घालायला सांगण्यात आले होते. “हा पूर्णपणे वेगळा अनुभव होता, अगदी कमी वेदना किंवा अजिबात वेदना झाल्या नाहीत ” अशी प्रतिक्रिया यातील एकीने व्यक्त केली. हा बॉडीसूट मेरिनो लोकर आणि कृत्रिम धाग्यांना एकत्र करून तयार केलेला होता आणि तो अगदी आरामदायी आणि घालायलाही खूप छान वाटला, असंही तिनं सांगितलं. मात्र तिला याचा एकच दुष्परिणाम जाणवला . तो म्हणजे तिचे हे मासिक पाळीचे दिवस तिला एरवीपेक्षा जास्त जड गेले असं तिला वाटलं. पण कदाचित स्नायू रिलॅक्स झाल्याचा परिणाम असावा, असंही तिला वाटतं.

आणखी वाचा : फॅशनमधलं चित्रविचित्र! सिंहाच्या मुंडक्याचा गाऊन घालण्यास कारण की…

अल्फा फेमटेक या कंपनीच्या सहसंस्थापक एना सोफिया कॉर्मोस यांच्या संकल्पनेतून या बॉडीसूटची कल्पना प्रत्यक्षात उतरली. त्यांचा विशेष भर मासिक पाळीच्या दरम्यानचे आरोग्य या विषयावर राहिला आहे. आम्हाला जास्तीत जास्त स्त्रियांना वापरता यावं असं उत्पादन तयार करायचं होतं. त्यासाठी आम्ही जवळपास ३५० स्त्रियांशी मासिक पाळीशी निगडीत सवयींबद्दल बोललो, अशी माहिती संशोधनात सहभागी तज्ज्ञांनी दिली. हा बॉडीसूट एखादं वैद्यकीय उपकरण वाटण्याऐवजी ‘फॅशन आयटम’ दिसावा असाच होता, असं मत यात सहभागींपैकी एकीने व्यक्त केले.

आणखी वाचा : नातेसंबंध: बॉयफ्रेण्डनं ‘डीच’ केलं तर?

या चाचणीत सहभागी झालेल्या काही महिलांना मासिक पाळीच्या समस्येबरोबरच त्याच्याशी निगडीत आरोग्याची समस्याही होती. यातील एका सहभागीला तर असह्य अशा वेदना होत असत. पाळीशी निगडीत समस्येमुळे तिला अंतर्गत भागात जखमा झाल्या होत्या, काही भागात चट्टेही पडले होते. या काळात बरं वाटण्यासाठी ती तिच्याबरोबर सतत गरम पाण्याची बाटली घेऊन फिरायची. पण सप्टेंबरपासून मात्र तिनं ही बाटली वापरणं बंद केलं आणि त्याऐवजी पाळीतील वेदना कमी करण्यासाठी तयार करण्यात आलेला बॉडीसूट वापरला. हे अगदी छोटंसं, वायरलेस टेन्स मशिन आहे जे वापरणारी स्त्री तिच्या बेंबीच्या खालच्या भागात किंवा पाठीच्या खालच्या भागात सहजपणे लावू शकते. यामध्ये एक डिस्कच्या आकाराचे साधारणपणे ८ सेंमी. व्यास असलेले युनिट असते. त्यामध्ये टेन्सजेल पॅड, यूएसबी चार्ज केलेली बॅटरी आणि कंट्रोल करणारी बटणे यांचा समावेश आहे. साधारणपणे २० ते ३० वेळा हा बॉडीसूट वापरता येतो. अर्थात सध्या हे सगळं प्रायोगिक तत्त्वावर असलं तरी कृत्रिमरित्या का होईना पण मासिक पाळीच्या काळातील वेदना थांबवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत हे महत्त्वाचं. येत्या काही महिन्यांमध्ये युरोपच्या बाजारपेठेत हा बॉडीसूट उपलब्ध होईल. आपल्याकडे हा बॉडीसूट येईलच पण त्याची किंमत सध्या गुलदस्त्यात आहे. तो सर्वसामान्यांना परवडणारा असेल तर ठीक अन्यथा पुन्हा पेनकिलरचाच पर्याय बहुसंख्य महिलांना स्वीकारण्याशिवाय पर्याय नसेल…
(शब्दांकन : केतकी जोशी)

Story img Loader