जंगलपरिसरात राहणाऱ्या आदिवासी महिलांमध्ये जनजागृती निर्माण करणाऱ्या, तसेच  महिला वनकर्मचाऱ्यांना सन्मान मिळवून देणाऱ्या दीपाली देवकर यांच्याविषयी…

आंतरराष्ट्रीय कंपनीतील उच्चपदस्थ नोकरी सोडून जंगलात काम करणाऱ्या महिलांसाठी कुणी सहजपणे काम करायला तयार होईल का! नाही ना! मात्र, ही कामगिरी करणाऱ्या ज्या काही मोजक्या महिला आहेत त्यांपैकी एक म्हणजे दीपाली देवकरमात्र. जंगलालगतच्या गावांमधील महिलांना त्यांच्यासोबतच राहून त्यांना स्वच्छतेपासून इतर सर्व गोष्टींची जाणीव करून देण्याचं काम त्यांनी काम. इतकंच नव्हे तर वनखात्यात नोकरी करणाऱ्या पहिल्या फळीतील महिलांना ‘एक्सप्लोरिंग वूमनहूड फाउंडेशन’च्या माध्यमातून ‘वनदुर्गा’ सन्मान देऊन त्यांच्या कामाचं कौतुक करण्याचं कामही त्यांनी केलं.

maharashtra government defends ladki bahin yojana in bombay high court
महिला सशक्तीकरणासाठी ‘लाडकी बहीण’; राज्य शासनाचे उच्च न्यायालयात उत्तर; अतिरिक्त भार पडत नसल्याचे स्पष्टीकरण
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
PM Modi to dedicate 3 frontline naval combatants to nation
आत्मनिर्भरतेतील आव्हाने!
Success story of kalpana saroj who got married at 12 now owning crores business
बाराव्या वर्षात लग्न अन् सासरच्यांचा छळ! पण हार न मानता २ रुपयांची कमाई करणाऱ्या ‘या’ महिलेने उभारलं कोट्यवधींचं साम्राज्य
बारामतीत कार्यक्रमाच्या निमंत्रणावरून नाराजी नाट्य; खासदार सुप्रिया सुळे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
History , Art , Contemporary Visual Art , Feminist ,
दर्शिका : ‘अनंतकाळच्या माते’ची अनंतकाळची लढाई…
Female officer of provident fund office assaulted Shivajinagar police files case against businessman
भविष्य निर्वाह कार्यालयातील महिला अधिकाऱ्याला धक्काबुक्की, शिवाजीनगर पोलिसांकडून व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
Haldi Kunku Gift Ideas for Womens in Budget
Makar Sankranti Gift Idea: सुवासिनींना यंदा हळदी-कुंकवासाठी ‘वाण’ काय द्यायचं? पाहा ‘या’ भन्नाट आयडिया; खर्च कमी आणि वस्तूही उपयोगी

हेही वाचा >>> Tara Bhavalkar : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झालेल्या डॉ. तारा भवाळकर कोण आहेत?

पुण्यासारख्या शहरातून गडचिरोली जिल्ह्यातील कमलापूर या नक्षलग्रस्त भागात दीपाली देवकर यांचा संबंध आला तो वनखात्यातच अधिकारी असणारे पती अतुल देवकर यांच्यामुळे. याठिकाणी त्या आल्या तेव्हा इथल्या भाषेचा गंधही त्यांना नव्हता. वनकर्मचाऱ्यांच्या वसाहतीतल चौकदारांची मदत घेऊन त्यांनी या नक्षलग्रस्त भागातील महिलांशी संवाद साधायला सुरुवात केली. त्यावेळी शहर आणि गाव यांतली दरी त्यांना उमगली. मासिक पाळीविषयी समोर येऊन बोलायला अजूनही सुशिक्षित महिला घाबरतात, तिथे गावखेड्यातील महिलांची तर गोष्टच वेगळी. गडचिरोली जिल्ह्यातील रेपनपल्ली गावातील गावकऱ्यांची जास्त भिस्त डॉक्टरपेक्षा भगतावर. त्यामुळे सर्पदंशावरही ते मांत्रिकाचाच उपचार घेत असत. दीपालीताईंसाठी हा प्रकार अस्वस्थ करणारा होता. त्यांनी या अंधश्रद्धेच्या जोखडातून या गावकऱ्यांना बाहेर काढायचं असं ठरवलं. हे काम शिवधनुष्य पेलण्यासारखंच होतं, पण त्यांनी कामला सुरुवात केली.  याकामी त्यांना अक्षरश: घाम गाळावा लागला. त्यांनी स्वत:हून प्राथमिक उपचार सुविधा पुरवण्यास सुरुवात केली. सुरुवातीला गावकरी ते स्वीकारायला तयार नव्हते. पुढे अतुल देवकर यांची बदली झाली आणि त्या गडचिरोली सोडून पेंच व्याघ्रप्रकल्पात सुरू असलेलया भागात आल्या. तिथेही त्यांनी नव्याने काम सुरू केले.  सॅनिटरी नॅपकीन कसे वापरायचे, त्याची विल्हेवाट कशी लावायची, त्याला पर्यायी मार्ग कोणता, त्यातून होणारे आजार याबाबत ग्रामीण महिला अनभिज्ञ होत्या. दीपाली देवकर यांनी सॅनिटरी नॅपकीन वाटण्यापासून सुरुवात केली. येथेही प्रश्न तोच कायम होता. गावातील महिला हे सर्वकाही स्वीकारण्यास तयार नव्हत्या. मात्र, त्यांनी हळूहळू या स्त्रियांना यासाठी राजी केले.

जो प्रश्न जंगलालगतच्या गावातील महिलांचा तोच प्रश्न किंबहुना त्याहूनही अधिक समस्या जंगलात काम करणाऱ्या महिला वनरक्षकांच्या. सरकारी नोकरी त्यामुळे अडचणींविषयी कुठे काही बोलता येत नसे. दीपाली देवकर यांचे खऱ्या अर्थाने काम इथूनच सुरू झाले. या महिला वनरक्षकांच्या समुपदेशनापासून त्यांनी कामाची सुरुवात केली. कामाच्या ठिकाणी होणारा मानसिक, शारीरिक, लैंगिक छळ ही समस्या जवळजवळ सगळीकडेच. अशावेळी त्याचा विरोध कसा करायचा इथपासून ते पुरूष सहकाऱ्याच्या बरोबरीचे हक्क मिळवण्यासाठी या महिलांचे समुपदेशन केले.

हेही वाचा >>> Women MLA In Jammu Kashmir : शगुन, मीमा आणि सकिना; जम्मू काश्मीरमधील विधानसभेत या तिघींचा घुमणार आवाज!

या महिला कर्मचाऱ्यांना स्वत:च्या हक्काची जाणीव करून दिली. वनखात्यातला कर्मचारी आणि जंगलालगतचा गावकरी यांच्यातील संबंध अजूनही फार मैत्रीपूर्ण नाहीत. अशावेळी या दोघांमध्ये सौहार्दाचे वातावरण निर्माण करण्याचे मोठे काम त्यांनी केले. करोनाकाळात ग्रामीण महिलांनी तयार केलेल्या मुखपट्ट्या, पिशव्या अप्रतिमच होत्या. या महिलांना अनेक छोट्या रोजगारांचे प्रशिक्षण दिले आणि त्याला व्यावसायिक जोड कशी द्यायची याचं मार्गदर्शन केलं. आपणही उद्याजिका होऊ शकतो असा विश्वास त्यांनी दिला. यासाठी त्यांनी ‘एक्सप्लोरिंग वूमनहूड फाउंडेशन’ स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून या महिलांना उद्योग उभारण्यापासून ते व्यावसायिकतेचे धडे दिले.

 वनखात्यातील पहिल्या फळीतील महिला कर्मचाऱ्यांना मागील चार वर्षांपासून त्यांच्या संस्थेतर्फे ‘वनदुर्गा’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. हा पुरस्कार आता आंतरराष्ट्रीय पातळीवर जाऊन पोहोचला आहे. दरवर्षी चारजणींना हा पुरस्कार दिला जातो. त्यातील तीन पुरस्कार प्रत्यक्षात कार्यक्षेत्रावर काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याला, तर एक पुरस्कार कर्मचाऱ्याच्या जोडीदाराला दिला जातो. विविध उपक्रम आणि कार्यक्रमाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांनी महिला वनकर्मचाऱ्यांच्या यशोगाथा मांडल्या. यातूनच त्यांच्या कार्याची गाथा आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचली. त्यामुळे आययुसीएन, युएन, आरआरएफ, टेरी, पोश यांसारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये त्यांना व्याख्याता म्हणून आमंत्रित केले जाते. भारतीय महिला वनकर्मचाऱ्यांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी लंडन पॉडकास्टवर त्यांना पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. एवढेच नाही तर ‘जी २०’ शिखर परिषदेत त्यांना प्रतिनिधित्व देण्यात आले.  राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर त्यांनी निसर्ग संवर्धन, लैंगिक समानता, स्वसंरक्षण आदी क्षेत्रांतील महिलांना त्या कायम प्रोत्साहन देत असतात.

हेही वाचा >>> कुपोषित बालकांना सुदृढ करण्यासाठी झटणाऱ्या श्वेता गडाख

वनखात्यातील अधिकारी त्याच्या कार्यक्षेत्रात काम  रून निघून जातो. कुटुंब आणि नोकरी अशा दोन्ही पातळींवर कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्याच्या पत्नीच्या मनात असणाऱ्या अनेक गोष्टी वेळेअभावी तिला कुणाजवळ बोलता येत नाहीत. मनात अनेक गोष्टी खोलवर दडलेल्या असतात. त्यावर व्यक्त होणे गरजेचे असते. अशा महिलांचे मनोगत ‘मिसेस फॉरेस्ट ऑफिसर’ या डायरीतून मांडण्याचा त्यांचा मानस आहे.

अनेकदा महिलांनाच त्यांच्या अधिकारांविषयी माहिती नसते. त्यांच्यासोबत काम करताना अनेक लहानसहान अधिकाऱ्यांपासून त्या कोसो दूर असल्याचे जाणवते. अशावेळी साध्या आणि सोप्या भाषेत त्यांना त्यांच्या अधिकाराची जाणीव करून देणारे ‘हँडबुक’ दीपाली देवकर यांना तयार करायचे आहे.

अलीकडेच त्यांचा ‘क्वीन ऑफ फॉरेस्ट’ हा वनाधिकाऱ्यांची लवचिकता, समर्पण आणि  बांधिलकी दर्शवणारा सत्यकथांचा संग्रह प्रसिद्ध झाला आहे. या पुस्तकात त्यांनी वनखात्यातील २४ उल्लेखनीय महिलांच्या कथा शब्दांकित केल्या आहेत. जंगल, वन्यजीव आणि पर्यावरणासाठीचा त्यांचा लढा यात मांडण्यात आला आहे. वन्यप्राण्यांची शिकार ते जंगलतोड यांच्याशी लढा देण्यापासून ते दीर्घकाळ कुटुंबापासून दूर राहण्यापर्यंत… आणि एवढेच नाही तर प्रतिकूल परिस्थितीत या महिला अधिकाऱ्यांचे सामर्थ्य, चिकाटी यांचे उत्कृष्ट आणि वास्तव चित्रण त्यांनी या पुस्तकात केले आहे. क्षेत्राधिकारी ते राज्यप्रमुख अशा विविध पदांवर काम करणाऱ्या २४ वनाधिकाऱ्यांच्या सत्यकथा यात आहेत. यातील बारा कथा या २००० सालाच्या आधी वनखात्यात काम केलेल्या महिला अधिकाऱ्यांच्या तर उर्वरित बारा कथा या २००० सालानंतर वनखात्यात काम केलेल्या महिला अधिकाऱ्यांच्या आहेत.

‘एक्सप्लोरिंग वूमनहूड फाउंडेशन’ च्या माध्यमातून त्यांनी वनखात्यातील आणि जंगलालगतच्या महिलांच्या उत्थानाचेच कार्य हाती घेतले आहे. महिला वनकर्मचाऱ्यांची क्षमता वाढवण्यासाठीच दीपाली देवकर कायम कार्यरत असतात. खरं तर वनखात्यात काम करणारा महिला वर्ग आणि तोदेखील पहिल्या फळीतील महिला वर्ग तसा दुर्लक्षितच! पण दीपाली यांनी या महिलांना आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख मिळवून दिली आहे. 

rakhi.chavhan@expressindia.com

Story img Loader