डॉ. लीली जोशी

मूल लहानाचं मोठं करणं हे काही सोपं काम नाही. मुलाच्या निकोप वाढीसाठी आई-बाबा तर लागतातच; पण आजी-आजोबा, काका-मामासारखे कुटुंबातले इतर लोकही कमीअधिक प्रमाणात पालकत्वाची भूमिका निभावत असतात. अशी सर्व बाजूंनी निगराणी ज्या मुलाची होते, ते भाग्यवान म्हटलं पाहिजे. परंतु असं नेहमीच घडतं असं नाही. विविध कारणांमुळे एकट्यानेच मुलाचं संगोपन करण्याची जबाबदारी कित्येक तरुण-तरुणींवर पडलेली दिसते. कोणाचा घटस्फोट, तर कोणी विभक्त, कोणाचा जोडीदार कामानिमित्त दीर्घकाळ परगावी किंवा परदेशी गेलाय, तर काही जणांवर जोडीदाराच्या मृत्यूमुळे एकल पालक होण्याची जबाबदारी आली आहे. तर काही वेळा लग्नपूर्व गर्भधारणा आणि मातृत्व, एकट्या राहणाऱ्या समलिंगी किंवा विषमलिंगी व्यक्तींनी मूल होऊ देण्याचा घेतलेला निर्णय, त्यांची इच्छापूर्ती करण्यासाठी सक्षम असलेली वैद्यकीय यंत्रणा असे विभिन्न आयाम एकल पालकत्वाला आता आले आहेत.

minor boy stabbed his mother
कोवळ्या वयात एवढा राग…मुंबईत अल्पवयीन मुलाकडून आईवर चाकूने हल्ला, महिलेवर शीव रुग्णालयात उपचार सुरू
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Amit Shah IMP Statement about CM Post
Amit Shah : ‘महायुतीचं सरकार आल्यास मुख्यमंत्री कोण?’ अमित शाह म्हणाले, “नेतृत्व…”
Viral video of disabled swiggy delivery boy doing food delivery by riding a cycle
परिश्रमाशिवाय पर्याय नाही! दिव्यांग असूनही करतोय फूड डिलिव्हरी, VIDEO पाहून वाटेल अभिमान
deputy cm devendra fadnavis open up about late Rajendra Patni son dnyayak patni in karanja
फडणवीस म्हणाले, “पाटणी पुत्राची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, पण…”
Ajit Pawar Jayant Patil x
Jayant Patil : “अरे बाप नाही, तुझा काकाच…”, जयंत पाटलांचं अजित पवारांच्या टीकेला प्रत्युत्तर
Kitchen jugad video orange peel and milk scrub for tanning skin
Kitchen Jugaad: दुधात संत्र्याची साल टाकताच कमाल झाली; Video पाहाल तर दररोज कराल हा उपाय
Paithani web series on Zee 5 OTT entertainment news
आई मुलीच्या नात्याची ‘पैठणी’

हे एकल पालकत्व आईचं असेल तर? मुला-मुलीचा आहार, कपडालत्ता, शाळा आणि इतर ॲक्टिव्हिटीज याला बराच पैसा लागत असतो. पोटगी किंवा इतर स्रोत असले तरी आईला घराबाहेर पडून अर्थार्जन करणं भागच असतं; पण एकल पालक म्हणून तिच्या वेळांवरसुद्धा मर्यादा येतात. प्रमोशनवर बदली, कामानिमित्त वरचेवर परगावी दौरे, ओव्हरटाइम हे सर्व पैसे मिळवून देणारं असलं तरी ती अनेकदा ते टाळते कारण ठरावीक वेळेला तिला घरी पोहोचावंच लागतं. पाळणाघर, खेळघर किंवा शाळेतून मुलाला आणायचं असतं. या मर्यादांमुळे आईचं वेतन कमीच राहातं. आर्थिक चणचण सदाचीच असते. मुलाला हवी असणारी सुरक्षितता, निवारा, पौष्टिक अन्न, अभ्यासासाठी- खेळासाठी योग्य वातावरण, सुविधा. हे सगळं पुरवताना एकट्या आईची फरपट होते. परिणामी ती सदैव चिंतातुर, अस्वस्थ राहाते. याचा तिच्या कामावर विपरीत परिणाम होऊ शकतो. याची परिणती कधी कधी मुलावर चिडण्यात, प्रसंगी धपाटे घालण्यात, कधी रडण्यात होते. घरातलं वातावरण बिघडून जातं. आईला आपल्यामुळे त्रास होतो हे काही हळव्या मुलांना समजतं. ते स्वतःला अपराधी समजू लागतात. इकडे आपल्या मूड्समुळे मूल बिचारं झालं म्हणून आईलाही अपराधी वाटतं. याउलट काही मुलं उद्धट, आक्रमक बनतात. या मुलांनी घटस्फोट होण्याअगोदर खूप बोलाचाली, भांडणं, शारीरिक हिंसासुद्धा अनुभवली असते. मग आईला उलटून बोलणं, घरची शिस्त न पाळणं, आईचा भावनिक छळ करणं, यात ही मुलं तरबेज होतात. काही मुलांना वाईट संगतीमुळे घातक सवयी लागतात. ड्रग्ज, धूम्रपान, दारु पिणं, छोट्यामोठ्या रकमांची चोरी, खोटं बोलणं, शाळा बुड़वणं अशा गोष्टी सुरू होतात. शाळेव्यतिरिक्त बराच काळ ही मुलं एकट्याने काढत असतील तर ही शक्यता वाढते. चिंता, नैराश्य, व्यसनाधीनता, अभ्यासात पुरेशी प्रगती नसणे, एकाकीपणा अशा गोष्टी एकल पालकांच्या मुलात जास्त आढळतात. जिवलग मित्र होत नाहीत. कुपोषणामुळे ही मुलं वरचेवर आजारी पडतात. अशा वेळी आई कामाला न जाता घरी थांबते, हे लक्षात आल्यावर नक्कीच.

हेही वाचा… सन्मानाची किंमत १५०० रुपये!

हेही वाचा… मॉडेलने टिकली न लावल्यामुळे प्रसिद्ध ब्रॅण्डच्या जाहिरातीला विरोध; ‘#NoBindiNoBusiness’ ही मानसिकता तुम्हाला पटतेय का?

तर मग एकल पालकांनी करायचं काय? ही समस्या आधुनिक शहरी जीवनाचा एक टाळता न येण्यासारखा भाग आहे. याबद्दल मानसतज्ज्ञांच्या सूचना अशा आहेत- * आपल्यासारख्याच इतर एकल पालकांशी संपर्क ठेवा, एक नेटवर्क तयार करा, जे तुमच्या अडीअडचणीला उपयोगी पडेल. मुलांच्या प्ले डेट्सच्या माध्यमातून हे साध्य होऊ शकतं. * आपल्या घरचे लोक, मित्रमैत्रिणी यांच्याशी जवळचे संबंध ठेवा, त्यांच्यावर काही जबाबदाऱ्या सोपवायला लाज वाटू देऊ नका. * आपल्या मुलाला जो काही वेळ द्याल तो १०० टक्के द्या. मी तुझ्यासाठी सदैव आहे, हा विश्वास त्याला द्या. * हळूहळू मुलाला स्वयंपूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहा. आई आणि बाप या दोन्ही जबाबदाऱ्या संपूर्ण निभावणं हे कुणालाच शक्य नसतं. त्यात कधीकधी तुम्ही कमी पडू शकता; परंतु त्यासाठी अपराधित्व नको किंवा त्याची भरपाई म्हणून अवाजवी लाडही नकोत. खंबीर राहा, शांत राहा, स्वतः फिट राहा, म्हणजे लक्षात येईल की एकटीनं मुलाला वाढवणं अवघड असलं तरी अशक्य नाही.

drlilyjoshi@gmail.com