नवरा- बायकोच्या नात्यामध्ये काळानुसार बदल होत जातो. जसंजसा काळ पुढे जातो तसंतसं ते नातं टिकणार की तुटणार हे ठरत जातं. म्हणजे ‘चेरीश’ होणार की ‘रॉटन’ ते ठरत असतं. काय करायला हवं नातं टिकवण्यासाठी?
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
“पूर्वा, अजय कोठे आहे? मी आल्यापासून त्याची भेटच नाही. जेवायलाही तो आला नाही घरी.”
“अजय घरात जेवतच नाही. त्यानं ऑफिसमध्ये टिफिन लावला आहे आणि रात्रीही बाहेर जेवण करूनच घरी येतो.”
“अरे, पण आपली मैत्रीण येणार म्हटल्यावर तरी त्यानं यायला हवं होतं. थांब, मीच फोन करते त्याला.”
“आरोही, तू अजिबात फोन करू नकोस त्याला. जेव्हा यायचंय तेव्हा तो येईल. आम्ही दोघंही एकमेकांना काही विचारतंच नाही.”
“पूर्वा अगं, कॉलेजमध्ये आपण एका ग्रुपमध्ये होतो तेव्हा तू आल्याशिवाय तो टिफिन उघडायचाही नाही आणि तो असल्याशिवाय एक घासही तू खायची नाहीस आणि आता एकमेकांचा एवढा राग का?”
“पूर्वीचं आता काहीच राहिलेलं नाही. गेली १० वर्षात आमच्यात सहजसोपा संवादच राहिलेला नाही. उर्वी तिच्या पुढील क्षणासाठी परदेशात गेल्यापासून तर मुलीसाठी होणारे संवादही थांबले आहेत. आमच्यात नवरा बायकोचं नातच राहिलेलं नाही. आम्ही फक्त एका छताखाली राहतो. त्याची कामं तो करतो, माझी मी करते.”
हेही वाचा >>> समुपदेशन : ‘इगॅलिटेरियन रिलेशनशिप’ मधे आहात का?
“गेली १० वर्ष हे नातं असंच आहे? अगं, मग घरच्यांची मदत घेऊन तुमच्यातील नातं चांगलं करण्याचा प्रयत्न का नाही केलास?”
“आरोही, आम्ही आमच्या पसंतीनं लग्न केलं. लग्नापूर्वी दोन वर्षं आम्ही एकमेकांना ओळखत होतो, एकमेकांसोबत फिरत होतो, मित्र म्हणून आमच्या दोघांचं नातं खूपच चांगलं होतं. आम्ही एकमेकांमध्ये भावनिकरित्या अडकलो आहोत हे लक्षात आल्यावर आम्ही लग्न करायचं ठरवलं. आमची जात,धर्म सगळंच वेगळं होतं म्हणूनच आमचं लग्न दोघांच्याही आईवडिलांना मान्यच नव्हतं, पण तरीही दोघांनी हट्टाने लग्न केलं. काही दिवस चांगले गेले, पण नंतर लक्षात आलं की दोघांचे विचार, आयुष्याकडं बघण्याचा दृष्टीकोन सगळंच वेगळं होतं. तडजोड करीत सोबत राहणं चालू ठेवलं. उर्वीच्या जन्मानंतर केवळ आई वडील म्हणून एकत्र राहण्याचं ठरवलं, पण दिवसेंदिवस एकत्र राहणंही आता अवघड झालंय.
प्रेमात पडलो तेव्हाही काही गोष्टी लक्षात येत होत्या, पण त्या गोष्टींकडं दुर्लक्ष केलं. दोघांना एकत्र यायचं आहे, लग्न करायचं आहे, फक्त याचं गोष्टींवर लक्ष केंद्रित केलं. आई बाबा तेव्हाही हे सर्व धोके सांगत होते, पण त्यांचा विरोध असल्यानं ते उलटच सांगणार असं तेव्हा वाटलं होतं. त्यानंतर आता आमचं नातं टिकवण्यासाठी त्यांची मदत कशी घेणार? त्याच्या नातेवाईकांनी तर आमच्याशी संबंध तोडले होते. जातीबाहेर लग्न केलं म्हणून आमच्याकडं कुणी फिरकतही नव्हतं, आता त्याचे आईवडीलही राहिले नाहीत. समाजासाठी आम्ही एकत्र रहात आहोत.परंतु आता आम्ही केवळ ‘रॉटन रिलेशनशिप’मध्ये आहोत.”
हेही वाचा >>> ‘ग्रे डिव्होर्स’चा विचार करताय?
“पूर्वा, अगं, असं नातं निभावणं योग्य आहे का? तुमच्या दोघांचं पटतं नाही तर मग दोघांनी विभक्त व्हायचं. अशा एकत्र राहण्याला तरी काय अर्थ आहे? एकमेकांबद्दल प्रेम, जिव्हाळा, विश्वास नसेल. एकमेकांतील संवाद हरवले असतील तर एकत्र राहण्याचाच दोघांना त्रास होतो. रॉटन रिलेशनशिप धोक्याचीच असते.’’
“आरोही, तुला खरं सांगू का, खूप वेळा मनात वाटतं, घटस्फोट घेऊन या नात्यातून मोकळं व्हावं, पण स्वतःच निवडलेल्या जोडीदाराशी पटवून घेता आलं नाही म्हणून नातेवाईक काय म्हणतील? समाज काय म्हणेल? माझ्या उर्वीचं कसं होईल? असे असंख्य विचार पुन्हा सतावतात आणि विभक्त होण्याच्या विचारांपासून मी दूर होते.”
“ समाज काय म्हणेल? या भीतीने तुम्ही तुमचं नातं रेटताय? रॉटन रिलेशनशिपमधून दोघांनाही व्यक्तिगत सुख, समाधान,मानसिक स्वास्थ्य मिळणार नाही. मी आता अजयशीही बोलणार आहे. एकतर तुम्ही एकमेकांचे मार्ग वेगळे करा व विभक्त व्हा आणि वेगळं व्हायचं नसेल तर तुमचं नातं सुधारण्यासाठी प्रयत्न करा. एकमेकांचे वेगळे स्वभाव स्वीकारा. एकमेकांना माफ करायला शिका. एकमेकांसाठी जगताना स्वतःच्या काही गोष्टींना मुरड घालावी लागेल, काही सोडून द्यावं लागेल, तर काही नव्यानं स्वीकारावं लागेल हे बदल घडवून आणण्यासाठी तज्ञ व्यक्तींची मदत घ्या.
आज तुमच्यासारखी अनेक जोडपी केवळ समाजाला दाखवण्यासाठी एकत्र राहतात, संसार रेटतात आणि आपलं मानसिक स्वास्थ्य हरवून बसतात. अनेक शारीरिक व्याधींनाही सामोरं जावं लागतं. शिवाय ज्या मुलांसाठी एकत्र राहायचं ठरवतात त्यांच्या मनावर वेगळाच परिणाम होतो. नात्यातील प्रेम, जिव्हाळा त्यांना पहायला मिळत नाही. त्यांच्या व्यक्तिमत्वावर आणि पुढच्या आयुष्यावर याचे विपरीत परिणाम होतात, त्यामुळं नात्याला वेळ देणं आणि ते वेळीचं सावरणं महत्त्वाचं आहे.”
आरोही जे सांगत होती ते पूर्वाला पटतं होतं कारण आता ‘मी लग्नच करणार नाही’ असं उर्वीनं तिला कितीतरी वेळा ऐकवलं होतं. तिची ‘शुगर’ वाढत होती आणि अजयलाही रक्तदाबाच्या गोळ्या सुरू झाल्या होत्या. नात्याबद्दल गांभीर्यानं विचार करायला हवा याची जाणीव तिला झाली. स्वतःचा इगो सोडून अजयशी बोलायचं असं तिनं ठरवलं.
(लेखिका कौटुंबिक न्यायालयात समुपदेशक आहेत.)
(smita joshi606@gmail.com)