सरस्वतीपुत्र ग. दि. माडगूळकर यांचे एक सुरेख गीत आहे- ते माझे घर, ते माझे घर, जगावेगळे असेल सुंदर.. नक्षीदार अती दार तयाचे, अंगणी कमलाकृती कारंजे.. एकोणीसशे चोपन्न सालच्या ‘पोस्टातली मुलगी’ या चित्रपटातील हे गीत आजही प्रत्येक स्त्रीच्या मनातले घराचे स्वप्न रेखाटते.

घराभोवतीच्या बागेत एखादे सुंदर कारंजे बागेची शोभा वाढवते. वृंदावन गार्डनसारख्या सुप्रसिद्ध बागांमध्ये नयनमनोहर कारंजी, झुळझुळणारे पाणी हेच आकर्षण असते. पूर्वीच्या बंगल्यांमध्ये पुष्करणी असे. अनेक गृहसंकुलांमध्ये बागेत कारंजी अथवा छोटेसे तळे करतात. या जलाशयामुळे हवेत गारवा निर्माण होतो.

Nitrate-rich groundwater in Wardha district
धक्कादायक! वर्धा जिल्ह्यातील भूगर्भात नायट्रेटयुक्त पाणी, कर्करोगासह विविध आजार…
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Farmers in Washim district are cultivating chia crop along with traditional crops
वाशीम जिल्ह्यात पीक लागवडीच्या नव्या वाटा; ‘या’ पिकाला मिळतोय चांगला भाव
Fossil footprints show life on earth
कुतूहल : खडकांवरच्या पाऊलखुणा
vasai virar palghar forest declined
शहरबात : उरलेल्या वसईला एकदा बघून घ्या…
way to reduce human-wildlife conflict is through Chandrapur says Forest Minister Ganesh Naik
मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्याचा मार्ग चंद्रपुरातूनच – वनमंत्री
Mumbai national park encroachment loksatta news
राष्ट्रीय उद्यान लुप्त होईल… अतिक्रमणांवर कारवाई न केल्यावरून उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
Thane Municipal Administration plans 100 day program to improve citizens daily lives
ठाणे-बोरिवली मार्गाच्या कामाला होणार जलवाहिनीद्वारे पाणी पुरवठा

उन्हाळ्याची तलखी कमी करण्यासाठी अनेक जण कुलर आणतात. आमच्या घरात कुलरच्या तत्त्वावर पण झाडे असलेला ‘ग्रीन कुलर’ करायचा, असे सुनील भिडे यांनी ठरवले व अमलातही आणले. यासाठी २ फूट बाय २ फूट व दहा इंच उंच अशी सिमेंटची बिन भोकांची कुंडी, प्रनिप्रचे जोगळेकर यांचेकडून करून घेतली. वर्धिष्णू इंजिनिअरिंगच्या विकास पानसे यांनी सुनील भिडे यांनी दिलेल्या डिझाइननुसार फॅब्रिकेटेड स्टँड करून दिला. या स्टँडवर एकावर एक बसतील अशा लोखंडी जाळीच्या तीन गोलाकार कुंड्या करून घेतल्या. नारळाच्या शेंड्या तीन दिवस भिजत टाकून त्याचे निघालेले पाणी टाकून दिले व या भिजलेल्या शेंड्या, सेंद्रिय माती व पालापाचोळा जाळीच्या कुंड्यांमध्ये दाबून बसवल्या. मोठ्या सिमेंटच्या कुंडीत फॅब्रिकेटेड स्टँड उभा केला. या स्टँडमध्ये जाळीच्या कुंड्या बसवल्या. ही झाली कोरडी तयारी.

हेही वाचा… कामजिज्ञासा: लग्नाची पहिली रात्र आणि कल्पनाविलास

मग एअर कुलरसाठीचा छोटासा सबमर्सिबल पंप आणला. त्याची किंमत अंदाजे ८०० रुपये होती. त्यास प्लास्टिक जाळीने गुंडाळून तो सिमेंटच्या कुंडीत ठेवला. कारण कुलर म्हटला, की विजेचा पंप हवाच. पंपाचा पाइप जाळीच्या कुंड्यांमधून एकदम वर घेतला व त्याला छोट्या मशरूम कारंजाची तोटी बसवली. ही सर्व तयारी झाल्यावर शेंड्या भरलेल्या जाळीच्या कुंड्यांमध्ये बाहेरून एस्परेगस, फर्न, मिंट, स्पायडर प्लँट, बालसमची छोटी छोटी रोपं लावली. ही सर्व तयारी पूर्ण झाल्यावर सिमेंटच्या कुंडीत पाणी भरले. त्यात गप्पी मासे सोडले. आता बटन चालू केले की पाणी पंपाने वर खेचले जाते व सर्वात वरच्या जाळीच्या कुंडीत छोटेसे मशरुम कारंजे उडते. झाडांना पाणी मिळते. झाडांवरून व नारळाच्या शेंड्यांमधून झरझर झिरपणारे पाणी परत कुंडीत पडते. पाण्यात गप्पी मासे असल्यामुळे खतयुक्त पाणी झाडांना मिळते व झाडांमुळे पोषक पाणी माशांना मिळते. पाणी वरून खाली झिरपताना त्यात प्राणवायू मिसळतो.

मुळांमुळे व शेंड्यांमुळे पाणी स्वच्छ होते. पाण्यास वास येत नाही. झाडे खूश व मासेही खूश, असे हे सुंदर निसर्गचक्र तयार झाले आहे. या ग्रीन कुलरमध्ये पाणी व सावली आवडणाऱ्या छोट्या वनस्पती शोभतात. पिलिया, खुफिया किंवा पिटुनिया, बेगोनिया, बाल्सम अशा फुलांची रोपं लावता येतात. छोट्या पानांची, खाली पडायला आवडणाऱ्या वनस्पतींची निवड करावी. पाणी आवडणारे लेटय़ुस, पुदिना, आलूसुद्धा यात छान वाढते. हा ग्रीन कुलर चालू केला की पानांवरून निथळणाऱ्या पाण्याच्या थेंबाचा टपटप आवाज छान वाटतो व बाल्कनी, दिवाणखाना जिवंत होतो. ग्रीन कुलर छोट्या जागेत करता येतो. ऑफिसमध्ये छोट्या गच्चीत ठेवता येतो. पाण्याचा पुनर्वापर होतो व पाण्याची बचत होते. झाडांना रोज पाणी घालावे लागत नाही. बटण चालू केले, की पाणी मिळते. सर्वात महत्त्वाचे झाडांमुळे व पाण्यामुळे खोलीचे तापमान निवळते.

हेही वाचा… आयुर्वेदाच्या स्मृतीतून: ते चार दिवस विश्रांतीचेच

मोठी गच्ची वा आवार असेल तर नैसर्गिक दगडांचा, फायबरच्या दगडांचा कृत्रिम धबधबा करता येतो. मातीमध्ये खड्डा करून किंवा गच्चीत विटा लावून शेततळ्याचा कागद घालून छोटेसे तळे करता येते. आजूबाजूला शोभिवंत गड लावून त्याच्यामध्ये बांबू ग्रास, फर्नस, अंब्रेला पाम, हेलिकोनिया अशी रोपं लावून सुंदर सजावट करता येते. टेराकोटाची कासवे, बदके शोभा वाढवतात. एखादे पुस्तक घेऊन पाण्यात पाय सोडून बसता येते. त्यासाठी घडीव दगड, जांभा वापरता येतो.

हे शक्य नसेल तर तांब्याची, संगमरवराची पसरट थाळी, घंगाळी घेऊन त्यात पाणी भरून पाण्यात घरच्या गुलाबाच्या पाकळ्या, मदनबाण मोगरा टाका. हवेतली गर्मी निवळेल. मंगल, चैतन्यदायी वातावरणनिर्मिती होईल. जलतत्त्व हे मूलतत्त्व आहे. त्याला घरात, बागेत स्थान हवेच. दगडावरून खळाळणारा धबधबा, ग्रीन कुलरमधले निथळणारे पाण्याचे थेंब, वाऱ्याच्या झुळकीने छोट्याशा तळ्यात उठणारे तरंग पाहूनच तनामनाची काहिली शांत होते. जीवनात आणखी काय हवं?

Story img Loader